पहिल्या दोन पतींना घ’टस्फो’ट ते 11 वर्षांनी लहान मुलाशी अ’फेयर, असा आहे बिग बॉस मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रवास…

पहिल्या दोन पतींना घ’टस्फो’ट ते 11 वर्षांनी लहान मुलाशी अ’फेयर, असा आहे बिग बॉस मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रवास…

मनोरंजन

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील रियालिटी शोचा बाप म्हणून ओळखल्या जाणारा बिग बॉस हा शो पुन्हा नवे पर्व घेऊन आला आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवसापासून बिग बॉस मराठी 3, चांगल्याच वा’दाच्या भोवऱ्यात सा’पडलेला बघायला मिळत आहे.

समाजसेविका तृप्ती देसाई, अरुण गवळी यांचा जावई, सोबतच प्रसिद्ध कीर्तनकार हभप शिवलीला पाटील या सर्व सदस्यांवरून नेटकरी सध्या मेकर्सला चांगलेच ट्रो’ल करत असलेले बघायला मिळत आहे. मात्र बिग बॉस हा रिॲलिटी शो सर्व प्रकारच्या सेलिब्रेटीजसाठी खुला असतो, हे सर्वांनाच माहीत आहे.

या सदस्यां व्यतिरिक्त मराठी इंडस्ट्री मधील अनेक कलाकार बिग बॉस 3 मध्ये आले आहेत. आपल्या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सुरेखा कुडची यांनीदेखील बिग बॉस 3 मध्ये हजेरी लावली आहे. त्याचबरोबर तुला पाहते रे फेम गायत्री दातार, बायको हवी अशी फेम विकास पाटील, त्याचबरोबर जय दुधाने, मीरा जगन्नाथ या सर्वांनी देखील बिग बॉस पर्व 3 मध्ये एन्ट्री घेतली आहे.

मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणार्‍या स्नेहा वाघ यादेखील बिग बॉसच्या या सीजन मध्ये सदस्य म्हणून आल्या आहेत. स्नेहा वाघ यांना, काटा रुते कुणाला या मराठी मालिकेमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. अवघ्या 19 व्या वर्षी त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार, अविष्कार दारव्हेकर यांच्यासोबत विवाह केला होता.

मात्र या विवाहमध्ये त्यांना घरेलू अ’त्याचा’राचा सामना करावा लागला त्यामुळे, लवकरच त्यांनी घ’टस्फो’ट घेतला असे सांगितले जाते. सध्या आविष्कार देखील बिग बॉसच्या घरात आले आहेत. स्नेहा वाघ यांनी, ज्योती या हिंदी मालिकेमध्ये देखील प्रमुख भूमिका साकारली होती. स्टार प्लसच्या वीर की अरदास वीरा, या मालिकेत देखील त्यांची प्रमुख भूमिका होती.

वीरा या मालिकेने त्यांना पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले होते. चंद्रगुप्त मौर्य या मालिकेमध्ये त्यांनी मुरा भूमिका साकारली होती. त्यांनी इंटेरियर डिझायनर अनुराग सोलंकी यांच्यासोबत दुसऱ्यांदा विवाह केला. मात्र हे लग्न देखील आठ महिन्यांपेक्षा जास्त टिकू शकले नाही, आणि त्यांनी पुन्हा एकदा घ’टस्पो’ट घेतला.

आपल्या करियरमध्ये स्नेहा वाघ या जितक्या यशस्वी ठरल्या, तेवढ्याच आपल्या वैयक्तिक आयुष्यात त्या प्रेमाच्या बाबतीत अयशस्वी ठरल्या. आता 11 वर्षांनी लहान असणाऱ्या आणि डान्स इंडिया डान्स सुपर किड्स जिंकणाऱ्या फेझलसोबत त्यांच्या अ’फेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच, त्यांच्या आणि फैसलच्या अफे’अरच्या च’र्चांना उधाण आले होते.

या दोघांपैकी कोणीही त्याबद्दल कोणतेही अधिकृत विधान केले नव्हते. सोनी वाहिनीवर येणाऱ्या चंद्रगुप्त मौर्य, या मालिकेमध्ये स्नेहा वाघ आणि फैसल खान दोघेही सोबत काम करत होते, आणि तिथेच त्या दोघांची मैत्री झाली. फैसलची गर्लफ्रेंड मुस्कानने, स्नेहा वाघवर आ’रोप केला होता की, तिच्या मुळेच त्या दोघांचे नाते तुटले आहे.

मात्र त्यावर उत्तर देत स्नेहा वाघ म्हणाल्या होत्या की, ‘मुस्कानच्या या बालिश वक्तव्यावर नक्की हसावं की रडावं हे देखील तिला कळत नाहीये. स्वतः अभिनय क्षेत्राशी निगडित असतानादेखील अशाप्रकारे कोणावर आरोप करणे कितपत योग्य आहे.’

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *