‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ चित्रपटातील ‘ही’ अभिनेत्री आठवतेय का?, असा झाला होता तिचा दु’र्देवी शेवट की वाचून थक्क व्हाल..!

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक उमदा कलाकार होऊन गेले. त्यामध्ये अनेकांनी आपल्या अभिनयाने आणि खास अशा शैलीने बॉलीवूडमधील दिग्ग्ज कलाकरांना देखील माघे टाकले होते. आपल्यापैकी अनेकांना हे ठाऊकच नाही, मात्र एक काळ होता जेव्हा मराठी कलाकारांची लोकप्रियता आणि प्रसिद्धी बॉलीवूडच्या कलाकारांपेक्षा दुपटीने होती.
बॉलीवूडवर देखील केवळ मराठी कलाकारांचाच डंका वाजत होता. दादा कोंडके यांनी आपल्या हटके अशा शैलीने, परफेक्ट कॉमेडी टायमिंग आणि उमदा अभिनयाने लाखो चाहते कमवले होते. त्या काळात देखील, साता समुद्रापार त्यांचे चाहते होते.
स्मिता पाटील यांनी तर आपल्या निरागस हास्य आणि तेवढ्याच जबरदस्त अभिनयाने तेव्हा बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये आपली जागा निर्माण केली होती. माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, सोनाली कुलकर्णी यांनी ९०च्या दशकात बॉलीवूडसह संपूर्ण देशाला वेड लावले होते. मात्र या सर्व उत्कृष्ट कलाकारांमध्ये एक नाव काळाच्या आड लपून गेलं.
एक अशी अभिनेत्री जिने वयाच्या १५-१६ व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. मराठी सह अनेक बॉलीवूड सिनेमामध्ये काम केले. सत्तरच्या दशकातील अभिनेत्री पद्मा चव्हाण, यांनी आपल्या उत्तम अशा अभिनय शैलीने बॉलीवूडमध्येही ठसा उमटवला होता. कोल्हापूर येथे १९४४ मध्ये त्यांचा जन्म झाला. पद्मा चव्हाण याना सुरुवातीपासूनच नृत्य आणि अभिनयाची प्रचंड आवड होती.
त्यांचे वडील कॅप्टन होते, आणि त्याकाळात देखील मुलीला हवं ते करण्यासाठी उडू दिले पाहिजे असे पुरोगामी विचार त्यांचे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला म्हणजेच पद्मा यांना कधीच कलाक्षेत्रापासून दूर राहण्यास सांगितले नाही. त्यामुळे पद्मा चव्हाण यांनीदेखील चंदेरी पडद्याच्या ओढीने, शिक्षणास रामराम ठोकला आणि रंगभूमीवर आपले नशीब अजमावण्यास सुरुवात केली.
आकर्षति बांधा, अभिनय कला आणि सोबतच सुंदर असा चेहरा यामुळे त्यांना लगेच काम मिळाले. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्यांनी भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या सिनेमामधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. महाराष्ट्रातील मर्लिन मनरो आणि सौंदर्याचा ऍटम बॉम्ब हे दोन्ही किताब आचार्य अत्रे यांनी पद्मा चव्हाण याना बहाल केले होते.
त्यांचा अभिनय शहरी आणि ग्रामीण दोन्ही साच्यात ढलत होता. त्यामुळे अनेक सिनेमामध्ये त्यांना काम मिळतच गेले. त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लवकरच त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवले. त्यांची लोकप्रियता आणि प्रसिद्धी बघून बॉलीवूड मधून काम चालून त्यांच्याकडे आले. आदमी, काश्मीर की कली, सारख्या सुपरहिट सिनेमामध्ये त्यांनी काम केले.
मात्र बॉलीवूड त्यांना फारसं रुचलं नाही, म्हणून त्यांनी पुन्हा आपला मोर्चा मराठी सिनेमांकडे वळवला. त्यांच्या आराम हराम, या सुखांनो या सारख्या मराठी सिनेमांना महाराष्ट्र सरकारने गौरवान्वित केलं होत. त्यांनी अनेक नाटकामध्ये देखील काम केले होते.
सोबतच त्यांनी जवळपास २८ मराठी सिनेमामध्ये काम केले. प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच, १९९६ मध्ये त्यांचा अ’पघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा दु’र्दैवी मृ’त्यू झाला आणि एक उमदा कारकीर्द काळाच्या आड गेली.