प्रभासच्या आदिपुरुष सिनेमात ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका, तर ‘हा’ असेल लक्ष्मण..

ओम राऊत हे मराठमोळं नाव बघता बघता सातासमुद्रपार लोकप्रिय झालं आहे. सिटी ऑफ गोल्ड या साधारण सिनेमामधून ओम राऊत यांनी २०१० मध्ये आपली चंदेरी दुनियेची वाटचाल सुरु केली. बॉलीवूडमध्ये कोणताही वारसा नसताना या मराठी माणसाने काहीच वर्षांत मोठाल्या दिग्दर्शकांच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे.
सिनेमामध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी काही नाटक देखील डायरेक्ट केली होती. ओम राऊत यांनी काही काळ एमटीव्ही साठी लेखक म्हणून आणि त्यांच्या क्रिएटिव्ह टीममध्ये देखील काम केलं होत. त्यानंतर लवकरच त्यांनी आपला मोर्चा, सिनेमा बनवण्याकडे वळवला. सिटी ऑफ गोल्ड सिनेमाचा निर्माता म्हणून काम केल्यानंतर त्यांनी हौन्टेड ३डी सिनेमा देखील प्रोड्यूस केला.
त्यानंतर त्यांनी लोकमान्य एक युगपुरुष या सिनेमामधून एक लेखक-दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये धडाक्यात पदार्पण केले आणि त्यासाठी अनेक पुरस्कार देखील जिंकले. त्यांच्या या सिनेमाला कौतुकाची दाद मिळाली. त्यानंतर ओम राऊत यांनी अजय देवगनचा तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमाचे दिग्दर्शन केले आणि जगभरात कीर्ती कमावली.
या सिनेमाच्या कलाकारांचे जितके जास्त कौतुक झाले तेवढेच ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाचे देखील झाले. मराठा साम्राज्यातील मावळ्यांचे युद्धकौशल्या अगदी बारिकेने त्यांनी या सिनेमामध्ये दाखवले. आणि त्यामुळे त्यांचे खास कौतुक करण्यात आले. तान्हाजी सिनेमानंतरच बाहुबली प्रभास सोबत आदिपुरुष सिनेमा आपण बनवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होत.
सध्या या सिनेमाची सगळीकडूनच जोरदार चर्चा होत आहे. हा सिनेमा रामायणाच्या कथनकावर आधारित असणार आहे, आणि त्यामुळे रामाची भूमिका प्रभास शिवाय अजून कोणीच उत्तम प्रकारे रेखाटू शकत नाही, असं ओम राऊत म्हणाले होते. माता सीताच्या भूमिकेसाठी अनेक नावांची चर्चा सुरु होती, मात्र कृती सेनान ही भूमिका रेखाटणार असल्याचं सांगितलं जात आहे.
तर रावणाच्या भूमिकेसाठी सैफ अली खानची निवड करण्यात आली आहे. या सिनेमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अनेक मराठी कलाकारांना देखील यामध्ये महत्वाच्या भूमिकांसाठी संधी देण्यात आली आहे. अभिनय बेर्डेच्या नावाची चर्चा सुरु आहे, मात्र तो कोणते पात्र रेखाटणार आहे याबद्दल कोणतेही अधिकृत विधान अद्याप आले नाहीये. पण या सिनेमामध्ये एक मराठी कलाकार अत्यंत महत्वाची अर्थात हनुमानाची भूमिका साकारणार आहे.
जय मल्हार फेम देवदत्त नागे या सिनेमामध्ये हनुमानाची भूमिका साकारणार असल्याच सांगितलं जात आहे. देवदत्त नागे, तान्हाजी सिनेमामध्ये देखील सूर्याजीच्या भूमिकेमध्ये झळकला होता आणि त्यासाठी त्याला चांगलीच पसंती देखील मिळाली होती. देवदत्तने यापूर्वीही अनेक हिंदी सिनेमामध्ये काम केलं आहे, शिवाय मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये देखील तो झळकतच असतो.
मात्र सध्याच्या हनुमानाच्या भूमिकेसाठी तो प्रचंड मेहनत घेत असलेलं बघायला मिळत आहे. आपल्या सोशल मीडियावर तो नेहमीच अनेक फोटोज आणि व्हीडियोज शेअर करत असतो. सध्या तो तासन-तास जिममध्ये घालत आहे. हनुमानाच्या भूमिकेसाठी त्यांनी आता अजूनच उत्तम बॉडी बनवली आहे. शिवाय तो स्पेशल डायट देखील फॉलो करत आहे.
देवदत्त नागेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे, आणि त्याला हनुमानच्या भूमिकांमध्ये बघण्यासाठी आता सर्वच उत्सुक आहेत. दरम्यान आदिपुरुष हा सिनेमा २०२०मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. हिंदी सोबतच, तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि मराठी भाषेमध्ये देखील हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे.