‘नेहा कक्कर’ला रक्षाबंधनला भाऊ ‘टोनी’ने दिली एवढी मोठी ओवाळणी, नेहाने देखील गिफ्ट म्हणून दिली दुप्पट रक्कम..

आपल्या देशात नुकतंच सगळीकडे, भावा-बहिणीच्या आवडीचा सण रक्षा-बंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या देशातील प्रत्येक भागात रक्षा बंधनचा सण मोठ्या प्रेमाने साजरा केला जातो. या सणाचे विशेष महत्व आहे. भावा बहिणीच्या नात्याला प्रत्येक वर्षी मजबूत करणारा हा सण, देशातील सर्वच जण साजरा करतात.
श्रीमंती-गरिबी या सणात कधीच पहिली नाही जात, म्हणून या सणाला महत्व आहे. सेलिब्रिटीज देखील हा सण मोठ्या प्रेमाने साजरा करतात. एरव्ही, इतर कोणत्याही सणाला हे सेलेब्रिटीज जास्त उत्साहित बघायला मिळत नाही. मात्र, राखीच्या सणाला सर्वच सेलेब्रिटी अगदी उत्साहित असतात. बॉलीवूडमध्ये देखील राखीचा सण आनंदाने साजरा केला जातो.
राखी पौर्णिमा, त्या सणांपैकी एक आहे ज्याला कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे बंधन नाहीये. बॉलीवूडमध्ये देखील, सर्वच धर्मातील सेलिब्रिटीज मोठ्या प्रेमाने राखीचा सण साजरा करतात. अनेक बॉलीवूड कलाकारांनी आणि सेलेब्रिटीजने काल सोशल मीडियावर आपले फोटोज शेअर केले. केवळ सेलेब्रिटीजच नाही तर, सर्वानीच आपले राखीच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहे.
कोणी आपल्या बहिणीला काय गिफ्ट दिले, किंवा कोणी यावर्षी घरी राखी बनवली याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा काल बघायला मिळाली. नेहा कक्कर, टोनी कक्कर आणि सोनू कक्कर हे तिघे भाऊ-बहीण नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नेहा आणि टोनी हे दोघे पण सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असतात.
आपले वेगवेगळे फोटोज आणि आयुष्यात सूरू असलेल्या घडामोडी नेहमीच ते दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असतात. काल रक्षा-बंधनचे देखील फोटोज त्या दोघानी शेअर केले होते. मात्र टोनीने काल, आपल्या बहिणीची चांगलीच फिरकी घेतली. टोनीने आपल्या बहिणीला राखीच्या मुहूर्तावर केलेलं गिफ्टचा खुलासा देखील इंस्टाग्रामवर केला.
आपली बहीण नेहाला त्याने, ओवाळणी दिली. ही रक्कम बघून सगळ्यांनाच आश्चर्य पण वाटले आणि हसायला पण आले. टोनीने आपल्या बहिणीला एक रुपयांची ओवाळणी दिली, आणि त्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली. मात्र नेहाने देखील त्यावर त्वरित प्रतिक्रिया दिली. नेहाने त्याला लगेच दोन रुपये परत केले.
या भावा-बहिणीची ही मस्ती बघून नेटकऱ्यांमध्ये एकच हशा पिटली. काहीनी या मस्तीला ट्रोल केले, मात्र जवळपास सर्वानीच त्यांच्या या मिश्किल शैलीचा आनंद लुटला. टोनी कक्करने आता प्रदर्शित केलेल्या गाण्यामध्ये, सोनू सूदने काम केले आहे. टोनीच्या या गाण्याचे कौतुक होत आहे.
अलीकडच्या काळात नेहा, माध्यमांपासून काही अंतर ठेवत आहे. त्यामुळे तिने इंडियन आयडल शोदेखील सोडला आहे. सध्या, नेहाच्या जागी तिची बहीण सोनू कक्कर इंडियन आयडलची जज आहे. माध्यमांपासून जरी तिने अंतर केले असले तरीही, सोशल मिडीयावर मात्र सक्रिय असते. तिच्या फोटोंचे सगळीकडेच कौतुक होत असते.