नगरमधील शेतकऱ्याची कमाल ! IT कंपनीचा जॉब सोडून करतोय ‘या’ प्रकारची शेती, आज एकरात कमवतोय १५ लाख रुपये…

को’रोना’तील लाॅकडाउन अनेकांना आ’र्थिक अड’चणीचा ठरला. मात्र, फत्तेपूर (ता.नेवासे) येथील अल्पभूधारक तरूण शेतकऱ्याने जिद्द आणि कष्टाच्या जोरावर एक एकर शेतीत देशी, परदेशी चारा पीकाच्या माध्यमातून बक्कळ नफा कमावतोय. विशेष म्हणजे या शेतकऱ्याचे शिक्षण अवघे बारावी झाले आहे.
तरी त्याचे शेतीतील व्यवस्थापनशास्त्र वाखाणण्याजोगे आहे. त्याने शेतीतून कमावलेले नफा पाहून आयटी कंपन्यांतील तगड्या पॅकेजवाल्यांचेही डोळे पांढरे होतील. शेती करावी तर अशी…या आशयाची पोस्ट या तरूण शेतकऱ्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियातून फिरत आहे.
करायचं तर वेगळं काही तरी
फत्तेपूर (ता.नेवासे) येथील सोमेश्वर श्रीधर लवांडे या युवकाने सुरुवातीला शनिशिंगणापूर येथे व्यावसाय केला. एका कंपनीत काही वर्ष कामही केले. मात्र, त्याचे दोन्ही ठिकाणी मन लागेना. पत्नी रेणुकासह त्याने आहे त्या एक एकर शेतीत काळ्या आईची सेवा करण्याचा निर्णय घेतला. शेती ‘हटके’ करण्याचा ध्यास घेवून शेतात वेगळा प्रयोग करण्याच्या हेतूने चारा पीकाची निवड केली.
दुधासाठी सकस चारा
सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध सुरू केला. नवनवीन पिकांचा शोध घेताना थायलंडमधील विकसित फोर जी बुलेट सुपर नेपियर या चारा पिकांची माहिती मिळाली. हेच पीक आपल्याकडील पारंपरिक गिनी आणि इतर चारा पिकांना फाटा देईल. हे लक्षात घेवून त्यांनी लागवड केली. कमी वेळेत अधिक उत्पादन आणि दूधासाठी सकस असलेला हा चारा दूध उत्पादक शेतकर्यांच्या पसंतीस उतरला आहे. पुढे त्यांनी इंडोनेशिया, बांगलादेश, ऑस्ट्रेलियातील चारा वाणांची लागवड केली.
स्वतःच केले वाण विकसित
लवांडे यांनी विकसित केलेल्या यशस्वी बियाण्यास फोर-जी बुलेट व इंडोनेशियाचा बाहुबली असे नाव देण्यात आले. चारा बियाणे बरोबरच त्यांनी घास, कडवळ, सुबाभुळ, हातगं, दशरथ व राय घासाचे बियाणे तयार करून विक्री सुरु केली आहे. बियाण्यास देशभरातून ऑनलाईन मागणी वाढल्याने त्यांनी गावातील इतरांची शेती कराराने घेवून चारा लागवड केली आहे. एका वर्षात लवांडे यांनी एक एकर शेतीतून पंधरा लाखाचा नफा कमावला आहे.
चार कर्मचारी फक्त फोन घ्यायला
स्वतः जगण्यासाठी धडपड करत असलेल्या या ध्येयवेड्या युवा शेतक-याकडे आता पंधरा मजूर कामाला आहेत. प्लाॅटची माहिती देणे व देशभरातून येणारे फोन घेण्यासाठी चार जण आहेत. येथे भेट देणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातील सर्व राज्यासह नेपाळ, बांगलादेश व सौदी अरेबियातील शेतक-यांना त्यांनी बियाणे विकले आहे.
वर्षात तीनशे टन चारा
चारा पीकाचा प्रयोग सुरु केल्यानंतर सुरुवातीला अनेकांनी नाव ठेवले. मात्र, सारं सहन करत जिद्द सोडली नाही. एकरी बारा हजार डोळे (बेणे) आवश्यक आहे. सरी पद्धतीने ३ फूट बाय १ फूट अंतरावर लागवड करावी. वर्षात ३ ते ४ कापण्या होतात. हा चारा १५ ते १८ फूट उंच वाढतो. वर्षभरात तीनशे टन चारा त्यातून मिळतो.