“देवमाणूस’ मधील ‘दिव्या सिंहची’ बहीण दिसते तिच्यापेक्षाही सुंदर, फोटो पाहून चकित व्हाल…

“देवमाणूस’ मधील ‘दिव्या सिंहची’ बहीण दिसते तिच्यापेक्षाही सुंदर, फोटो पाहून चकित व्हाल…

छोट्या पडद्यावर सध्या देव माणूस मालिका ही प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील डॉक्टर अजित कुमार देव याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ही भूमिका किरण गायकवाड या अभिनेत्याने साकारली आहे. किरण गायकवाड याआधी लागिर झालं जी या मालिकेत काम केले होते. ही मालिका देखील प्रचंड गाजली होती.

या मालिकेत देखील त्याचे नकारात्मक पात्र होते. आता देव माणूस मालिकेतील त्याचे नकारात्मक पात्र प्रेक्षकांना चांगलच आवडात आहे. काही दिवसांपूर्वी किरण गायकवाड याने एक मुलाखत दिली होती. आणि सांगितले होते की, माझ्या आईला माझी भूमिकाही अजिबात आवडत नाही. याचे कारणही विशद करताना त्याने सांगितले होते की, कारण की माझ्या आईच्या मैत्रिणीना माझ्या देव माणूस मधील भूमिकेचा खूप राग येत असतो.

तुझा मुलगा किती घा’णेर’डी भूमिका करतो. त्यामुळे आता मला भविष्यामध्ये चांगली भूमिका साकारायची आहे. या मालिकेत एसीपी दिव्या सिंह पात्र साकारणारी अभिनेत्री नेहा खान हिने देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केलेले आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात करताना खूप मोठा स्ट्रगल केला आहे.

याबाबत अनेक मुलाखती व व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. नेहा खान अमरावतीची रहिवाशी आहे. तिचे वडील मुस्लिम होते, तर आई हिंदू होती. तिच्या वडिलांनी त्या काळात प्रेम विवाह केला होता. तिची आई तिच्या वडिलांची तिसरी बायको होती.

त्यामुळे अनेक जण या विवाहाला विरोध करत होते. तरीदेखील या दोघांनी विवाह केला होता. नेहा खानच्या वडिलांच्या घरच्यांनी तिच्या आईला खूप त्रा’स दिला होता. कारण त्यांना असे वाटत होते की, या संपत्तीमध्ये भागीदार होतील.

नेहाच्या वडिलांच्या कुटुंबीयांनी तिच्या आईला बे’दम मा’रहा’ण केली. यामध्ये तिच्या डोक्याला 370 टाके पडले होते. त्यामुळे आई ही घरीच राहत. याच कारणामुळे नेहा खान हिला लहान वयातच काम करावे लागायचे. कालांतराने ती अभिनेत्री बनण्यासाठी थेट मुंबईला पोहोचली. त्यानंतर तिने काही जाहिराती व मॉडेलिंग क्षेत्रात मध्ये काम केले. त्यानंतर तिला देव माणूस ही मालिका मिळाली.

आता देव माणूस मालिका ही प्रचंड गाजत असताना नेहा खान ही डॉक्टर अजित कुमार देव याचे पितळ उघडे पडणार असे सध्या वाटत आहे. मात्र, उलट तपा’सणी मध्ये अजित कुमार देव हा यशस्वी झाल्याने तो तु’रुंगातून सुटतो, असेही वाटत आहे. मात्र, सरकारी वकील आर्या ही आता नवा डाव टाकणार असल्याचेही समजते. नेहा खानला तिच्या खाजगी आयुष्यामध्ये एक भाऊ आहे.

मात्र, तिला बहिण आहे की नाही, हे अजूनही कुणाला माहीत नाही. नेहा खान ही कृषिका शर्माची बहीण असल्याचे सांगण्यात येते. ती अनेकदा कृषीकाचे फोटो अपलोड करत असते. तसेच अनेक सार्वजनिक कार्यक्रमात दोघेही एकत्र फिरताना दिसत असतात. त्यामुळे नेहा खानची कृषीका ही सख्खी बहीण नसली तरी बहिणी पेक्षा कमी नाही, असेही सांगण्यात येते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *