‘देवमाणूस’मध्ये नवीन ठसकेबाज अभिनेत्रीची एंट्री, पाहून देवीसिंगलाही येणार भोवळ! साकारणं ‘ही’ महत्वाची भूमिका..

‘देवमाणूस’मध्ये नवीन ठसकेबाज अभिनेत्रीची एंट्री, पाहून देवीसिंगलाही येणार भोवळ! साकारणं ‘ही’ महत्वाची भूमिका..

देव माणूस ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर अतिशय गाजत आहे. या मालिकेचे अपडेट आपल्याला रोज मिळतच असतात. सोशल मीडियावर या मालिकेचे भाग हे एक दिवस आधी दाखवण्यात येतात. देव माणूस ही मालिका सत्यघटनेवर आधारित आहे. सातारा जिल्ह्यामध्ये एका गावांमध्ये ही घटना काही वर्षांपूर्वी घडली होती.

काही वर्षांपूर्वी संतोष पोळ नावाच्या बोगस डॉ’क्टरला अ’टक करण्यात आली होती. संतोष पोळ याने बोगस डिग्री धारण करून लोकांवर उपचार केले होते. यामध्ये काही लोकांना बरे देखील वाटले होते. त्यांच्यासाठी तो देव माणूस ठरला होता. मात्र, काही लोकांना अजिबात बरे वाटले नाही आणि गं’भीर त्रा’साला सामोरे जावे लागले आहे.

अशा लोकांना तो महागडे औ’षध उपचार करावे लागतील असे सांगायचा. तर काही जणांनी त्याचे पितळ उघडे पाडले होते. अशा लोकांना संतोष पोळ यांनी ठा’र मारून आपल्या फार्महाऊसवर गा’डले होते. यासाठी एका महिलेने देखील त्याला मदत केली होती. मालिकेमध्ये अजित कुमार देव याने देव माणूस ही भूमिका साकारली आहे. मालिकेत त्याचे टोपन नाव देवीसिंग देखील आहे.

त्याला डिंपल या सहकलाकार हिने देखील मदत केलेली आहे. या मालिकेतील मंगल, सरू आजी, एसीपी दिव्या सिंह, सरकारी वकील आर्या यांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. तर बजा हे पात्र देखील चांगलेच गाजत आहे. मध्यंतरी बजा याचा एक व्हिडिओ व्हा’यरल झाला होता. यामध्ये तो रिक्षा चालवताना दिसतो.

अभिनया शिवाय मी रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतो, असे त्याने सांगितले होते. तसेच गेल्या काही भागांमध्ये अजित कुमार देव याची उलटतपासणी झालेली आहे. उलट तपासणीमध्ये तो आता वाचताना दिसत आहे. तर कोर्ट त्याला आता निर्दोष सोडण्या च्याच भूमिकेपर्यंत पोचलेले आहे. त्यामुळे एसीपी दिव्या सिंह आणि आर्या यांची चिंताही खूप वाढलेली आहे.

तर दुसरीकडे डिंपल आणि अजित कुमार देव हे चांगलेच खूश झालेले आहेत. मात्र, आता मालिकेमध्ये नव्याने एका व्यक्तीची एन्ट्री होणार आहे.कोर्टामध्ये सुनावणी सुरू असतानाच एक महिला अचानक पणे न्यायाधीशासमोर येते. या वेळी अजित कुमार देव हा या महिलेला पाहून चक्कर येऊन खाली कोसळतो. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, ही महिला नेमकी आहे तरी कोण? हे आपल्याला येणारे भागांमधील समजणारच्च आहे.

मात्र, आम्ही आपल्याला या महिलेविषयी माहिती देणार आहोत. ही भूमिका माधुरी पवार हिने साकारली आहे. माधुरी पवार ही खूप मोठी यूट्यूब, टिक टॉक की स्टार आहे. माधुरी पवार ही मुळशी खानदेशामधली रहिवासी आहे. तिचा जन्म 21 मार्च 1993 रोजी शिरपूर येथे झालेला आहे ती केवळ 28 वर्षाची आहे.

तिने इंस्टाग्राम, युट्यूब आणि इतर समाज माध्यमावर आपली चांगली छाप सोडली आहे. तिचे जवळपास दीड लाख फॉलोअर्स आहेत. नंदुरबार येथील राजे शिवाजी महाविद्यालय तिने शिक्षण पूर्ण केलेले आहे. तर तिने शहादा येथे इंजिनिअरिंग मध्ये इलेक्ट्रिक अँड कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. अप्सरा आली या झी युवा या मालिकेत दिसली होती. आता देव माणूस या मालिकेत तीची एन्ट्री झाल्याने तिच्या वाट्याला नेमकी काय भूमिका आहे, हे येणाऱ्या भागामध्ये कळणार आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *