‘फँड्री’मधील ‘ही’ ग्लॅमरस अभिनेत्री दिसणार ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत, साकारणार ही भूमिका…

मनोरंजन
मालिकाविश्व हे आज खूप मोठं बनलं आहे. सुरुवातीच्या काळात, मालिकाना बघणारा रसिकवर्ग फार मोठा नव्हता. पण आज मालिका प्रत्येक घरातील एक महत्वाचा भाग बनल्या आहेत. हिंदी मालिकांना सुरुवातीच्या काळात, मोठा चाहतावर्ग होता. पण आज, मराठी मालिकांनी हिंदी मालिकांना देखील टीआरपीच्या बाबतीत माघे सोडल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे.
अनेक मराठी मालिकांची लोकप्रियता बघून त्याच कथनकावर आधारित, हिंदी आणि इतर भाषांमध्ये मालिका बनवण्याचे सत्र सुरु झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. सुंदरा मनात भरली, या मालिकेची लोकप्रियता चांगलीच वाढली. आणि म्हणून मेकर्स आता, गुजरातीमध्ये देखील त्याच कथानकावर आधारित मालिका लवकरच सुरु करणार आहेत.
त्याचबरोबर, आई कुठं काय करते या मालिकेच्या कथानकावर आधारित मालिका अनुपमा, हिंदी मालिकांमध्ये देखील टीआरपीच्या शर्यतीमध्ये सगळ्यात पुढे आहे. त्याचप्रमाणे, सहकुटुंब सहपरिवार या कुटुंबाचे महत्व सांगणाऱ्या मालिकेने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता कमवली आणि म्हणून हिंदीमध्ये पंड्या स्टोर्स नावाने त्याच कथानकावर आधारित मालिका सुरु आहे.
गुम है किसी के प्यार मे, ही मालिका देखील चांगलीच लोकप्रिय ठरली. मात्र खूप कमी लोकांना माहित आहे की, ही मालिका ‘राजा राणीची ग जोडी’ यामालिकेच्या कथनकावर आधारित आहे. राजा राणीची ग जोडी, ही मालिका अल्पावधीतच कमालीची प्रसिद्ध झाली. संजू आणि रणजित यादोघांची हटके, प्रेमकहाणी अनेकांच्या पसंतीस उतरली.
संजू म्हणजेच संजीवनी ढाले पाटील आणि रणजित म्हणजेच रणजित ढाले पाटील या दोघांचेही पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. केवळ प्रमुख पात्रच नाही, तर यामालिकेतील जवळपास सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. संजीवनी म्हणजेच संजुची मैत्रीण मोना हिचे पात्र देखील, चांगलेच लोकप्रिय झाले होते.
मात्र, माघील बरीच काळापासून मोना कोणालाच दिसत नाहीये. अनेक भागांमध्ये, मालिकेमध्ये मोना दिसत नाहीये. मोनाचे पात्र रेखाटणारी, श्वेता खरात आता नवीन मालिकेत झळकत आहे. मन झालं बाजींद या मालिकेमध्ये श्वेता प्रमुख भूमिकेमध्ये बघायला मिळत आहे, म्हणून ‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेत ती आता काम करणार नाही.
मात्र, तिच्याजागी आता, फॅन्ड्री या सुपरहिट मराठी सिनेमामधील अभिनेत्री काम करणार असल्याचं सांगितलं जात आहे. नागराज मंजुळे यांचा फॅन्ड्री हा सिनेमा चांगलाच लोकप्रिय ठरला होता. याच सिनेमामध्ये ऐश्वर्या शिंदेने काम केले होते. त्यानंतर, ऐश्वर्या फार कुठे दिसली नाही. मात्र आता राजा राणीची ग जोडी या मालिकेत ती मोनाची भूमिका साकारणार आहे.
सध्या, राजा राणीची ग जोडी यामालिकेमध्ये बरेच बदल केलेले बघण्यात येत आहे. वेगवेगळ्या बदलांनी, यामालिकेला अगदी रंजक वळण दिले आहे. त्यामुळे अगदी, रोमांचक अशा वळणावर, ऐश्वर्या शिंदे मालिकेत एंट्री घेणार आहे, म्हणून तिचा चाहतावर्ग उत्सुक आहे.ऐश्वर्या कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या या नव्या भूमिकेसाठी, तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.