बाबा चमत्कार अर्थातच दिग्गज अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन, पहा अंतीम काळात झाले प्रचंड हाल…

काही वर्षा पूर्वी आपण लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे यांचा झपाटलेला हा चित्रपट पाहिला होता?, या चित्रपटांमध्ये ‘ओम फट स्वाहा’ हा डायलॉग म्हणून सर्वांच्या मनात घर केलेले दिग्गज अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे नुकतेच वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने नि’धन झाले.
गेल्या काही वर्षापासून ते आ’जारी होते. त्यांच्या नि’धनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अतिशय गुणी असा कलावंत आपल्यातून सोडून गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलेली आहे. त्यांचा ‘ओम फट स्वाहा’ हा डायलॉग झपाटलेला चित्रपटातला प्रचंड गाजला होता. या चित्रपटात त्यांनी बाबा चमत्कार ही भूमिका साकारली होती.
ही भूमिका अजरामर ठरली होती. या भूमिकेनंतर त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. मात्र, त्यातून त्यांना पै’सा अधिक मिळाला नाही. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. कडकोळ यांनी झपाटलेला चित्रपटातील ही भूमिका केल्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील मिळाल्या.
त्यांनी ‘अश्रुची झाली फुले’ रायगडाला जेव्हा जाग येते. या सारख्या अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या होत्या. ब्लॅक अँड व्हाईट, कुठे शोधू मी, गौरी, सखी या मराठी चित्रपटात तर ‘छोडो कल की बाते’ या हिंदी चित्रपटात काम केले होते.
कडकोळ यांनी ‘गोल्ड मेडल’ नावाचे पुस्तकही लिहिले होते, या अफाट अशा व्यक्तिमत्त्वाला जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आज आम्ही आपल्याला राघवेंद्र कडकोळ यांच्या खाजगी जीवनाबाबत माहिती देणार आहोत. राघवेंद्र हे शिक्षण घेत असताना त्यांना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या लिखाणाची माहिती मिळाली.
त्यानंतर त्यांनी सावरकर वाचून काढले. त्यानंतर त्यांना देशसेवा करावी वाटली. त्यामुळे त्यांनी शिक्षण सोडून सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते सैन्यात भरती देखील झाले. म्हणजेच नौ दलात नोकरी देखील मिळाली. त्यानंतर त्यांना आय एन एस या नौदलाच्या बोटीवर देखील पाठवण्यात आले.
मात्र, तिथे त्यांची परत एकदा सर्व चाचणी घेण्यात आली. यामध्ये त्याच्या का’नामध्ये दो’ष आढळला. त्यानंतर त्यांना परत भारतात पाठवून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षण सुरू केले. शिक्षण सुरू करताच त्यांना नाटकाचे वे’ड लागले. यानंतर त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले. या काळातच त्यांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकांमध्ये काम केले.
कृष्णधवल अनेक चित्रपटात त्यांनी काम केलेले आहे. कडकोळ यांनी अनेक दिग्गज अभिनेता सोबत काम केले. त्यांनी काशिनाथ घाणेकर यांच्या सोबत देखील काम केलेले आहे. तसेच त्यांनी मराठीतील दिग्गज अभिनेते शरद तळवळकर यांच्यासोबत देखील काम केले होते.
असे असले तरी त्यांना हवा तसा पै’सा आयुष्यात कमावता आला नाही. त्यांना आपल्या अभिनयातून खूप प्रसिद्धी मिळाली. मात्र, शेवटच्या काळामध्ये त्यांची खूप हाल झाले. शेवटच्या काळामध्ये त्यांना वृद्धाश्रमात राहावे लागल्याचे देखील सांगण्यात येत आहे. अशा या दिग्गज अभिनेते नि’धन झाल्याने अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.