बाबो ! ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील सरू वहिनी खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो..

सुरुवातीच्या काळात हिंदी असेल किंवा मराठी मालिकांची रूपरेखा वेगळी होती. मालिकांचे विषय देखील सासु-सुना आणि त्यांच्यातली भांडण, याच्याच अवतीभवती फिरत होते.
आता मात्र त्या दृष्टीने वेगवेगळे विषय मालिकांच्या माध्यमातून मांडण्यात येत आहेत. काही मालिका अतिशय वेगळ्या विषयांवर प्रकाश टाकत आहेत, तर काही मालिका सर्वसाधारण कुटुंब कसे असेल हे दाखवत आहेत. त्यापैकी काही विषय प्रेक्षकांना आवडतात तर, काहींना ते साफ नाकरतात.
कोणत्याही मालिकेचे अभिनेत्री, कशी असावी याबद्दल देखील सुरुवातीपासूनच मोठा टैबू आपल्याकडे पाहायला मिळतो. अभिनेत्री हिंदी मालिकेची असेल किंवा मराठी, अगदी सुंदर, साधी-भोळी आणि अतिशय खुल्या विचारांची असते. कायमच त्याग-बलिदान यासाठी ती तयार असते. प्रसंगी बघता, खऱ्या आयुष्यात सर्वच जण असे असतातच, असे नाही.
मात्र काही मालिका अगदी वास्तवास धरून बनवल्या जातात आणि त्यांचे पात्र ही तसेच रेखाटली जाते. त्यामुळे त्या मालिका, नेहमीच चाहत्यांच्या मनात आपले घर बनवून ठेवतात. ससुराल गेंदा फूल या हिंदी मालिकेत, सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब एकमेकांना सांभाळून घेऊन कसे राहतात हे दाखवण्यात आले होते. त्यामुळेच ती मालिका आजही सर्वांच्या आवडीची आहे.
अशाच विषयाला धरून स्टार प्रवाह वर ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिका सध्या सुरू आहे. अल्पावधीतच या मालिकेने चांगलीच लोकप्रियता मिळवली. ही मालिका जेवढी लोकप्रिय ठरली, तेवढेच या मालिकेतील सर्व पात्र सुद्धा लोकप्रिय झाले आहे.
अगदी सर्वसामान्य गृहिणी प्रमाणे वापरातल्या साध्य साड्या, तेल लावून केसांची अगदी गच्च वेणी, कपाळावर हळदी कुंकू या अवतारात नेहमीच सर्वांची काळजी करणारी सरिता म्हणजेच सरू वहिनी, हे पात्र आज सर्वांच्याच घराघरात पोहोचला आहे. सर वहिनी ची भूमिका साकारणारी नंदिता पाटकर यांना तुम्ही एलिजाबेथ एकादशी मध्ये पाहिलेच असेल.
दोन धाकट्या जाऊ, तीन दीर, अपंगत्व असलेली सासू आणि जेमतेम आमदनी, यांची सांगड घालून आपला संसार सांभाळणारी सरू आज प्रत्येक गृहिणीच्या मनात आपले वेगळी जागा निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. मात्र ही साधी सरळ, मायाळू सरु वहिनी म्हणजेच नंदिता, खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.
इंस्टाग्राम वर तिने आपले एकापेक्षा एक सुंदर आणि ग्लॅमरस लूक मधले फोटो शेअर केलेले आहेत. तिचे हे फोटो पाहिल्यानंतर, हीच का ती सरु वहिनी असा प्रश्न पडेल. नंदिताने सुरुवातीलाच अभिनय क्षेत्राची निवड करियर म्हणून केली नव्हती. जवळपास आठ वर्ष तिने, कॉर्पोरेटमध्ये सेक्टरमध्ये काम केले आहे.
रुपारेल कॉलेजमध्ये असताना, एका मित्राने तिला नाटकात अभिनय करण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्यातूनच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. तिने काही मालिकांमध्ये आणि सिनेमामधे देखील काम केले आहे. एलिझाबेथ एकादशी या सिनेमाने तिला एक ओळख निर्माण करुन दिली. त्यानंतर ती बाबा सिनेमामध्ये झळकली होती. तिने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर, स्वतःचे अनेक फोटोज शेअर केले आहेत. ती त्या सर्वच फोटोंमध्ये कमालीची बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते.