फिल्मी दुनियेपासून दूर राहून वडलांप्रमाणेच सं’न्यासी बनलाय विनोद खन्ना यांचा मुलगा, एकेकाळी पुनम पांडे सोबत होते अ’फेयर…

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकारांनी मोलाचं योगदान दिले आहे. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता विनोद खन्ना. बॉलिवूडचा अमर म्हणून ओळखल्या जाणारे विनोदजी आज आपल्यात नसले तरीही त्यांचा अभिनय आणि व्यक्तिमत्वामुळे ते कायम प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतील.
सुरुवातीच्या दिवसांमध्ये चित्रपटसृष्टीत ते खलनायकाची भूमिका करत असत. त्यानंतर १९७१ मध्ये त्यांनी हम तूम और वो चित्रपटात पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली. त्यांनी हाथ की सफाई, हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर, अमर- अकबर- अँथनी या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. अभिनयासोबतच ते राजकारणातही बरेच सक्रिय होते.
विनोद खन्ना यांची मुले अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना यांना सर्वांना माहित आहे पण तिसरा मुलगा साक्षी खन्ना बद्दल फारसे कोणाला माहिती नाही. सुमारे २ वर्षांपूर्वी साक्षी खन्नाने त्याचे प्रॉडक्शन हाऊसदेखील उघडले होते पण आता त्याने वडील विनोद खन्ना यांच्या मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्पॉटबॉय या वेबसाइटनुसार साक्षी खन्नाही ओशोचा भक्त झाला आहे. सूत्रांनी सांगितले की, साक्षी काही महिन्यांपूर्वी ओशोच्या आश्रमात पोहोचला होता. विनोद खन्नाचे १९९० मध्ये कविता खन्नाशी लग्न झाले होते, या लग्नातून विनोद यांना एक मुलगा साक्षी आणि एक मुलगी श्रद्धा आहे.
विनोद खन्ना यांनी आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी हिंदी सिनेमापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. 70 च्या दशकाच्या उत्तरार्धात विनोद खन्नावर ओशो म्हणजे आचार्य रजनीश यांचा प्रभाव होता आणि विनोद हे रजनीश आश्रमात भि’क्षु झाले होते.
काही वर्षांपूर्वी 28 वर्षीय साक्षी खन्ना बद्दलच्या बातम्या आल्या होत्या की संजय लीला भन्साळी हे साक्षीला लॉन्च करणार आहेत. साक्षी बाजीराव मस्तानी चित्रपटात संजय लीला भन्साळीचा सहाय्यक दिग्दर्शक देखील होता. यानंतर अशी चर्चा आहे की भन्साळी आता त्याला लॉन्च करणार आहेत पण बऱ्याच कालावधीनंतरही कोणताही प्रकल्प समोर आला नाही.
याशिवाय साक्षीही अ’फेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आला होता. पूनम पांडे यांच्याशी त्यांचे प्रे’मसं’बं’ध राहिले आहेत. हे दोघेही बर्याच वेळा फिरत आणि एकत्र पार्टी करताना दिसले, जरी या दोघांचे विधान समोर आले नाही. २०११ मध्ये साक्षीला रे’व्ह पार्टीत पकडले गेले होते. त्यावेळी त्याने ड्र’ग्स घेण्यास नकार दिला. पण पो’लि’सांना सं’शय होता की तो ड्र-ग्स घेत होता किंवा विकत होता.
सध्या साक्षी खन्नाने इंडस्ट्रीतील लाइमलाइटपासून दूर राहून सं’न्यास घेतला आहे. साक्षी खन्ना नेहमी सोशल मीडिया आणि मीडियापासून लांब असतो. तर विनोद खन्ना यांचा सर्वात मोठा मुलगा अक्षय खन्ना बॉलिवूडमध्ये सतत सक्रिय असल्याचे दिसत असते. नुकताच अक्षयचा से’क्शन ३७५ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण चित्रपट समीक्षकानी याचे कौतुक केले होते.