नवीन लतिकाला पाहिलंत का?, ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील लतिका बदलणार असल्याची सुरु होती चर्चा..

‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सध्या प्रेक्षकांची प्रचंड मनोरंजन करताना दिसत आहे. यामध्ये काम करणारी लतिका सगळ्यांनाच आवडत आहे. एका जाड मुलीला खऱ्या आयुष्यामध्ये काम करताना किती अडचणींचा सामना करावा लागतो, यासह इतर विषयावर ही मालिका बेतलेली आहे.
या मालिकेमध्ये लतिकाचे पात्र अक्षया नाईक या अभिनेत्रीने साकारलेले आहे. अक्षया नाईक हिचे वडील देखील दिग्दर्शक होते. काही वर्षांपूर्वी अक्षया हिच्या वडिलांनी ज्ञानेश्वरी नावाचा हा चित्रपट तयार केला होता. या चित्रपटामध्ये अक्षयाची बहिण अक्षता नाईक ही दिसली होती. अक्षता नाईक हिने या चित्रपटात छोट्या ज्ञानेश्वरीची भूमिका साकारली होती.
तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटामध्ये रमेश भाटकर निशिगंधा वाड यांच्या भूमिका होत्या. त्यानंतर मात्र अक्षता ही चित्रपटापासून जणू गायबच झाली. त्यानंतर तिने लग्न केले आणि संसारात रममाण झाल्याचे सांगण्यात येते. अक्षया आणि अक्षता यांच्यामध्ये देखील चांगले बाँडिंग असल्याचे पाहायला मिळते.
दोघीही आपले व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असतात. या व्हिडिओला त्यांचे चहाते देखील खूप मोठ्या प्रमाणात लाईक देखील करत असतात. अक्षया हिचे वडील बापू म्हणजेच उमेश दामले यांनी या मालिकेत चांगली भूमिका केली आहे. मालिकेत अक्षया ही बँकेत नोकरी करत असते, तर उमेश दामले यांच्या पत्नी चित्रा दामले यादेखील खऱ्या आयुष्यामध्ये बँकेत नोकरी करत आहेत.
त्यामुळे अक्षया आणि उमेश दामले यांचे मालिकेमध्ये ट्युनिंग अतिशय उत्तम प्रकारे जमलेले आहे. काही दिवसांपूर्वी अक्षया हिने एका तरुणासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिने सांगितले होते की, ‘एक लडका और एक लडकी दोस्त भी हो सकते है’ मात्र अनेकांनी अक्षया हिचा हा बॉयफ्रेंड असल्याचा समज करून घेतला होता.
हा गैरसमज अक्षया हिने खोडून काढला. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अक्षया ही मालिका सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये होत आहे. मात्र, आम्ही आज आपल्याला याबाबत ची खरी कहाणी सांगणार आहोत. अक्षया ही मालिका सोडणार नसून या मालिकेचा गुजराती रिमेक लवकरच येणार आहे.
गुजराती रिमेकमध्ये ध्वनि उपाध्याय अभिनेत्री दिसणार आहे. गुजराती मालिकेचे नाव ‘मारो मन मोही गयू’असे असणार आहे. त्यामुळे लतिका म्हणजेच अक्षया ही ‘सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका सोडणार नाही. त्यामुळे आपण आता गुजराती मालिकादेखील पाहू शकता.