‘धोनी’च्या ‘निवृत्ती’नंतर ‘हा’ मराठमोळा खेळाडू सांभाळणार चेन्नईची धुरा ? लवकरच होऊ शकतो ‘या’ खेळाडूच्या नावावर शिक्कमोर्तब…

खेळ
आज वरील भारताचा सर्वोत्तम कर्णधार म्हणून, एम एस धोनीला ओळखले जाते. एम एस धोनीचे केवळ आपल्या देशातच नाही तर, जगभरात असंख्य चाहते आहेत. तशी त्याच्या करिअरची सुरुवात उशिरा झाली मात्र, त्याने आपल्या उत्तम खेळीने जगभरात कीर्ती मिळवली. एक परफेक्ट फिनिशर म्हणून धोनी क्रिकेट विश्वात ओळखला जातो.
असंख्य विक्रमांवर धोनीने आपले नाव कोरले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. त्यावेळी असंख्य क्रिकेट प्रेमींचे मन दुखावले होते. मात्र आयपीएल मध्ये तरी त्याची खेळी बघता येईल याचे समाधान होते. 2008 पासून महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्सची धुरा सांभाळली आहे. चेन्नई सुपर किंग्समुळे देखील, त्याचा खूप मोठा चाहतावर्ग बनलेला आहे.
साऊथमध्ये तर त्याचे चाहते त्याच्यासाठी अक्षरशः वेडे आहेत. मॅच फिक्सिंग आणि इतर गोष्टींमध्ये संघातील काही खेळाडूंचे नाव आल्यामुळे, चेन्नईचा संघ २वर्ष बाद होता. त्यावेळी, चेन्नईच्या संघाचे चाहते, पुन्हा कधी संघ मैदानात उतरतो आणि पुन्हा कधी आपल्या थाला म्हणजेच धोनीला खेळताना बघू यासाठी आतुरलेले होते.
चेन्नईचे चाहते सीएसकेच्या संघाला, धोनीशिवाय बघूच शकत नाही. मात्र, आता आयपीएल मधील त्याची कारकीर्द अंतिम टप्प्यावर आहे. यावर्षी किंवा पुढच्याच सिजन नंतर, आयपीएल मधून देखील धोनी निवृत्त होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयपीएल मधील, सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीला ओळखले जाते.
आतापर्यंत चेन्नई संघाचे नेतृत्व करताना, धोनीने संघाला तीन आयपीएल ट्रॉफीज मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे आता त्याच्या नंतर चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व, म्हणजेच कर्णधारपद कोण सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर या चढाओढी मध्ये सर्वात अव्वल आहे मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचे नाव.
यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या, आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात ऋतुराजने दमदार कामगिरी केली आहे. या दुसऱ्या सत्रात ऋतुराजने सर्वाधिक337 धावा केल्या आहेत. आयपीएल 2019 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये, तो चौथ्या क्रमांकावर कायम आहे. या सीझनमध्ये त्याने 533 धावा केल्या आहेत. चेन्नईसाठी सर्वात जास्त धावा करणारा तो दुसरा खेळाडू आहे.
त्याचबरोबर अनेक अटीतटीच्या सामन्यात, त्याने चांगले प्रदर्शन करून संघाला विजय प्राप्त करून दिला आहे. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार पदाच्या शर्यतीत ऋतुराज गायकवाड हे नाव आघाडीवर आहे. मात्र, याच संघात अष्टपैलू रवींद्र जडेजा देखील आहे. ऋतुराजच्या तुलनेत, रवींद्र जडेजाचा अनुभव जास्त आहे त्यामुळे हे पद त्याच्याकडे जाण्याची देखील शक्यता आहे.
मात्र, एकूणच खेळाडूंचे प्रदर्शन बघता, ऋतुराज गायकवाडचे नाव सर्वाना मान्य आहे. एम एस धोनीकडून त्याने खूप काही शिकले आहे. अटीतटीच्या सामन्यात, संयम न सोडता खेळ खेळून विजय खेचून आणण्याची, धोनीची कला त्याने शिकली आहे. म्हणून, ऋतुराज गायकवाड हेच नाव सध्या सर्वांच्या डोक्यात आहे, असं सांगितलं जात आहे.