बाबो ! देवमाणूस मधील रेश्माला पाहिलंत का ? रियल लाईफमध्ये दिसते अतिशय हॉट आणि ग्लॅमरस..पहा फोटो

बोलायचं झालं तर जवळपास प्रत्येक महिन्याला एक नवीन मालिका रिलीज होते. मात्र प्रत्येक मालिका प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी होतेच असं नाही. तर काही मालिका अल्पावधीतच आपला भला मोठा चाहतावर्ग निर्माण करण्यात यशस्वी होतात.
अशा काही मोजक्याच मालिका आहेत, ज्यांनी अगदी अल्पावधीत भरघोस यश प्राप्त केले. सध्या आई कुठे काय करते ही मालिका सर्वाधिक पाहिली जाते. या मालिकेचे प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. त्याचबरोबर येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेचा महाएपिसोड नुकताच पार पडला. मात्र या मालिकेचा महाएपिसोड ने चाहात्यांना भरपूर निराश केले.
त्यामुळे या मालिकेचा टीआरपी अचानकच कमी झाला. कोणतीही मालिका किंवा कथानक दाखवताना चाहात्यांच्या मनाचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे असते, हे यावरून लक्षात येते. नक्की प्रेक्षकांच्या मनात काय चालले आहे, त्याच्याशी एकरूप होणे प्रत्येक कथानकाला जमत नाही. मात्र नुकतीच बंद झालेली मालिका देवमाणूस यामध्ये चांगले यश मिळाले होते.
अगदी अल्पावधीत या आपला भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला होता.हटके कथानकावर आधारित देवमाणूस या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले. या मालिकेच्या अखेरच्या भागाने काही प्रेक्षकांचा चांगलाच हिरमोड केला असला तरीही, याचे दुसरे पर्व येणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे.या मालिकेतील सर्व पात्र चाहात्यांच्या पसंतीस उतरली होती.
त्यामधील रेश्मा या निरागस, संसारिक महिलेची भूमिका पार पाडणाऱ्या गायत्री बनसोडेची भूमिका सर्वांना जरा जास्तच आवडली होती. सुखाचा संसार व्हावा अशी एक सर्वसाधारण आशा घेणार ठेवणारी साधारण संसारिक महिला तिची भूमिका गायत्रीने अतिशय हुबेहूब रेखाटली होती. त्यामुळे तिला नवीन ओळख मिळाली. एका सांसारिक स्त्रीला डॉक्टर अजितकुमार देव केवळ पैशासाठी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अ’डवकतो.
मात्र तिला त्याबद्दल काहीच जाणीव नसते. प्रेमात आंधळी होऊन आपलं घरदार सर्व काही सोडून ती त्याच्यासाठी वेडी होते. आणि अखेरीस डॉक्टरला आपली सुटका कर असे सांगते. हवे असलेले प्रेम आपल्या पतीकडून मिळत नसल्यामुळे ते प्रेम ती डॉक्टर कडून मिळवण्याचा प्रयत्न करते. या सर्वांपासून दूर आपल्याला सातासमुद्रापार त्याने न्यावे अशी इच्छा व्यक्त करत असताना डॉक्टर अजित कुमार देव मात्र तिचा खूण करतो.
रेश्माचे पात्र लवकरच संपुष्टात आले, मात्र तरीही मालिकेच्या अखेरपर्यंत तिची आठवण सगळ्यांनाच येत होती. रेशमाची भूमिका साकारणारी गायत्री रियल लाईफ मध्ये अगदी तिचा विपरीत आहे. अत्यंत बडबडी आणि बोल्ड म्हणून गायत्री बनसोडे ला ओळखले जाते. गायत्री मूळची मराठवाड्यातील आहे. मात्र तीने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पिंपिरिमधूनच पूर्ण केले.
त्यानंतर फॅशन डिझायनिंगचा कोर्स करून सेल्स डिपार्टमेंटमध्ये ती काम करत होती. अभिनय शिकण्यासाठी तिने ललित केंद्राची मदत घेतली. अनेक नाटकांविषयी तिने खूप वाचन केले त्यामुळे अभिनयाविषयी तिला खूप काही शिकायला मिळाले. यामध्ये विशेष म्हणजे तिच्या घरातील इतर कोणताही सदस्य सिनेसृष्टीशी संबंधित नाही.
देवमाणूस मालिकेसाठी सिलेक्शन होण्यापूर्वी तिने अनेक ऑडिशन देखील दिले होते मात्र, त्यात तिला रिजेक्शन मिळाले. ‘देवमाणूस चे ऑडिशन दिले, त्यावेळी हे पात्र मला भेटेल याची आशा मला नव्हती. कारण माझा माझा स्वभाव खूप विपरीत आहे. हे पात्र रेखाटताना ऑडिशन देताना कदाचित ते त्यातून झळकले असावे अशी मला भीती वाटत होती त्यामुळे या पात्राची आशा मी सोडून दिली होती.
मात्र अचानक झी मराठी मधून कॉल आला आणि मला हा रोल भेटला. मला अत्यानंद झाला. माझं कलाक्षेत्रात काम करणं माझ्या घरच्यांना मान्य नव्हतं. मात्र मला हा रोल मिळाला त्यानंतर त्यांनाही आनंद झाला. माझं पहिलं नाटकही कमर्शिअल होतं. ही तर फक्त सुरुवात आहे,अजून मला खूप काम करायचं आहे आणि लवकरच मोठं व्हायचं आहे.’
असं गायत्रीने एका मुलाखतीत सांगितले.‘परीस’ या सस्पेन्स थ्रीलर वेबसीरिजमध्ये आता गायत्री झळकणार आहे. येणारी मराठी वेबसिरीज ‘परीस’ ही अं’धश्रद्धेवर आधारित आहे. श्रद्धा आणि अं’धश्रद्धा यात फार अस्पष्ट अशी रेषा आहे आणि श्रद्धेची कधी अं’धश्रद्धा होईल, हे कधीच कोणी सांगू शकत नाही असं या वेबसिरीजच कथानक आहे.