पहिल्यांदाच समोर आला Sunny- Bobby Deol च्या सख्ख्या बहिणींचा फोटो, पहा दिसतात अतिशय सुंदर..

मनोरंजन
बॉलीवूड मधील बहुचर्चित कुटुंबांपैकी एक म्हणजे देओल कुटुंब. धर्मेंद्र यांनी कित्येक दशकं बॉलीवूडवर आपले अधिराज्य गाजवले आहे. केवळ आपल्या सिनेमासाठीच नाही तर, आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत राहिले आहेत. त्यांचे जवळपास सर्वच सिनेमा सुपरहिट ठरत होते. त्याच काळात त्यांनी लग्न केले.
प्रत्येक सिनेमात मिळणारे भरगोस यश, दोन मुलं, दोन मुली प्रेमळ बायको, असा त्यांचा संसार अगदी सुखी आणि निवांत सुरु होता. मात्र त्यातच त्यांना बॉलीवूडची ड्रिमगर्ल, हेमा मालिनीवर प्रेम जडले आणि आता सगळंच काही विस्कटत की काय असंच वाटलं. मात्र, धर्मेंद्र यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घ’टस्फो’ट न देता मु’स्लिम धर्म स्वीकारत हेमा मालिनी यांच्यासह दुसरा विवाह केला.
धर्मेंद्र यांना, हेमा मालिनी यांच्याकडून देखील ईशा आणि अहाना अशा दोन मुली आहेत. धर्मेंद्रने आपल्या दोन्ही कुटुंबाला सांभाळून घेतले आणि आज त्यांचे खूप मोठे कुटुंब आहे. अजय सिंह देओल हे सनी देओलचे खरे नाव. मात्र बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना त्याने आपले नाव बदलले आणि सगळीकडेच तो सनी याच नावाने ओळखला जाऊ लागला.
बेताब या सिनेमामधून त्याने, बॉलीवूड मध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच सिनेमाने त्याला रातोरात स्टार बनवले. त्यानंतर सनी देओलने ‘डकैत’, ‘यतीम’, ‘त्रिदेव’, ‘चालबाज’, ‘घातक’ आणि ‘गदर’ अशा अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केले. सनी देओलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यानंतर काहीच वर्षांत बरसात या सिनेमामधून बॉबी देओलने देखील बॉलीवूडमध्ये एंट्री घेतली.
मात्र, त्याच्या पहिल्याच सिनेमामध्ये अपयश त्याच्या पदरी आले. त्यानंतर त्याचे गुप्त, सोल्जर सारखे सिनेमा हिट ठरले. मात्र, त्याला करियरमध्ये स्थिरता कधीच नाही मिळाली. आपल्या कुटुंबाची परंपरा पुढे चालवत, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मोठी मुलगी इशा देओलने देखील, कोई मेरे दिलसे पूछे या सिनेमामधून अभिनय क्षेत्रात प्रवेश घेतला.
मात्र भाऊ बॉबी देओल प्रमाणे तिला देखील कधीच यश मिळाले नाही. ईशा देओल आणि अहाना देओल कायमच चर्चेत असतात. मात्र, धर्मेंद्र यांच्या मोठ्या मुली विजेता आणि अजिता आजवर कधीच कॅमेऱ्याच्या समोर आल्या नाहीत. जवळपास सर्वांनाच त्या कशा दिसतात हेदेखील ठाऊक नाही. नुकतंच १९ ऑक्टोबरला सनी देओलने आपला ६५वा वाढदिवस साजरा केला.
त्याच्यासाठी त्याचा भाऊ बॉबीने एक फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे. ‘आज तू ६५ वर्षांचा झाला आहेस. मात्र असे असले तरीही, तुझ्या चेहऱ्यावर, वयस्क माणसाची एक साधी रेख देखील नाही. तुझ्या चेहऱ्यवरच तेज कायम आहे, आणि तू अजूनही तरुणच दिसतो आहेस,’ असं आपल्या पोस्टमध्ये लिहत बॉबीने फोटो शेअर केला. यामध्ये सर्वात खास म्हणजे, त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रथमच त्यादोघांच्या सक्ख्या बहिणी म्हणजेच विजेता आणि अजिताची झलक बघायला मिळाली.
विजेता देओल गिल यांचं लग्न उद्योजक विवेक गिल यांच्यासोबत झाले आहे. आपल्या पतीसोबत त्यादेखील बिझनेस करतात. राजकमल होल्डिंग्स आणि ट्रेण्डिंग्स या कंपनीच्या त्या डायरेक्टर आहेत. तर, अजिता देओल यांचं लग्न, डेंटिस्ट किरण चौधरीसोबत झाले. त्या स्वतः एक उत्तम सायकॅक्ट्रिक आहेत. सध्या, या चार भावंडांचा फोटो सगळीकडेच तुफान वायरल होत आहे.