फोटोत दिसणाऱ्या ‘या’ सख्या बहिणी आज करतायेत मराठी इंडस्ट्रीवर राज्य, तुम्ही त्यांना ओळखलं का?

फोटोत दिसणाऱ्या ‘या’ सख्या बहिणी आज करतायेत मराठी इंडस्ट्रीवर राज्य, तुम्ही त्यांना ओळखलं का?

मराठी चित्रपटसृष्टी, नाटक आता खऱ्या अर्थाने कात टाकते आहे, असे म्हणावे लागेल. काही वर्षापूर्वी मराठीमध्ये उंबरठ्याच्या अतील चित्रपट बनण्याचे, म्हणजेच सासू-सून वाद अशीच काहीशी थीम चित्रपटाची असायची.

मात्र, गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपट, नाटक याचं स्वरुप मोठ्या प्रमाणात बदलत आहे आणि आता नवीन नवीन विषय देखील मराठी चित्रपट सृष्टीत हाताळले जात आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता व अभिनेत्री देखील आता बोल्ड भूमिका स्वीकारताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री या अतिशय भावनिक भूमिका चित्रपटात करत होत्या.

मात्र, आता चित्रपटाची स्क्रिप्ट नुसार देखील अभिनेत्री व अभिनेता बो’ल्ड सीन देताना मराठी चित्रपट सृष्टी मध्ये दिसत आहेत. तसेच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आता एकाच घरातील दोन कलावंत असलेले कलाकार देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत. यामध्ये सचिन पिळगावकर यांचे नाव आपल्याला घेता येईल.

सचिन यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर या देखील खूप मोठी अभिनेत्री आहेत. त्याचप्रमाणे त्यांची मुलगी श्रेया पिळगावकर हीदेखील मराठीसह बॉलीवूडमध्ये आणि चित्रपट करत आहे. याच प्रमाणे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही जोडी देखील मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अधिराज्य गाजवते. आजही निवेदिता सराफ यांना मालिका मिळत आहेत.

आज आम्ही आपल्याला अशाच दोन बहिणी बद्दल माहिती देणार आहोत. सध्या या दोन्ही बहिणी मराठी चित्रपट नाटक आणि इतर क्षेत्रात देखील अधिराज्य गाजवत आहेत. या दोन बहिणीचे नाव फोटो पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलेच असेल. या अभिनेत्रीचे नाव मृण्मयी व गौतमी देशपांडे आहे. मृण्मयी हिच्या वाढदिवसानिमित्त तिची बहीण गौतमी ने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

दोघीही अतिशय लहान अशा आहेत. या फोटो मध्ये त्या अतिशय गोड दिसत आहेत. त्यावर गौतमी ने हॅपी बर्थडे डियर सिस्टर असे म्हटले आहे. मृण्मयी देशपांडे हिने अग्निहोत्र या मराठी मालिकेतून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्या आधी तिने काही नाटकांमध्ये देखील काम केले होते. त्यानंतर मृण्मयी हिने फर्जंद या चित्रपटातून देखील काम केले होते.

तसेच मृण्मयीने मराठी नाटक आणि चित्रपटात देखील काम केले आहे. तर गौतमी देखील बहिणीच्या पावलावर पाऊल टाकून या क्षेत्रातच काम करत आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेत तिची भूमिका चांगलीच गाजत आहे. तिचे या मालिकेतील पात्र चांगलेच गाजत आहे. गौतमी ही गायिका देखील आहे. तिने काही चित्रपटांमध्ये गायन देखील केली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *