ध’क्कादा’यक ! ‘चला हवा…’फेम या कलाकाराने ठोकला शोला रामराम; कारण ऐकून व्हाल चकित…

मनोरंजन
मनोरंजन म्हणजे नक्की काय? रोज दिवसभराचा ता’ण, विसरून काही क्षण शांत होणे, आपला दिवसभराचा त्रास बाजूला ठेवून काही वेळ, खळखळून हसणे म्हणजेच आपले मनोरंजन झाले. मात्र प्रत्येक कार्यक्रमाची रूपरेषा अशी असतेच असं नाहीये. काही कार्यक्रम असतात, जे आपल्याला विचार करायला भाग पडतात.
आपल्या विनोदीशैलीमध्ये प्रेक्षकांना हसवत त्यांचे मनोरंजन करणे सर्वात अवघड कार्य आहे. त्यामुळे कलाक्षेत्रामध्ये, विनोदी कलाकारांना सर्वात जास्त महत्व दिले जाते. अनेक कॉमेडी शो सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये बघायला मिळत आहेत. त्यामध्ये काही कॉमेडी शो वर्षानुवर्षे, रसिकांचे मनोरंजन करत आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ हा देखील त्याच काही मोजक्या शो पैकी एक आहे. चला हवा येऊ द्या, या शोचे चाहते केवळ आपल्या राज्यातच नाही तर, संपूर्ण देशात आहेत. चला हवा येऊ द्या या शोचे काही प्रयोग आपल्या देशाच्या बाहेर, साता समुद्र पार सुद्धा झाले आहेत. चला हवा येऊ द्याची लोकप्रियता, इतकी जास्त आहे कि अनेक बॉलीवूड कळकरांनी या शोमध्ये हजेरी लावली आहे.
सलमान खान, रोहित शेट्टी, रणवीर सिंह सारख्या अनेक दिग्ग्ज बॉलीवूडकरांनी, या शोमध्ये येऊन येथील लाफ्टर थेरपीचा आनंद घेतला आहे. या शोचे असंख्य चाहते आहे. चला हवा येऊ द्या मधील जवळपास सर्वच कलाकार चांगलेच लोकप्रिय ठरले. ‘चला हवा येऊ द्या’या कार्यक्रमाचा टीआरपी देखील कायमच उच्चांकावर असतो. मात्र मागील काही दिवसांपासून चला हवा येऊ द्या या शोचा टीआरपी देखील चांगलाच घसरल्याचे बघायला मिळत आहे.
त्यातच आता अजून एक नवीन सं’कट चला हवा येऊ द्याच्या टिमवर आले आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या शोमधील एका लोकप्रिय कलाकाराने आता शोला रामराम ठोकला आहे. मागील दोन ते तीन आठवड्यांपासून हा कलाकार शोमध्ये बघायला मिळत नव्हता त्यामुळे त्याने हा शो सोडला आहे, असे म्हटले जात होते.
आणि आता त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या शोमध्ये गुंठामंत्री म्हणून ओळखला जाणारा राजगुरुनगरचा कृष्णा घुंगेने हा शो सोडला आहे. चला हवा येऊ द्या, या शोने अनेक नवीन कलाकारांना संधी दिली आहे. अनेक कलाकारांना या शोने एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. त्यापैकीच एक कृष्णा घुंगे देखील आहे.
कृष्णा घुंगे, मूळचा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आहे. कुडे बुद्रुक या छोट्याशा गावातील, कृष्णाची आर्थिक परिस्थिती हलाकीचीच होती. कृष्णाचे वडील भागुजी घुंगे, हे शेतमजुरी करत होते. त्यासोबतच छत्र्या दुरुस्त करणे, गवंडी काम करणे, अशी भेटेल ती छोटी मोठी कामे करून ते आपल्या घराचा उदरनिर्वाह कसाबसा चालवत होते. म्हणूनच त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती.
मात्र चला हवा येऊ द्या मध्ये कृष्णा घुंगेला काम करण्याची संधी मिळाली व त्याने देखील संधीच सोनं केले. त्यानंतर, त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती बर्यापैकी सुधारली. आता हाच कृष्णा घोंगे, लवकरच हिंदी शोमध्ये झळकणार आहे. आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून एक फोटो शेअर करत त्याने याबद्दलची कल्पना दिली आहे.
प्रतीक गांधीसोबत एक फोटो शेअर करत ‘रिस्क है तो इष्क है’ असं कॅप्शन त्याने टाकल आहे. त्यामुळेच ,आता त्याने चला हवा येऊ द्या शो सोडला असल्याची खात्री पटली आहे. तो नक्की कोणत्या हिंदी मालिकेत झळकणार आहे, याबद्दलची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. मात्र त्याच्या चाहत्यांनी त्याच्या या भरारीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहे.