पुण्याची लेडी बाहुबली ! थेट साडी घालून जिम करणारी हि महिला आहे तरी कोण ? व्यायाम करतानाचा विडिओ पाहून चकित व्हाल..

पुण्याची लेडी बाहुबली ! थेट साडी घालून जिम करणारी हि महिला आहे तरी कोण ? व्यायाम करतानाचा विडिओ पाहून चकित व्हाल..

पुणे तिथे काय उणे! हि काय आजची म्हण नाहीये. जगात जे काही घडत आहे ना, ते पुण्यामध्ये देखील कुठेही आणि कधीही घडू शकत. त्यातच असे बोलायला हरकत नाही जे पुण्यात होत, ते इतर कुठेही होत नाही. पुण्यात अश्या काही घट’ना असतात, ज्या इतर कोणत्याच ठिकाणी, कोणत्याच भागात होऊ शकत नाही.

पुणेरी लोकांची प्रत्येक गोष्टच वेगळी आहे. आपला आनंद व्यक्त करताना तर पुणेकर कोणत्याही मर्यादा पार करता. अशीच एक घटना समोर आली आहे, जी सध्या इंटरनेट वर चांगलाच धुमा’कूळ घालत आहे. कधी, कशाचा आणि कसा आनंद कोणाला होईल, आणि तो ते कसा व्यक्त करतील, याचा काहीच नेम नसतो.

असाच एक प्रकार सध्या संपूर्ण सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतोय. तब्ब्ल दीड वर्षांनी जिम सुरू झाल्या. आणि याचाच या महिलेला इतका आनंद झाला की, ही महिला थेट साडीवरच जिममध्ये पोहोचली. को’रो’नाकाळात परिस्थिती बघता आणि को’रोनाचा सं’सर्ग कमीत कमी व्हावा याकरिता सगळीकडेच जिम बंद होते.

मात्र आता तब्बल दीड वर्षांनी जिम सुरू झाली आणि पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांच्या अंगात एक वेगळंच आनंदाचं वारं भरलं. छानपैकी सुंदर अशी काठ पदराची भरजरी साडी नेसली. नथ, दागिने घातले आणि मग त्यांनी झिंगाट वर्कआऊट केलं. त्यांचा हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.

नियमित जिमला जाणाऱ्या काही व्यक्तींपैकी एक म्हणजे डॉ. शर्वरी इनामदार. त्या प्रचंड जिमप्रेमी आहेत. मात्र को’रोना आणि लॉकडाऊनमुळं जिम बंद पडल्या आणि त्यांचा व्यायाम देखील थांबला. म्हणून जेव्हा तब्बल दीड वर्षांनी, पुन्हा जिम सुरू झाले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि हटके सेलिब्रेशन तो बनता है बॉस म्हणत त्यांना हटके काही सुचलं.

डॉ. शर्वरी इनामदार आयुर्वेदातल्या एमडी आहेत. त्या स्वतःचं क्लिनिकही चालवतात. पण पॉवर लिफ्टिंग खेळाडू हीच त्यांची खरी ओळख. पॉवर लिफ्टिंगपटू शर्वरी यांनी चारवेळा स्ट्राँग वुमन होण्याचा मान पटकावलाय. २० व्या वर्षीच त्यांचं लग्न झालं. मात्र त्यांचा फिटनेस आणि फिजिक पाहून त्यांना दोन मुलं आहेत, यावर कुणाचा देखील विश्वास बसणार नाही.

साडीमध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.त्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं. पण अशा ट्रोलर्सची त्यांना अजिबातच फिकीर नाही. संसार करत असताना अनेकवेळा महिला आपल्या आवडीनिवडींकडे दुर्लक्ष करतात. मात्र योग्य व्यायाम केला आणि आहार-निद्रा यांचा मेळ घातला तर तारुण्य आणि जोम चिरकाळ टिकवता येतो, हेच या मराठमोळ्या स्ट्राँग वुमननं सिद्ध केलंय. आणि म्हणून लेडी बाहुबली म्हणून त्यांना संबोधण्यात येत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *