बाबो ! देवमाणूस मधील कलाकरांना मिळते अवाच्या सव्वा मानधन ! छोट्या टोण्याचं मानधन बघून घालाल तोंडात बोटं..

बाबो ! देवमाणूस मधील कलाकरांना मिळते अवाच्या सव्वा मानधन ! छोट्या टोण्याचं मानधन बघून घालाल तोंडात बोटं..

देवमाणूस या मालिकेने थोड्याच काळात मोठी प्रसिद्धी मिळवली. वेगळं कथानक आणि सोबतीला सर्वच कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे या मालिकेने चांगलीच लोकप्रियता कमावली. या मालिकेचा भाला मोठा चाहतावर्ग आहे.

या मालिकेतील अजित कुमार पासून बालकलाकार टोण्या पर्यंत सर्वानाच चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावरच घेतले आहे. या सर्व कलाकारांची वाढती लोकप्रियता बघता, त्यांची कमाई देखील भली-मोठी असेल असा विचार एकदा तरी प्रत्येकाच्या मनात येऊनच गेला असेलच. तर खरोखर या मालिकेच्या कलाकारांची कमाई देखील भलीमोठी आहे.

त्यांना प्रत्येक भागासाठी भलं-मोठं मानधन मिळतं. तसे तर त्यांची लोकप्रियता आणि मालिकेचे टीआरपी बघता, मेकर्सला देखील ते नक्कीच परवडत असणार. बघू या कोणत्या कलाकाराला प्रत्येक भागासाठी किती रुपये मानधन मिळते.

१ किरण गायकवाड – लागीर झालं जी या मालिकेतून भैय्यासाहेबची भूमिका साकारत किरण गायकवाड घराघरात पोहोचला. भैय्यासाहेब या भूमिकेने त्याला नवी ओळख दिली. मात्र देवमाणूस या मालिकेमधून तर त्याने लोकप्रियतेचं शिखरच गाठलं. डॉ अजित कुमार देव या भूमिकेद्वारे त्याचा प्रचंड मोठा असा चाहतावर्ग तैयार झाला आहे. खास करुन तरुण मुलांमध्ये त्याची क्रेझ चांगलीच वाढली आहे. किरण गायकवाड प्रत्येक भागासाठी २० हजार रुपये मानधन घेत असल्याचं सांगितलं जात आहे.

२. नेहा खान –शिकारी या मराठी सिनेमामधून आपली ओळख निर्माण करणाऱ्या नेहा चा मोठा चाहतावर्ग आहे. पहिल्याच सिनेमामध्ये आपल्या मादक अश्या अंदाजाने तिने चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. देवमाणूस या मालिकेत ती एसीपी दिव्या सिंहची भूमिका साकारत आहे. नेहा खान एका भागासाठी जवळपास १८ हजार रुपये मानधन घेते.

३. सोनाली पाटील- आर्या या नवीन पत्राने काहीच दिवसांपूर्वी देवमाणूस मालिकेत दमदार एन्ट्री घेतली. सोनाली पाटील हीने आर्याची भूमिका साकारली आहे. वैजू नं १ सारख्या अनेक मालिकांमध्ये सोनालीने काम केले आहे. मात्र देवमाणूस मधूनच तिला खरी ओळख मिळाली. प्रत्येक भागासाठी सोनाली १६ हजार रुपये मानधन घेते.

४. रुक्मिणी सुतार- या मालिकेतील सर्वात हटके आणि बिनधास्त पात्र म्हणजेच सरु आज्जी. आपल्या भन्नाट शैलीने या पत्राने सर्वांचेच खास लक्ष वेधून घेतले. नेटकऱ्यांमध्ये तर सरू आज्जीचे पात्र चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. वेगवेगळे मिम सरू आजीच्या डायलॉगवर बनवले जातात. हे पात्र रेखाटणाऱ्या रुक्मिणी सुतार, मालिकेच्या एका भागासाठी १५ हजार रुपये मानधन घेतात.

५. माधुरी पवार- अजित कुमारला देखील भांबावून सोडणारी चंदा या नव्या पत्राने देवमाणूस मालिकेत धडाक्यात एन्ट्री घेतली. माधुरी पवारने हि भूमिका साकारली आहे. आपल्या दमदार अभिनयाने काहीच एपिसोडमध्ये माधुरीने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. माधुरी एका भागासाठी १५ हजार रुपये मानधन घेते.

६. विरळ माने- देवमाणूस मालिका सुरु झाली आणि अजित कुमार पाठोपाठच बालकलाकार टोण्या देखील चांगलाच लोकप्रिय झाला. त्याच्या खास अश्या विनोदी शैलीमुळे मालिकेमध्ये हास्यतरंग उमटते. टोण्याची भूमिका साकरणाला छोटा विरळ माने प्रत्येक भागासाठी १० हजार रुपये मानधन घेतो.

७. अस्मिता देशमुख- अस्मिताने देवमाणूस मालिकेमध्ये अल्लड, बिनधास्त मुलीची म्हणजेच डिम्पलची भूमिका साकारली. या मालिकेच्या आधी अस्मिताने काही शॉर्ट सिनेमामध्ये देखील काम केलं होत,मात्र डिम्पलच्या भूमिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. अस्मिताला मालिकेच्या एका भागासाठी १७ हजार रुपये मानधन मिळते.

८. किरण डांगे- बापमाणूस, शौर्य या मालिकांमध्ये काम करणाऱ्या किरण डांगेला देवमाणूस मधील बज्याच्या भूमिकेने खरी ओळख मिळवून दिली. देवमाणूसच्या बज्याचा देखील मोठा चाहतावर्ग आहे. एका भागासाठी किरण डांगेला ११ हजार रुपये मानधन मिळतात.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *