बाप रे बाप ! एवढ्या कोटी संपत्तीचे मालक आहेत महेश मांजरेकर, संपत्तीचा आकडा बघून चकित व्हाल…

बाप रे बाप ! एवढ्या कोटी संपत्तीचे मालक आहेत महेश मांजरेकर, संपत्तीचा आकडा बघून चकित व्हाल…

मनोरंजन

मनोरंजन विश्वामध्ये असे मोजकेच कलाकार आहेत, ज्यांनी सर्वच भाषांमध्ये काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर, ते केवळ एकाच भाषेत नाही तर, कोणत्याही भाषेच्या सिनेमामध्ये काम करतात आणि प्रसिद्ध देखील ठरतात. सयाजी शिंदे, सचिन खेडेकर या अभिनेत्यांचा केवळ मराठीच नाही तर, हिंदी आणि साऊथमध्ये देखील मोठा चाहतावर्ग आहे.

आपल्या केलेला त्यांनी, केवळ एका भाषेपुरतं मर्यादित ठेवलं नाही, आणि म्हणून अनेक वेगवेगळ्या भाषेतील सिनेमा आणि वेब-सिरीजमध्ये त्यांनी काम केले आहे. या मराठमोळ्या कलाकारांचा केवळ आपल्या महाराष्ट्रात किंवा बॉलीवूड मधेच नाही तर, साऊथमध्ये देखील मोठा चाहतावर्ग आहे.

याच उमदा कलाकारांच्या यादीमध्ये महेश मांजरेकर यांचे नाव अग्रेसरच ठरते. महेश मांजरेकर यांनी केवळ, मराठी किंवा हिंदीच नाही तर साऊथच्या देखील अनेक सिनेमामध्ये काम केले आहे. त्यामुळे तिथे देखील त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. महेश मांजरेकर माघील कित्येक वर्षांपासून, मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग केवळ, भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे.

आपल्या दमदार अभिनयाने, त्यांनी आपली वेगळी आणि खास अशी ओळख चित्रपटसृष्टीमध्ये बनवली आहे. त्यांची प्रसिद्धी आणि लोकप्रियता बघूनच, जेव्हा बिग बॉसच्या मेकर्सने मराठीमध्ये तोच रियालिटी शो घेऊन येण्याच ठरवलं, त्यांनी होस्ट म्हणून महेश मांजरेकर यांचीच निवड केली. महेश मांजरेकर यांना, बिग बॉस मराठी होस्ट करण्यासाठी चांगलंच मानधन मिळत.

अद्याप, ते मराठी बिग बॉस होस्ट करण्यासाठी किती मानधन घेतात याचा अचूक आकडा समोर आलेला नाहीये. मात्र हे मानधन, कोटींच्या घरात आहे, असं काही मीडिया रिपोर्ट सांगतात. बिग बॉस मराठीचा नवा पर्व सुरु झाला आहे. यामध्ये, कोणत्या कन्टेस्टंटला किती मानधन मिळत, याची चर्चा सुरु होते.

तशीच महेश मांजरेकरांच्या मानधनाच्या बाबतीत देखील चर्चा सुरु होते. त्यातच एका मीडिया रिपोर्टने त्यांच्या संपत्तीचे मुल्याकंन केल्याचा दावा केला आहे. महेश मांजरेकर यांची, केवळ मुंबई-पुण्यातच नाही तर लोणावळा, अलिबाग परिसरात अनेक फार्म-हाऊस असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईमध्ये त्यांचे बरेच फ्लॅट्स आहेत.

त्याचबरोरब महेश मांजरेकर यांना महागड्या गाड्यांचा देशील शौक आहे. त्यामुळे अनेक, महागड्या गाड्या त्यांच्या कडे आहेत. त्याचबरोबर त्यांना उंची घड्याळ घालणे देखील आवडते. म्हणून, अगदी एक्स्क्लुजिव्ह असे खूप सारे घड्याळ त्यांच्याकडे आहेत. त्यांची संपत्ती कमीत कमी ५० कोटी आहे, असं मीडिया रिपोर्टने सांगितले आहे.

त्यांची पत्नी मेधा मांजरेकर देखील अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. त्यांची मुलगी सई हिने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, नुकतंच अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. महेश मांजरेकर आणि सलमान खान या दोघांची बॉण्डिंग खूप चांगली आहे,असं सांगितलं जात. म्हणूनच, सलमान खानच्या दबंग सिनेमामधून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *