‘देवमाणूस’ मालिका आली नव्या वळणावर, ‘या’ ग्लॅमरस आणि सुंदर अभिनेत्रीची होणार एन्ट्री…

देव माणूस ही मालिका सध्या प्रचंड चालत आहे. मात्र, राज्य सरकारने गेल्या काही महिन्यापासून राज्यामध्ये लॉक डाऊन लावल्याने अनेक मालिकांचे चित्रीकरण बंद पडले होते. मात्र, काही मालिकांनी दिव, दमण, सिलवासा, गुजरात, गोवा येथे जाऊन आपल्या मालिकांचे चित्रीकरण पूर्ण केले आणि आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
मात्र, असे असले तरी काही मालिकांवर याचा प्रभाव पडला आणि त्या मालिकाचे काही भाग पुढे प्रसारित होऊ शकले नाही. देव माणूस ही मालिका सध्या देखील प्रचंड चालत आहे. या मालिकेतील डॉक्टर अजित कुमार देव याचे पात्र आहे. त्याचप्रमाणे डिम्पलचे पात्र देखील प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.
या मालिकेत एसीपी दिव्या सिंह हिची भूमिका अभिनेत्री नेहा खान हिने साकारली आहे. नेहा खान ही मूळची अमरावती येथील रहिवासी आहे. तिने अनेक मालिकामध्ये देखील काम केले आहे. तसेच अनेक चित्रपटात देखील काम केले आहे. या मालिकेत येण्यापूर्वी तिला खूप स्ट्रगल करावे लागले होते. चित्रपटात व मालिकेत काम करण्यासाठी तिच्या कुटुंबियांना खूप विरोध होता.
मात्र, असे असतानाही तिने विरोध पत्करून बॉलिवूडमध्ये आपलं करियर केले. आता या मालिकेतील तिचे पात्र चांगले आहे. अजित कुमार याचा प्रत्येक डाव उधळून टाकत आहे. देव माणूस या मालिकेची कथा ही एका सत्यघटनेवर आधारित आहे. या मालिकेत डॉक्टर अजित कुमार देव याने साकारलेले पात्र हे प्रत्यक्षात घडलेले आहे.
पोळ नामक व्यक्तीने सहा जणांना जि’वं’त मा’रून टाकले होते. अशीच काही कथा या मालिकेत देखील दाखवण्यात आली आहे. या मालिकेमध्ये अजित याला काही दिवसांपूर्वीच एका लग्नमंडपातून अ’टक करण्यात आली. मात्र, या अपमानाचा बद’ला घेण्यासाठी आता तो वेगळाच प्लॅन तयार करत आहे.
अजित कुमार याला डिंपल आणि तिच्या कुटुंबीयांची देखील साथ लाभली आहे. त्यामुळे तो आता चतुराईने सर्वांचा बदला घेण्याची तयारी करत आहे. मात्र, त्याची ही चतुराई दिव्या आणि सरकारी वकील यांना समजली आहे. त्यामुळे त्या देखील आता रणनीती आखत आहेत. आता या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.
ही अभिनेत्री वैजू नंबर वन या मालिकेत दिसली होती. या अभिनेत्रीचे नाव ‘सोनाली पाटील’ असे आहे. आता देव माणूस या मालिकेमध्ये सोनाली पाटील ही वकिलाची भूमिका साकारत आहे. तिच्या भूमिकेचे नाव आर्या देशमुख असे ठेवण्यात आले आहे आणि ती यात नेमकी कोणाची बाजू मांडणार हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे आता या मालिकेमध्ये काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.