बाबओ! तानाजी गलगुंडे अर्थात सैराट फेम लंगड्याच्या प्रेमात पडली ‘ही’ मराठी अभिनेत्री! फोटो शेअर करत म्हणाली, लवकरच आता…..

आपल्याला माहित आहे कि कलाकार हा सर्वगुणसंपन्न असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही शैलीचा अभिनय उत्तम करण्याची कला असते. त्यांच्यासाठी मुख्य ध्येय असतं ते म्हणजे ‘प्रेक्षकांचे मनोरंजन’ आणि हेच ध्येय मनाशी पक्क करून, स्वतःकडून कायम कसं उत्तम सादरीकरण दिलं जाईल याकडे लक्ष देणारी अभिनेत्री जिने मराठी सिनेृष्टीत एंट्री घेतल्यावर अनेकांना तिच्या सौंदर्यावर, अभिनय कौशल्यावर प्रेम करायला भाग पाडले आणि ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री ‘मोनालिसा बागल.
आता हीच सर्वांची लाडकी मोनालिसा लवकरच अजून एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. झी टॉकीज प्रस्तुत टॉकीज ओरिजनल चित्रपट ‘गस्त’मध्ये मोनालिसा आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच तानाजी गालगुंडे म्हणजेच सैराट फेम लंगड्या आणि मोनालिसा बागल ही जोडी पहिल्यांदाच या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
हे दोघेही कमालीचे कलाकार असल्यामुळे त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ही जबरदस्त असेल यात शंकाच नाही. पण या सर्वांमध्ये एक ध’क्कादा’यक गोष्ट म्हणजे मोनालिसा तानाजीच्या प्रेमात पडली आहे. होय, ऑनस्क्रीन ती तानाजीच्या प्रेमात पडली आहे.
सैराट’ सारख्या सुपरहिट चित्रपटातील लोकप्रिय कलाकार बाळ्या म्हणजेच अभिनेता तानाजी गालगुंडे याच्या सोबत काम करण्याची मोनालिसाची ही पहिलीच वेळ, बाळ्या प्रमाणेच गस्त मधील तानाजीची भूमिका आणि तानाजी आणि मोनालिसा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री नक्कीच रंजक असेल यात काही वाद नाही
तसेच आपल्या भूमिकेबद्दल बोलताना मोनालिसा म्हणाली कि, मी गस्त या चित्रपटात सुजाता नावाची व्यक्तिरेखा निभावतेय आणि ती खूपच चंचल मुलगी असते. ती अमर नावाच्या मुलाच्या प्रेमात आहे आणि त्याला भेटण्यासाठी ती कुठल्याही थराला जाते आणि कोणताही बहाणा करताना अजिबात मागे पुढे पाहत नाही.
मी पहिल्यांदाच तानाजीसोबत काम केलं आणि त्यांच्या सारख्या उत्तम अभिनेत्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. ही एक अनोखी प्रेम कहाणी आहे आणि प्रेक्षकांना पाहताना खूप मजा येईल. तसेच या नवीन भूमिकेबद्दल बोलताना तानाजी म्हणाला कि, मी गस्त या चित्रपटात अमर नावाच्या मुलाची भूमिका साकारतोय.
तो एका मु’लीच्या प्रे’मात आहे आणि ज्या गावात राहतोय त्या गावात पहारा देत असताना त्या मुलीला तो चोरून भेटत असतो. आता त्याची ही प्रेमकथा पुढे काय वळण घेते हे प्रेक्षकांना चित्रपटात लवकरचं पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा मी एका गावाकडच्या मुलाची भूमिका निभावतोय आणि प्रेक्षकांना देखील ती नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.
मोनालिसाने प्रेम संकट, झाला बोभाटा, ड्राय डे, सोबत, परफ्यूम यांसारख्या मराठी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. झाला बोभाटा या चित्रपटामुळे अभिनेत्री मोनालिसा बागल म्हणून हिला खरी ओळख मिळाली आहे.
अभिनेत्री मोनालीसा बागल हिच्या पर्सनल लाईफ बद्दल बोलायचं झालं तर ती अजून सिंगलच असून आपल्या करिअरवर फोकस करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर किरण गायकवाड सोबत लग्न झाल्याची पोस्ट केली होती. परंतु हि पोस्ट झी मराठीची नवी मालिका टोटल हुबलाक मालिकेच्या प्रमोशनसाठी शेअर केला असल्याचं कळालं.
तसेच अभिनेता तानाजी गालगुंडे याला सैराट चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. त्याचबरोबर त्याचा चाहता वर्ग देखील वाढला. तानाजीनं आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर बनवलं. अशातच तो पुन्हा एकदा आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर बनवायला सज्ज झाला आहे.
झी टॉकीज प्रस्तुत ‘गस्त’ या चित्रपटात तानाजी प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून प्रेक्षक या चित्रपटासाठी खूप उत्सूक असलेले दिसत आहे. हा चित्रपट 28 फेब्रुवारी दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीजवर प्रदर्शित होणार आहे.