बाबो ! सई ताम्हणकरची लागली लॉटरी ! ‘मिमी’नंतर मणिरत्नमच्या प्रोजेक्टमध्ये ‘या’ सुपरहिट तामिळ अभिनेत्यासोबत करणार काम..

बाबो ! सई ताम्हणकरची लागली लॉटरी ! ‘मिमी’नंतर मणिरत्नमच्या प्रोजेक्टमध्ये ‘या’ सुपरहिट तामिळ अभिनेत्यासोबत करणार काम..

सनई चौघडे सिनेमामधून चित्रपटसृष्टीमध्ये धडाक्यात पदार्पण करणारी सई ताम्हणकर, कधी एक सुपरस्टार बनली हे समजलंच नाही. आज केवळ मराठी सिनेसृष्टीच नाही तर, बॉलीवूडमधेही सईने आपल्या कामाचा डंका वाजवला आहे.

सई ताम्हणकरच्या पहिल्या सिनेमातील दमदार अभिनय बघून अनेकांनी तिला लंबी रेस का घोडा म्हणून संबोधलं होत, आणि आज सईने ते खरं देखील करुन दाखवलं आहे. सईने सुरुवातीपासूनच वेगळे पात्र रेखाटले आणि त्यामुळे तिचे नेहमीच कौतुक देखील करण्यात आलं होत. सईने आपल्या अभिनयाच्या जोरावर एकामाघून एक चांगल्या सिनेमात काम मिळवलं.

आणि अगदी साधारण दिसणारी सई आपल्या उत्कृष्ट अश्या अभिनय शैलीच्या जोरावर लोकप्रियेतच्या शिखरावर जाऊन पोहोचली. अमीर खानच्या गजनी सिनेमामध्ये अवघ्या काही मिनिटांचा रोल करणारी सई आज बॉलीवूडमध्ये देखील एक मोठं नाव बनलं आहे.

तिने काही मराठी मालिकांमध्ये देखील काम केले होते, मात्र अलीकडच्या काळात तिच्या बोल्ड आणि हटके अंदाजामुळे तिने आपला भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. दुनियादारी सिनेमाने तिच्या करियरला कलाटणी दिली, आणि कुठे तरी हरवून जाणारं नाव पुन्हा चर्चेत आलं. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट मराठी सिनेमामध्ये काम केले.

तिच्या बो’ल्ड आणि हॉ’ट अंदाजामुळं तिला हंटर या बॉलीवूडच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. आणि या संधीचा तिने पूर्ण उपयोग केला. या सिनेमात तिच्या बो’ल्डनेसने चांगल्याच चर्चा रंगवल्या. मात्र तिला हवं तस यश मिळाल नाही. त्यानंतर मराठी सिनेमामध्ये तू हि रे, जाऊ द्या ना बाळासाहेब, वजनदार अश्या काही बहुचर्चित सिनेमामध्ये तिने आपल्या खास शैलीने कौतुक कमवले.

मधल्या काळात तिने काही साऊथच्या सिनेमामध्ये देखील काम केले, मात्र नुकताच रिलीज झालेल्या मिमी या चित्रपटात तिच्या कामाची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमामध्ये तिने कृती सेननं आणि पंकज त्रिपाठी सारख्या उमद्या कलाकारांसोबत काम केलं आहे.

मराठी सिनेमा मला आई व्हायचंयच्या कथानकावर आधारित या सिनेमामध्ये मुख्य पात्र कृतीच असलं तरीही, सईच्या नावाची देखील चांगलीच चर्चा रंगत आहे. आणि आता तर सई चक्क मणिरत्नम यांच्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे. याबद्दलची माहिती तिने स्वतः आपल्या सोशल मीडियावरुन दिली आहे. नवरासा या नेटफ्लिक्सच्या प्रोजेक्टमध्ये ती साऊथचा सुपरस्टार विजय सेथुपतीसोबत झळकणार आहे.

नुकतंच या सीरिजचं ट्रेलर रिलीज झालं आणि त्यामध्ये सई दिसत आहे. आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून सईने याच ट्रेलर शेअर करत तामिळ मध्ये नवरासा असं कॅप्शन दिल आहे. ज्या दिगदर्शकासोबत काम करण्यासाठी बॉलीवूडच्या मोठं-मोठाल्या अभिनेत्री जीवाचं रान करतात आता त्याच मणिरत्नम सोबत मराठमोळी सई ताम्हणकरने काम केलं आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *