ध’क्कादा’यक ! कोट्यवधींच्या मालकीन असणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री आज वृद्धाश्रमात जगत आहेत हलाखीचे जीवन…

मनोरंजन
चित्रपटसृष्टी ही अतिशय वेगळे जग आहे. कधी कधी एखाद्या सेलिब्रिटीजना सर्वजण अक्षरशः डो’क्यावर घेतात तर कधी, त्यांच्याबद्दल कोणाला काही माहिती देखील नसते. एकेकाळी प्रसिद्ध झालेल्या कलाकारांना चित्रपटसृष्टी काळाच्या ओघात विसरून जाते. त्यानंतर ते कसे आयुष्य जगत आहे, याबद्दल कोणीही विचारपूसही करत नाही.
केवळ बॉलिवूडची नाही तर, मराठी आणि तमिळ सिनेसृष्टी मध्ये देखील हे आपल्याला बघायला मिळते. असे कित्येक कलाकार आहेत, ज्यांनी आपला काळ स्वतःच्या वेगळ्या अशा शैलीने गाजवला होता. मात्र आज अगदी हलाखीचे जीवन जगत आहेत. त्याबद्दल अनेकांना माहिती देखील नसते, आणि जेव्हा समजते तेव्हा चांगलाच उशीर झालेला असतो.
परवीन बाबी, जीनत अमान या काही अभिनेत्री बद्दल असेच काही घडले होते. केवळ बॉलिवुडच नाही तर एका मराठी अभिनेत्री बद्दल देखील अशीच घटना समोर आली आहे. पन्नासच्या दशकात आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटवणाऱ्या चित्रा नवाथे या सध्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत असल्याचे समोर आले आहे.
लाखाची गोष्ट या सुपरहिट मराठी चित्रपटात त्यांनी काम केले होते. या चित्रपटाची लोकप्रियता इतकी जास्त वाढली होती की, अनेक वर्ष तो चित्रपटगुहातच लागलेला होता. 1952 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या चित्रा नवाथे यांनी, त्यानंतर अनेक मराठी चित्रपटात काम केले.
बहिणीच्या बांगड्या, गुळाचा गणपती, राम राम पाहुणे या सारख्या चित्रपटांनी त्यांना प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. मात्र आज त्याच चित्रा नावथे एका साधारण वृद्धाश्रमात अत्यंत हलाखीचे जीवन जगत असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदी सिने इंडस्ट्रीमध्ये काम करत असणाऱ्या राजा नवाथे यांच्यासोबत चित्रा नवाथे यांचे लग्न झाले होते.
प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते अभिनेते शोमन राजकपूर, यांच्यासोबत राजा नवाथे यांनी असिस्टंट डायरेक्टर म्हणून बऱ्याच वेळा काम केले होते. त्यानंतरच चित्रा आणि राजा या दोघांचे लग्न झाले. त्या दोघांना एक मुलगा देखील होता. मात्र काही वर्षांपूर्वी, त्यांच्या मुलाचे एका अ’प’घातात दु’र्दैवी नि’धन झाले. आणि आपल्या मुलाच्या मृ’त्यूच्या बातमीने राजा नवाथे यांना मोठा ध’क्का बसला. आणि काहीच दिवसात त्यांचे देखील नि’धन झाले.
त्यामुळे चित्रा अत्यंत एकाकी पडल्या होत्या. त्यांनी आपल्या भावंडांचा देखील आधार घेण्याचा प्रयत्न केला. जुहू मध्ये चित्रा नवाथे यांचा भला मोठा बंगला आहे पण, सध्या हा बंगला का’यदेशीर वा’दात अड’कला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच त्यांच्या पायाला देखील मोठी जख’म झाली.
त्यामुळे मागच्या वर्षी त्यांना सांताक्रूझ येथील सरला नर्सिंग होम मध्ये ठेवण्यात आले होते. त्यातच गेल्या वर्षी को’रो’ना म’हामा’रीचा उ’द्रेक झाला व नर्सिंग होम चे रूपांतर को को’विड सेंटरमध्ये झाले. त्यानंतर मात्र चित्रा नवाथे कुठे गेल्या हे कोणालाच समजले नाही.
त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्या कोणालाही सापडल्या नाही. काही दिवसांपूर्वी मुलुंड येथील गोल्डन केअर वृद्धाश्रमात त्या असल्याचे समोर आले आहे. त्यांची बहीण अभिनेत्री मीना नाईक यांनी पो’लिसा’त त’क्रार दिली होती. त्यानंतरच, पो’लिसां’नी शोध घेऊन चित्रा नवाथे यांना शोधून काढले असे सांगण्यात येत आहे.