पवित्र रिश्ता 2.0 मध्ये झाली ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची एन्ट्री, साकारणार महत्वपूर्ण भूमिका..

अंकिता लोखंडे आणि दिवं’गत सु’शांतसिंह राजपूत या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिकेची जादू आजही कमी झालेली नाही. मालिकेला नुकतेच १२ वर्ष पूर्ण झाले आहेत. आता १२ वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या ढंगात मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘पवित्र रिश्ता २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेमुळेच सु’शांत आणि अंकिताला प्रचंड प्रमाणत लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेमध्ये सु’शांत आणि अंकिताची लव्ह स्टोरी एक विशेष आकर्षण होते. यानंतर सु’शांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्या ठिकणी तो यशस्वी अभिनेता झाला. अंकिताने देखील काही चित्रपटात काम केले पण तिला पाहिजे तेवढी लोकप्रियता मिळाली नाही.
मालिकेची घोषणा झाल्यापासून रसिकांमध्येही कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. इतकेच काय तर कोणते कोणते कलाकार मालिकेत झळकणार याचीही रसिकांना उत्सुकता होता. सु’शांत सिंग राजपूतने साकारलेल्या मानवच्या भूमिकेत अभिनेता ‘शाहीर शेख’ दिसणार आहे. तर अर्चना म्हणून अंकिता लोखंडे झळकणार आहे. शाहीर आणि अंकिताच्या लूक सोशल मीडियावर प्रचंड पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली असून सेटवरचे काही फोटो समोर आले आहेत.
विशेष म्हणजे मालिकेत एका मराठी अभिनेत्रीचीही एंट्री झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे रसिकांची लाडकी अभिनेत्री अभिज्ञा भावे. तर मालिकेत रसिकांच्या आवडत्या उषा नाडकर्णी देखील मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. यावेळी ‘पवित्रा रिश्ता 2’ चाहत्यांना ओटीटी वर पाहायला मिळणार आहे.
‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतील अभिज्ञा भावेच्या भूमिकेला रसिकांनी प्रचंड पसंती दिली होती. मोनिका हे पात्र तिने साकारले होते. मालिकेतील मोनिकाला पाहून रसिकांचा तीळपापड व्हायचा. नकारात्मक मोनिका तिने मोठ्या खूबीने साकारली होती. निगेटीव्ह भूमिका पाहून रसिकांना राग यायचा खरा, मात्र तिच्या अभिज्ञाच्या सशक्त अभिनयाला पोचपावती होती.
तिचा नकारात्मक अंदाज रसिकांना भावला होता. यासोबतच अभिज्ञाने सकारात्मक भूमिकाही साकारल्या. मालिकांसह वेबसिरीजमध्येही ती झळकली. ‘कट्टीबट्टी’ मालिकेतल्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते.