प्रसिद्ध अभिनेत्री उमा भेंडे यांची सून आहे ‘ही’ प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, सुंदरतेच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर…

मराठी कलाविश्व तसे बॉलीवूडपेक्षाही जुनं आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. या कालविश्वामधे अनेक दिग्ग्ज कलाकारांनी आपल्या कलेने प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी कमावली. असे अनेक कलाकार आहेत ज्यांची कला, अभिनय आजही रसिकांच्या ध्यानात आहे. त्यांचा उत्कृष्ट अश्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घरं केली आणि आजही ती जागा कायम आहे.
दादा कोंडके, श्रीराम लागू, निळू फुले, रंजना, सुलोचना लाटकर, जयश्री गडकर अश्या काही कलाकारांनी आजही रसिकांच्या मनात आपली जागा कायम ठेवली आहे. अश्याच कलाकारांपैकी एक आहे नाव आहे उमा भेंडे यांचं. मराठी चित्रपटसृष्टीमधील देखणी आणि तेवढीच उत्कृष्ट अशी अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांना आजही ओळखल जातं.
अनसूया साकरीकर हे त्यांचा खरं नाव, मात्र स्वरसम्राज्ञी लतादीदींनी त्यांना उमा नाव दिले आणि तीच त्यांची ओळख बनली. उमा मूळच्या कोल्हापूर येथील होत्या त्यांनी १९६० सालच्या आकाशगंगा चित्रपटातून या मराठी हित्रपटसृष्टीमधे पदार्पण केले आणि कधीच माघे वळून पहिले नाही.
मधुचंद्र, आम्ही जातो अमुच्या गावा, दोस्ती, काका मला वाचवा, भालू, स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटांसोबत त्यांनी काही तमिळ, तेलगू, छत्तीसगडी चित्रपटात देखील काम केले होते. उमा यांनी, मराठी चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांच्यासोबत विवाह केला. ‘नाते जडले दोन जीवांचे’ या चित्रपटामध्ये त्या दोघांनी एकत्र काम केले होते.
आणि याच चित्रपटानंतर त्यांनी लग्न केले. ‘श्री प्रसाद चित्र’ असे त्यांच्या निर्मिती संस्थेचं नाव होत आणि यातून त्यांनी भालू, प्रेमासाठी वाट्टेल ते, चटकचांदनी अशा काही चित्रपटांची निर्मिती केली. १९ जुलै २०१७ रोजी उमा भेंडे यांचे निधन झाले. प्रसाद आणि प्रसन्न ही दोन,उमा आणि प्रकाश भेंडे यांना मुले आहेत. प्रसाद भेंडे हा त्यांचा थोरला मुलगा असून तो मराठी सृष्टीत सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करत आहे.
त्याचा “दुनियादारी” हा पहिलाच चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला. या चित्रपटामुळे तो अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला. लोकमान्य, मितवा, वेलकम जिंदगी, प्यारवाली लव्हस्टोरी, मला काहीच प्रॉब्लेम नाही, सविता दामोदर परांजपे, बेफाम, सातारचा सलमान या काही गाजलेल्या चित्रपटासाठी देखील त्याने काम केले आहे.
लोकमान्य या चित्रपटासाठी प्रसादला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरचा पुरस्कार मिळाला. प्रसाद यांची पत्नी श्वेता महाडिक हिंदी मालिकांमधून काम करते. त्या दोघांना अभीर नावाचा एक मुलगा देखील आहे. श्वेताने, गुड्डन तुमसे ना हो पायेगा, कृष्णदासी, एक शृंगार स्वाभिमान अशा हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
लोकमान्य-एक युगपुरुष या मराठी चित्रपटातसुद्धा तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. उमा यांचा धाकटा मुलगा प्रसन्न यांच्या पत्नीचे नाव किमया आहे. सध्या ते दोघे ‘Roger that production’ नावाची निर्मिती संस्था सांभाळत आहेत.