‘देवमाणूस’ मधील ‘हा’ कलाकार आजही चालवतो रिक्षा ! कारण वाचून अश्रू होतील अनावर…

आपल्यापैकी अनेकजण रुपरी पडद्यावर झळकण्याचे स्वप्न बघत असतात. यामध्ये अनेकांकडे टॅलेंट असून देखील योग्य प्लॅटफॉर्म न मिळाल्यामुळे हे स्वप्न, स्वप्नच बनून राहते. मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये मुलगा मोठा झाला की त्याने, आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी अशी अपेक्षा असते. श्रीमंती असेल तर, कित्येक वर्ष आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी देता येतात.
मात्र सगळ्यांना हे शक्य होत नाही, आणि मध्यमवर्गीय मुलांना तर नाहीच. काहीच दिवसात कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते आणि मग परिस्थिती सोबत तडजोड करुन ते आपले स्वप्न बाजूला ठेवून इतर काम स्वीकारतात. अश्या वेळी, अनेक व्यक्ती आपली कलेची आवड जपून ठेवतात. परिस्थिती सोबत तडजोड केली असली तरीही, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातपाय मारतच राहतात.
जिद्द आणि मेहनत या जोरावर ते आपले स्वप्न पूर्ण करतातच. अशीच एक प्रेरणादायी यशोगाथा समोर आली आहे, या संघर्षमयी कथेने भल्याभल्यांची डोळ्यात पाणी आणले. देवमाणूस ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेचा चाहतावर्ग भला मोठा आहे.
उत्तम कथानक, रोमांचक थरार आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. सध्या तर ही मालिका अतिशय रोमांचक वळणावर आहे, आणि त्यामुळे या मालिकेच्या नव्या एपिसोडची फॅन्स आतुरतेने वाट बघत असतात. नुकतंच या मालिकेच्या संपूर्ण टीमने, चला हवा येऊ द्या मध्ये हजेरी लावली होती.
चला हवा येऊ द्याच्या मंचावर सर्व कलाकारांनी म्हणजेच नाम्या, बज्या, मंजू, टोन्या ,डिंपल ,मंजू, आजी, बाबू, मंगल आणि डॉक्टर यांनी आपल्या संघर्षाची कथा सांगितली. मात्र यासर्व कथांमध्ये बज्या म्हणेजच किरण डांगे यांच्या, कथेने अक्षरशः सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.
त्यातल्या बज्याचा तर भला मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. आपल्या हटके अश्या शैलीने त्याने ही लोकप्रियता कमवली आहे. या मालिकेत काम करण्यापूर्वी तो कल्याण भागात रिक्षा चालवत होता. या अभिनय क्षेत्रात अस्थिरता असते आणि त्यामुळे आपल्या आणि कुटुंबियांच्या आर्थिक गरजांसाठी तो कल्याणमध्ये आजही रिक्षा चालवत असल्याचं त्यानं सांगितलं.
चला हवा येऊ द्या च्या शूटिंग नंतर त्याने, एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने लिहलं आहे, ‘शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनापासून, आपल्या चाळीतल्या गणपती पासून , पथनाट्य पासून, आज……आज सगळ्यांची लाडकी वाहिनी झी मराठीवरील ‘देवमाणूस’ मालिके पर्यंत आणि आता नट म्हणून काम करताना आयुष्यात एकदा तरी आपल्याला महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वोत्तम व्यासपीठ ठरलेलं ‘चला हवा येऊ द्या’ येथे जायला मिळावं.
हे स्वप्न उराशी बाळगून दिवस-रात्र काम करणाऱ्या, महाराष्ट्रातल्या लाखो नटानंपैकी मी एक. आज मी त्या प्रत्येक माणसाचे आभार मानतो ज्या माणसाच्या कुठल्या ना कुठल्या मदतीमुळे , सपोर्टमुळे , विश्वासामुळे आज इथपर्यंत पोहोचलो. माझ्यासारख्या सर्व सामान्य घरातून नट होऊ इच्छिणाऱ्या सर्व मित्रांना इतकच सांगेन. तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुमच्या अडचणी तुमच्या अडचणींना सांगा तुमची स्वप्न.
‘किरण आजदेखील कल्याण भागात रिक्षा चालवतात, आणि त्याबद्दल त्यांना अभिमानच वाटतो असं देखील त्यांनी सांगितले आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, वय,परिस्थिती असं काहीच महत्वाच नसत; कोणतंही काम छोट किंवा मोठं नसत; असे अनेक मोलाचे संदेश किरण यांच्या या संघर्षामधून त्यांनी दिले आहेत. त्याचा संघर्ष नक्की, अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.