बाबा रामदेव यांच्या ऍलोपॅथी वादामध्ये आता आमिर खान आणि अक्षय कुमारची एन्ट्री, बाबा रामदेव म्हणाले कि अक्षय पण…

बाबा रामदेव यांच्या ऍलोपॅथी वादामध्ये आता आमिर खान आणि अक्षय कुमारची एन्ट्री, बाबा रामदेव म्हणाले कि अक्षय पण…

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव यांनी एक व’क्तव्य करून देशभरामध्ये वादंग निर्माण केले होते. को’रोना हा बरा होत नाही, असे त्यांचे म्हणणे होते त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना यावर खुलासा करावा लागला.

बाबा रामदेव म्हणाले, ऍलोपॅथी ने को’रोना बरा होत नाही, जर असे झाले असते तर एवढी माणसं मृ’त्युमुखी प’डले नसते. को’रोना आयुर्वेदाने पूर्ण बरा होतो, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर बाबा रामदेव यांना अनेकांनी टार्गेट करत शिव्यांची लाखोली वाहिली. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी याबाबत रामदेव यांना नोटीस पाठवून आपण केलेल्या वक्तव्यावर खुलासा करण्याची मागणी केली.

तसेच माफी देखील मागावी, असे देखील म्हटले. त्यानंतर बाबा रामदेव यांनी सरकारला पत्र लिहून यावर आपले स्पष्टीकरण दिले होते. बाबा रामदेव गेल्या काही वर्षांमध्ये खूपच चर्चेत आलेले आहेत. बाबा रामदेव यांनी पतंजलीची स्थापना केल्यानंतर त्यांच्या या कंपनीचे देश-विदेशात जाळे पसरलेले आहे. आज या कंपनीची जवळपास हजारो कोटी रुपयांची संपत्ती आहे.

पतंजलीचे सर्व प्रकारची प्रॉडक्ट आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतात. यामध्ये पतंजलीचे आयुर्वेदिक औषध देखील अनेक दुकानात उपलब्ध होतात. पतंजली ने गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःचे मॉल देखील उभारलेले आहेत. या मॉलमध्ये पतंजलीच्या वस्तू अतिशय रास्त दरामध्ये भेटतात. त्यामुळे अनेक ग्राहकांचा कल हा पतंजलीचे उत्पादन घेण्याकडे आहे.

मात्र, बाबा रामदेव यांच्या वक्तव्यानंतर ते चांगलेच चर्चेत आलेले आहेत. आता बाबा रामदेव यांनी या वा’दामध्ये अभिनेता अक्षय कुमार व अभिनेता आमिर खान यांना देखील घेरले आहे. बाबा रामदेव यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आमिर खान त्याच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमामध्ये बोलताना दाखवले आहे.

या व्हिडिओमध्ये आमिर खान आयुर्वेदाचे महत्त्व कसे आहे, ते पटवून देतान प्रेक्षकांना माहिती देत आहे. बाबा रामदेव यांनी हाच व्हिडिओ अपलोड केला आहे आणि आता त्यांच्यावर काय कारवाई करणार का, असा सवाल सरकारला केला आहे. कोणाची हिंमत आहे का आमिर खान वर कारवाई करण्याची, असे असा सवाल सरकारला केला आहे.

त्यानंतर त्यांनी अभिनेता अक्षय कुमार याचा देखील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार म्हणतो की, मी काही दिवसांपूर्वी एका आयुर्वेदिक सेंटर मध्ये गेलो होतो, या वेळी केवळ भारतीय असणारा मी तिथे एकटाच व्यक्ती होतो आणि सर्व व्यक्ती हे परदेशी होते त्यामुळे परदेशी लोकांना देखील आता आयुर्वेदाचे महत्त्व पटलेले आहे.

मी कुठल्याही प्रकारच्या आयुर्वेदाची जाहिरात करत नाही, असे देखील त्याने म्हटले आहे. मात्र, आयुर्वेदामध्ये चांगले गुणधर्म असतात, असे अक्षय कुमार म्हणाला, आपली बॉडी हीच आपली ब्रँड अँबेसिडर आहे. त्यामुळे आपले शरीर चांगले तंदुरुस्त ठेवणे आपल्या हातात आहे, असेही अक्षय म्हणाला. त्यामुळे बाबा रामदेव यांनी आता या दोन्ही कलाकारांवर कारवाई कोणी करणार आहे का? अशी विचारणा सरकारकडे केली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.