‘फँड्री’तील जब्याचे बदलले नशीब लवकरच दिसणार ‘या’ नव्या सिनेमात, समोर आला त्याचा डॅशिंग लूक….

आपल्याला माहित असेल कि सोमनाथ अवघडे याने याने फँड्री या चित्रपटात काम केले आहे आणि ‘फँड्री’ हाच त्याचा पहिला चित्रपट होता ज्यामुळे तो रातोरात प्रकाश झोतात आला. आपणास सांगू इच्छितो कि सोमनाथचे वडील लक्ष्मण अवघडे यांचा व्यवसाय पोतराज व ते हलगीही वाजवत होते तसेच त्याची आई शेतात मोलमजुरी करत होती.
पण दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘पिस्तुल्या’ या लघुपटासाठी २०११ साली राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यानिमित्त नागराज मंजुळे केम गावात सत्कार होताना हलगी वाजवणारा सोमनाथ दिसला आणि ‘फँड्री’चा नायक म्हणून सोमनाथची निवड झाली आणि तेव्हाच सोमनाथ अवघडे हा संपूर्ण महाराष्टासमोर एक सुपरस्टार म्हणून समोर आला.
‘फॅण्ड्री या चित्रपटात अभिनेता सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात या दोघांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. मात्र, या चित्रपटानंतर सोमनाथ अवघडे फारसा कुठे झळकला नाही. परंतु, सोमनाथ लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
“फ्री हिट दणका” या आगामी मराठी चित्रपटात सोमनाथ झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो पहिल्यांदाच एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अलिकडेच या चित्रपटातील सोमनाथचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. यात सोमनाथच्या हातात बॅट दिसून येत आहे. त्यामुळे सोमनाथला या नव्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
दरम्यान, ‘फ्री हिट दणका’ हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून यात सोमनाथसोबत अभिनेत्री अपूर्वा एस. ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर अरबाज आणि तानाजी ही सैराटमधील मित्रांची जोडीदेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुनिल मगरे यांनी केलं आहे. तर, निर्मिती अतुल तरडे आणि आकाश ठोंबरे, मेघनाथ सोरखडे यांनी केली आहे.
तसेच पूर्वीचा जब्या म्हणजेच सोमनाथ इतक्या वर्षात फार बदलला आहे. त्याने आपल्या लूक्सवरही मेहनत करून एका डॅशिंग लूक मिळवला आहे. जब्याची नवीन स्टाईल स्टेटमेंट रसिकांनाही भावली आहे. त्याच्या फॅन्सकडून यावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. सोमनथा त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे तर चर्चेत आहेच पण त्याच्या नवीन लूकमुळेही चर्चेत आहे.
आगामी ‘फ्री हिट दणका’या मराठी सिनेमात सोमनाथ पुन्हा एकदा झळकणार आहे. वॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या पोस्टरमध्ये सर्वत्र प्रेमाचाच रंग विखुरलेला आहे. प्रेम आणि प्रेमाच्या विविध छटा पोस्टरमध्ये लक्ष वेधून घेत आहे.