पोरीने कमाल केली! अवघ्या २५ वर्षांच्या ‘या’ मराठी अभिनेत्रीने स्वतःच्या हिमतीवर घेतलं हक्कच घरं..

पोरीने कमाल केली! अवघ्या २५ वर्षांच्या ‘या’ मराठी अभिनेत्रीने स्वतःच्या हिमतीवर घेतलं हक्कच घरं..

आपले एक स्वतःच हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी आपल्यापैकी बरेच जण आयुष्यभर संघर्ष करत असतात. कोणाचे हे स्वप्न लवकर पूर्ण होते तर, काहींना आपले संपूर्ण आयुष्य यासाठी संघर्ष करावा लागतो. ज्या पण क्षेत्रामध्ये आपण काम करत आहे, त्या क्षेत्रामध्ये आपली प्रगती व्हावी आपले मोठे नाव असावे अशी इच्छा सगळ्यांनाच असते.

त्यामध्ये काही अगदी छोट्या वयातचयशाची शिखरं गाठतात आणि अश्यांचे कौतुक करावे तेवढं कमीच आहे. आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात स्वतःचे नाव कमवून अस्तित्व निर्माण केल्या नंतरचा महत्वाचा टप्पा किंवा इच्छा, अशी असते की आपलं स्वतःचं, आपल्या कष्टातून उभं राहिलेलं आणि आपल्या हक्काचं असं घर असावंच.

अश्या हक्काच्या घराचं स्वप्न खूप लोकांनी पाहिलेलं असतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेताना ते कधीही विचार करत नाही. ‘इच्छा तिथे मार्ग’ असेच आपल्याकडे घर बनवायच्या बाबतीत आपण ऐकलं आहे. अगदी असच घडलं आहे मराठी अभिनेत्री मोनालिसा बागल बद्दल.

‘सौ. शशी देवधर’ या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या लहानपणीची भूमिका साकारत मोनालिसा हिनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. पहिला चित्रपट केल्यानंतर मोनालिसानं चांगलाच मोठा ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती ‘झाला बोभाटा’ या चित्रपटात झळकली होती. झाला बोभाटा या सिनेमाने तिला एका नवीन ओळख मिळवून दिली आणि तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

‘झाला बोभाटा’नंतर मोनालिसानं ‘ड्राय डे’, ‘पैंजण’, ‘परफ्यूम’ अशा अनेक चित्रपटांत काम करण्याची तिला संधी चालून आली.माघील वर्षी मोनालिसाचा ‘गस्त’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या निमित्ताने तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. परीक्षांची मन जिंकणारी मोनालिसा कायमच चर्चेचा विषय ठरली आहे.

आपल्या सोशल मीडियावरुन ती नेहमीच आपले फोटो शेअर करत असते. आणि तिचे सोशल मीडियावरील फोटोदेखील चांगलेच चर्चेत असतात. आणि सध्या तर सोशल मीडियावरून तिच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे. कारण देखील तसेच आहे. अवघ्या २५ वर्षांच्या या मोनालीसाने स्वत:च्या कमाईतून आपलं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

इतक्या छोट्या वयात तिने घेतलेली उंच भरारी यामुळे तिचे विशेष कौतुक सगळीकडेच होत आहे. ही उंच भरारी घेण्यामागचे सर्व श्रेय ती तिच्या कुटुंबाला देते. आपण घेतलेल्या घरासंबंधी सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने बोलले आहे की, “माझं स्वतःचं घर असावं ही माझी इच्छा होती आणि ती आता पूर्ण झाली आहे.

मात्र एका गोष्टीची खंत वाटते की माझ्यासोबत जिने हे स्वप्न पाहिले ती माझी आई आज आता माझ्यासोबत नाही. पण आई गेल्या नंतर माझी काकू ‘पन्ना हेमंत राणे’ हिने मला आधार दिला. आई नंतर आईसारखं कोणी माझ्यावर प्रेम केलं असेल तर ती माझी काकू.

माझे स्वप्न पूर्ण होण्यात, माझ्या करिअरमध्ये काकूचा देखील मोलाचा वाटा आहे. असं म्हणतात ना की ‘कुटुंब हेच सर्वकाही असतं’ आणि माझे आई-वडील दोघेही नसताना मला कुटुंबासारखंच प्रेम काका, काकूंनी दिलं. ते दोघेही माझे आधारस्तंभ आहेत.”

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *