बाबोव ! इतका बदलला फँड्रीतील जब्या, समोर आला त्याचा मेकओव्हर आणि डॅशिंग लूक, पाहून तुम्हीही ओळखु शकणार नाही

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा २०१३ साली प्रदर्शित झालेला ‘फॅण्ड्री’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटात अभिनेता सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात या दोघांनी मुख्य भूमिका साकारली होती.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. इतकेच काय त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वच स्तरांतून कौतुक झाले होते. ‘फँड्री’ तील उत्कृष्ट अभिनयासाठी सोमनाथ अवघडे याच्या ‘जब्या’च्या भूमिकेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
एवढ्या कमी वयात बॉलीवुडच्या दिग्गजांकडून शाबासकी मिळवल्यानं कुणीही त्याला छोटा बच्चा म्हणण्याची चूक करणार नाही अशीच इतक्या छोट्या वयाती त्यांची अदाकारी होती. विशेष म्हणजे फँड्री पाहून आमीर खान तर जब्याच्या प्रेमातच पडला होता. इतकंच नाही तर त्यानं जब्याची भेटही घेतली. शिवाय सोशल नेटवर्किंग साईटवरही त्याचं कौतुक केलं होतं. पण तरीही ‘जब्या’ मात्र दुस-या सिनेमात दिसलाच नाही.
फँड्री’साठी तयार नव्हता सोमनाथ:- आधी मी ‘फँड्री’साठी तयार नव्हतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला याबाबत विचारायला लोक यायचे. मी तिथून पळून जात असे. मी गावाच्या टाकीवर जाऊन बसायचो. मला शोधायला लोक कुठून कुठे पळतायत, हे मला टाकीवरुन सगळं दिसायचं. लोक थकून तिथून निघून गेल्यावर मग मी टाकीवरून खाली यायचो. असा खेळ सिनेमासाठी मी होकार देण्याआधी रोज चालायचा,’ असं सोमनाथ सांगतो.
पण आपला पूर्वीचा सर्वाचा लाडका जब्या म्हणजेच सोमनाथ इतक्या वर्षात फार बदलला आहे. आता नुकताच त्याचा डॅशिंग लूक समोर आला आहे. नुकतेच त्याने फोटोशुट केले आहे, मात्र हा त्याचा नवीन लूक पाहून भल्याभल्यांचीही बोलती बंद नाही झाली तरच नवल.
अभिनय कौशल्याबरोबर त्याने त्याच्या लूक्सवरही मेहनत करत डॅशिंग लूक मिळवला आहे. आता जब्याची नवीन स्टाईल स्टेटमेंट रसिकांनाही भावली आहे. त्यामुळेच त्याच्या फॅन्सकडूनही यावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू झाला आहे. सोमनथ त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे तर चर्चेत आहेच पण त्याच्या नवीन लूकमुळेही आता बराच चर्चेत आला आहे.
सोमनाथच्या फॅन्ससाठी हा सिनेमा म्हणजे एक पर्वणीच असणार आहे. यापूर्वीच या सिनेमातील अरबाज सल्य आणि तानाजी लंगड्या ही हिट जोडी जाहीर करण्यात आली आहे. वॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या पोस्टरमध्ये सर्वत्र प्रेमाचाच रंग विखुरलेला आहे. प्रेम आणि प्रेमाच्या विविध छटा पोस्टरमध्ये लक्ष वेधून घेत आहे.
आपणास सांगू इच्छितो कि आपला लाडका जब्या आगामी ‘फ्री हिट दणका’या मराठी सिनेमात पुन्हा एकदा झळकणार आहे. येत्या १६ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील सोमनाथचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.
सोमनाथचा या सिनेमातला लुक पाहून आणि हातात बॅट पाहून हा सिनेमा क्रिकेटच्या अवती भवती फिरणारा तर नाहीना? त्यामुळे सोमनाथला या नव्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. दरम्यान, ‘फ्री हिट दणका’ हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून यात सोमनाथसोबत अभिनेत्री अपूर्वा एस.
ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर अरबाज आणि तानाजी ही सैराटमधील मित्रांची जोडीदेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुनिल मगरे यांनी केलं आहे. तर, निर्मिती अतुल तरडे आणि आकाश ठोंबरे, मेघनाथ सोरखडे यांनी केली आहे.