‘फँड्री’ फेम जब्याची लागली लॉटरी, ‘या’ सुंदर अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार, पहा व्हिडिओ….

मनोरंजन
काही वर्षापूर्वी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पि’स्तुल्या हा लघुपट निर्माण केला होता. पिस्तुल्या या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आले होते. त्यानंतर ते एका अशा चित्रपटाच्या शोधात होते की, जो चित्रपट ग्रामीण बाज असलेला असेल. त्यानंतर त्यांनी फॅन्ड्री या चित्रपटाची कथा लिहिली. या चित्रपटासाठी त्यांनी अनेक अभिनेत्यांच्या ऑडिशन घेतल्या.
मात्र, यासाठी त्यांना ग्रामीण भागातील अस्सल असा चेहरा पाहिजे होता. त्यानंतर त्यांना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एका गावामध्ये जब्या भेटला. जब्या म्हणजेच फॅन्ड्री चित्रपटातील जब्या होय. त्याचे खरे नाव सोमनाथ अवघडे असे आहे. या चित्रपटांमध्ये सोमनाथ अवघडे याने आपल्या अभिनयाने सर्वांना आपलेसे केले होते.
या चित्रपटांमध्ये त्याने अभिनय म्हणजे तो दैनंदिन जीवनात जसा वागतो, तसा तो या चित्रपटात वावरला आहे. त्यामुळे चित्रपटांमध्ये वेगळ्या प्रकारची जाण आली होती.त्यानंतर हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये राजश्री खरात हिने भूमिका केली होती. तिने या चित्रपटामध्ये अतिशय वेगळी अशी भूमिका साकारली होती.
हा चित्रपट या वेळी प्रचंड गाजला होता. गावामध्ये एका वंचित घटकाची कथा या चित्रपटात दाखवली होती. जब्या याच्या वडिलांची भूमिका किशोर कदम यांनी केली होती. किशोर कदम म्हणजेच सौमित्र हे होय. त्यांनी या चित्रपटात अतिशय चांगले काम केले होते. त्यानंतर जब्या म्हणजे सोमनाथ अवघडे जणू काही चित्रपटापासून लांबच राहिला होता.
त्यानंतर मध्यंतरी त्याच्या काही बातम्या आल्या होत्या. मात्र, तो काय करतो कोणालाही माहीत नव्हते. तो आता परत एकदा तो एका चित्रपटाच्या गाण्यामुळे चर्चेत आलेला आहे. आता तो मोठा झाला असून त्याची उंची देखील भरपूर वाढलेली आहे. आज आम्ही आपल्याला त्याच्या नव्या एका चित्रपटाच्या गाण्याबाबत माहिती सांगणार आहोत.
सोमनाथ अवघडे लवकरच एका चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यासाठी त्याची ऑडिशन देखील झालेली आहे. या चित्रपटामध्ये एक गाणे चित्रीत करण्यात आलेले आहे. को’रो’ना म’हामा’री मुळे सध्या अनेक ठिकाणी चित्रीकरण बंद होते. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे टाकण्यात आले होते.
मात्र, आता सरकारने चित्रपट चित्रीकरण करण्यास शिथिलता दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चित्रीकरण सुरू झालेले आहे. या चित्रपटाचे नाव ‘फ्री-हीट दणका’ असे आहे. या चित्रपटात सोमनाथ अवघडे याच्यासोबत अपूर्व एस ही अभिनेत्री दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर 16 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.
‘रंग प्रीतीचा बावरा’ हे गीत दोघांवर चित्रीत करण्यात आलेले आहे. या गाण्याला जसराज जोशी व स्वामी शैलेश यांनी आवाज दिला आहे. हे गाणे अतिशय बहारदार असे झालेले आहे. या चित्रपटाला बबन आडगळे यांनी संगीत दिलेले आहे. चित्रपटाची कथा सुनील मगरे यांनी लिहिली आहे.
अतुल तरडे आकाश ठोंबरे, मेघनाथ सोरखाडे हे चित्रपटाचे निर्माते असून सुनील मगरे यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मानगंगा, पारनेर येथे करण्यात आले आहे. चित्रीकरणाच्या ठिकाणी अनेक साप निघत होते. त्यामुळे सर्पमित्रांना बोलावून हे साप आधी पकडण्यात आले. त्यानंतर गाण्याचे चित्रीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.