नव्या अवतारात दिसणार ‘जय मल्हार’ मधील म्हाळसा, सचित पाटिलसोबत दिसणार नव्या भूमिकेत…

नव्या अवतारात दिसणार ‘जय मल्हार’ मधील म्हाळसा, सचित पाटिलसोबत दिसणार नव्या भूमिकेत…

मनोरंजन 

मालिकाचे विश्व हे पूर्णपणे वेगळे असते. अनेक मालिका आपण बघतो. मात्र त्या काल्पनिक असतात हेदेखील आपल्याला ठाऊक असले तरीही, त्या मालिकेतील भूमिकेशी, त्या पात्रांचे, आपल्याला एक नाते असल्याचे बऱ्याच वेळा जाणवते. अशा अनेक मालिका आहेत ज्यांनी प्रचंड लोकप्रियता प्राप्त केली. आणि त्यामधील पात्र देखील तेवढेच लोकप्रिय ठरले.

सुरुवातीच्या काळात तर मस्करी म्हणून बोलले देखील जायचे की, मालिकेमध्ये जर कुणाचा नवरा वारला तर चक्क घरात शोक असायचा. आता त्या सर्वाचे स्वरूप जरी बदलले असले तरीही, मालिका बघताना अनेक जण चांगले तल्लीन होऊन जातात. अशाच काही सुपरहिट आणि लोकप्रिय मालिकांपैकी एक, मराठी मालिका ‘जय मल्हार’ देखील होती. जय मल्हार या मालिकेने अक्षरशः सर्वांना वेड लावले होते.

या मालिकेतील सर्व पात्र लोकप्रिय ठरले. जेजुरीच्या खंडेरायाची गाथा या मालिकेने पुनः एकदा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली. त्यामुळेच त्या मालिकेतील पात्र देखील घराघरात पोहोचले होते. या मालिकेतील म्हाळसाच्या भूमिकेत झळकलेल्या सुरभी हांडेचा देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे.

तिच्या सुंदर चेहरा आणि स्मितहास्य याने अनेक रसिकांची मने जिंकली होती. या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. त्यानंतर ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेत देखील सुरभीने सप्तशृंगी देवीची भूमिका साकारली होती. आता हीच सुरभी हांडे आपल्याला एका वेगळ्या रूपात आणि एका वेगळ्या मालिकेत बघायला मिळणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर ‘अबोली’ ही नवीन मालिका 23 नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका सर्वसाधारण दिसणाऱ्या मुलीच्या संघर्षाची गोष्ट अबोली या मालिकेतून सांगण्यात येणार आहे. या मालिकेमध्ये मराठमोळा अभिनेता सचित पाटील इन्स्पेक्टरच्या भूमिकेत झळकणार आहे तर, सुरभी हांडे एक प्रमुख पात्र साकारणार आहे.

सिनेमांमध्ये रमलेले अनेक मराठी कलाकार आता पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळलेले दिसतात. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, मुक्ता बर्वे, उमेश कामत या सर्वांनी छोट्या पडद्यावर ती मालिकांमधून पुनरागमन केले आहे. आता यांच्यापाठोपाठ अभिनेता आणि दिग्दर्शक सचित पाटील देखील छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

या मालिकेत तो इन्स्पेक्टरची भूमिका साकारणार असल्याची माहिती काहीच दिवसांपूर्वी समोर आली होती. आता या मालिकेत सुरभी हांडे देखील असल्याचे समजल्यानंतर, रसिकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता बघायला मिळत आहे. या मालिकेच्या कथानकांवर आणि यामध्ये असलेल्या कलाकारांमुळे मालिका बघण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

सचित पाटील त्याच्या या मालिकेमधील आणि साकारणाऱ्या व्यक्तिरेखेबद्दल बोलला की, ‘पुन्हा एकदा मालिकांमध्ये काम करायला मी खूप उत्सुक आहे. स्टार प्रवाह सारख्या वाहिनी सोबत काम करायला मिळत आहे याचा देखील आनंद आहे. पहिल्यांदाच मी स्टार प्रवाह सोबत काम करत आहे. मालिकेचे कथानक मला आवडले म्हणून, मी काम करायला तयार झालो.

खास करून मला माझे पात्र देखील आवडले आणि त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता मी या मालिकेत काम करण्यास होकार दिला. मी बऱ्याच मालिका आवर्जून पाहतो. लिखाणाचा दर्जा पासून कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन या सर्व गोष्टी अनेक मालिकांच्या बाबतीत मला भावतात. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून या कुटुंबाचा भाग होण्याची इच्छा देखील.

अबोली मालिकेच्या निमित्ताने हा योग जुळून आला आणि आता स्टार प्रवाह सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. माझ्या करिअरच्या पहिल्याच सिनेमात मी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. आता त्यानंतर अबोली मालिकेत पुन्हा एकदा मी खाकी वर्दी परिधान करणार आहे. त्यामुळे मी स्वतःच खूप जास्त उत्सुक आहे.’या मालिकेत सुरभी हांडे आणि सचित पाटील व्यतिरिक्त अजून कोणते कलाकार दिसणार आहेत, याबद्दल देखील प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता वाढली आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *