बाबो ! बिग बॉस मधील ‘या’ कलाकाराला वीज चो’रीमुळे खावी लागली आहे ‘जेल’ची हवा, जेलमध्ये होता ३…

बाबो ! बिग बॉस मधील ‘या’ कलाकाराला वीज चो’रीमुळे खावी लागली आहे ‘जेल’ची हवा, जेलमध्ये होता ३…

मनोरंजन

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या मराठी बिग बॉस हा शो आता रंजक वळणावर आला आहे. या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच काही जणांचे नॉमिनेशन झाले होते. अक्षय वाघमारे हा पहिल्यांदा नॉमिनेट झाला. त्यानंतर अक्षय वाघमारेच्या जागी या शोमध्ये आदीश वैद्य हा आला होता.

त्यानंतर दुसरे नोमिनेशन हे सुरेखा कुडची यांचे झाले होते. सुरेखा कुडची यांनी हा शो सोडल्यानंतर म्हणजेच घर सोडल्यानंतर अनेक स्पर्धकांना अश्रू अनावर झाले होते. अनेक जण रडले देखील होते. सुरेखा कुडची यांचे शोमध्ये सगळ्यांशी चांगले संबंध होते. त्यामुळेच अनेकांना रडू कोसळले.

मात्र, शेवटच्या टप्प्यामध्ये सुरेखा कुडची आणि स्नेहा वाघ यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले होते. त्यामुळे सुरेखा कुडची हा शो सोडताना स्नेहा वाघला देखील अश्रू अनावर झाले होते. बिग बॉस च्या घरामध्ये काही दिवसापूर्वी जोरदार राडा झाल्याचे आपण पाहिले.

जय दुधाने आणि विकास हा कॅप्टन होऊ नये म्हणून त्याला घरातील जेलमध्ये बंद करून ठेवले होते. त्यानंतर बिग बॉस यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आणि काही जणांचे नॉमिनेशन करणार असल्याची घोषणा देखील केली होती. बिग बॉसच्या शोमध्ये मीरा जगन्नाथ ही देखील अनेक वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत असते.

पहिल्याच दिवशी तिचे स्नेहा वाघसोबत भांडण झाले होते. त्याच बरोबर आदिश वैद्य आणि इतरांसोबतही तिचे भांडण झाले होते. या शोमध्ये आणखीन एक स्पर्धक बाहेर पडली आहे. तिचे नाव शिवलीला बाळासाहेब पाटील होते. शिवलीला बाळासाहेब पाटील ही व्यवसायाने कीर्तनकार होती.

त्यामुळे तिच्यावर अनेकांनी सहभागी झाल्यानंतर टीका सुरू केली होती. त्यानंतर बिग बॉसने तिची प्रकृती ठीक नसल्याने काही दिवसांसाठी तिला घराबाहेर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आजारपणातून थोडी बरी झाल्यानंतर तिने या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये तिने वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागून जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला माफ करा, असे आवाहन देखील केले होते. या घरामध्ये दादुस हा देखील सहभागी झाला आहे. दादुस हा एक गायक आहे. दादुस याचे खरे नाव संतोष चौधरी असे आहे.

या घरामध्ये त्याला बऱ्यापैकी सहानुभूती मिळत आहेत. दादुस याला 2018 मध्ये एका चोरीच्या प्रकरणात अटक झाली होती. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. दादुस यांनी मित्र बिल्डर सचिन ठक्कर याच्या सोबत मिळून अवैध वीज चोरी केली होती. पॉवर मिटर मधून त्यांनी थेट विजेचे कनेक्शन घेऊन वीज चोरी केली होती आणि जवळपास काही वर्षांची वीज वापरली.

महावितरणच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी दादुस यांना नोटीस पाठवली आणि चार लाख रुपये वीजबिल भरण्याची सांगितले. मात्र, एवढे बिल भरण्यास त्यांनी नकार दर्शवला. त्यानंतर महावितरणने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दादुस याच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला अटक देखील झाली होती. त्यानंतर को’र्टात हे प्रकरण गेले. कोर्टाने त्याला तीन दिवस तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. नुकतीच ही माहिती समोर आलेली आहे. तर आपल्याला दादुस आवडतो का? हे आम्हाला नक्की सांगा.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.