पहिल्याच चित्रपटातून सुपरहिट ठरलेली रिमी सेन ‘या’ कारणामुळे बॉलिवूडमधून झाली गायब..!

२००२ नंतर बॉलिवूडमध्ये कॉमेडी चित्रपटाची निर्मिती जास्त प्रमाणत होत होती. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या फेरा फेरी या चित्रपटामुळे सगळेच निर्माते कॉमेडी चित्रपट बनवण्याकडे आपला कल देताना दिसत होते. आणि त्यावेळी हे चित्रपट हिट ठरत होते. यापैकी अनेक कॉमेडी चित्रपटात रिमी सेन हीच अभिनेत्री मुख्य भुमीकेत होती.
पण अचानक रिमी सेन बॉलिवूड मधून गायब झाली. रिमी सिनेने हिंदी, तेलगू आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. रिमीने तिच्या करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. रिमीने बालपणापासूनच बंगाली चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले होते.
यानंतर रिमीने मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला तेलुगु चित्रपट केला. यानंतर 2003 साली रिमीने ‘हंगामा’ या सुपरहिट कॉमेडी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटासाठी रिमीला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारात नामांकन देण्यात आले होते.
रिमीने ‘बागबान’, ‘धूम’, ‘गरम मसाला’, ‘क्यू की’, ‘फिर हेरा फेरी’ आणि ‘गोलमाल’ यासारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, अभिनेत्रीला फारशी लोकप्रियता मिळाली नाही आणि काही काळ ती प्रसिद्धीपासून दूर गेली. रिमी अखेर ‘शागिर्द’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात रिमीबरोबर नाना पाटेकर, झाकीर हुसेन आणि अनुराग कश्यप मुख्य भूमिकेत होते.
चित्रपट निर्मिती विश्वात पदार्पण
रिमीने ‘बुधिया सिंह : बॉर्न टू रन’ या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. याच चित्रपटाद्वारे रिमीने निर्माती म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. यापूर्वी ती सलमान खानचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस’मध्ये देखील दिसली होती. अभिनेत्री जास्त दिवस या शोमध्ये टिकली नाही. यानंतर रिमीने लवकरच बॉलिवूडचा निरोप घेतला.
का घेतला मनोरंजन विश्व सोडण्याचा निर्णय?
रियाने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले होते की, ‘अभिनयाने मला खूप काही दिले आणि मी नेहमीच त्याचा आदर करेन. लोक आपल्याला कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करतात आणि रिबन कटिंग करतात, ज्यासाठी कलाकारांना चांगले पैसे देखील दिले जातात. मी एक शास्त्रीय नर्तक आहे आणि अभिनय नैसर्गिकरित्या माझ्यात भिनला याचा मला खूप आनंद आहे.
परंतु, चित्रपटांमध्ये अभिनेत्री केवळ फर्निचर म्हणून वापरल्या जातात, हे देखील मला समजले. आजच्या घडीला आपल्याला अर्थपूर्ण कंटेंट मिळत आहे, परंतु माझ्या काळात असे काही सर्जनशील नव्हते. मी बॉलिवूड सोडले, कारण मी चित्रपटांमध्ये केवळ एका सुंदर फुलदाणीसारखी दिसत होते. यामुळे हे सर्व खूप कंटाळवाणे झाले होते.’
पुनरागमन करणार?
रिमी म्हणाली होती की, ‘मी परतेन पण सर्वायव्हलसाठी नाही, कारण मला माझ्या चित्रपटांचा अभिमान आहे. ‘जॉनी गद्दार’ आणि ‘संकट सिटी’सारख्या माझ्या चित्रपटांबद्दल मला अभिमान वाटतो. आता चित्रपट निर्मात्यांकडे भिन्न दृष्टी आहे, हे पाहून बरं वाटतं.