‘देवमाणूस’मध्ये अस्सल गावठी दिसणारी ‘वंदी आत्या’ खऱ्या आयुष्यात आहे अगदी मॉडर्न, PHOTO पाहून व्हाल चकित..

गावाकडचे कथानक असणाऱ्या मालिका नेहमीच जबरदस्त हिट ठरल्या आहेत. गावाकडचं आयुष्य मालिका, किंवा सिनेमांमधून जेव्हापण पडद्यावर दाखवले जाते, तेव्हा प्रेक्षकांनी त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. लागीर झाली जी, तुझ्यात जीव रंगला अश्या काही मालिका आहेत ज्यामध्ये गावाकडचे आयुष्य दाखवले होते आणि या मालिकांनी लोकप्रियतेचे शिखरं गाठली.
नेहमीच अश्या मालिकांना आणि या पात्रांना भरगोस प्रितिसाद मिळत राहिला आहे. सध्या झी मराठीवर अशीच मालिका सुरु आहे ज्यामध्ये, गावाकडचे आयुष्य आणि त्यांचे जीवन दाखवण्यात येत आहे. या लोकप्रिय मालिकेचे देवमाणूस असं नाव आहे. या मालिकेने, सुरुवातीपासूनच जबरदस्त चर्चा रंगवली आले.
या मालिकेचे कथानक, पात्र इतके सुंदर पद्धतीने रंगवले आहे कि कायमच त्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटतो मात्र, त्याचा खरा चेहरा तोच असतो असे नाही तो अनेकवेळा वेगळा असू शकतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरून घात करणाऱ्या, अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी देवमाणूस असे या मालिकेचे कथानक आहे.
एक बो’गस डॉ’क्टर, गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भुरळ पाडतो. आणि अल्पावधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. मात्र, या देवमाणसाच्या बुरख्याआड एक असा चेहरा लपलेला आहे ज्याची कधीच कोणी कल्पना केली नाही. या मालिकेतील रोमांच आणि थरार यामुळे अल्पावधीतच यशाचं शिखरं गाठलं आहे.
या मालिकेच्या सर्वच पात्रांनी भरपूर लोकप्रियता कमावली आहे. या मालिकेतील वंदी आत्या आपल्या खास अश्या गावठी आणि हटके अंदाजामुळं चांगलीच लोकप्रिय झाली आहे. मात्र, मालिकेत गावठी दिसणारी ही वंदी आत्या म्हणजेच पुष्पा चौधरी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि मॉडर्न आहे. आपल्या खऱ्या आयुष्यात पुष्पा यांनी बऱ्याच सौंदर्यस्पर्धा देखील जिंकल्या आहेत.
त्या कलाक्षेत्रात भरपूर सक्रिय आहेत. बाबो या सिनेमात देखील त्यांनी काम केलं आहे. मात्र त्यांना खरी ओळख वंदी आत्या म्हणूनच मिळाली. त्यांचं हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे आणि त्यामुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. आपल्या सौंदर्यस्पर्धा आणि इतर कामाचे फोटो पुष्पा नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात.
त्यांच्या या फोटोजला बघून नेहमीच चाहते लाखोने लाईक्स करत असतात. अभिनयासोबतच पुष्पा यांना गायनाची देखील खूप आवड आहे. त्या सोशल मीडियावर त्यांचे काही व्हिडीओ शेअर करत असतात. या व्हिडियोंवर लाईक्सचा अक्षरशः वर्षाव होतो. सोशल मीडियावर त्यांचे भरपूर फॉलोवर्स आहेत आई नेहमीच त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात.
देवमाणूस मालिकेत सध्या त्या वाड्याच्या हिस्स्यासाठी भांडताना दिसतात. त्यांचं हे पात्र प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय होताना दिसत आहे. मात्र, त्यांचे सुंदर आणि मॉडर्न फोटो बघून तुम्ही देखील चकित व्हाल. मालिकेत साध्या आणि गावरान भूमिकेत असणाऱ्या वंदी अत्याचा हॉ’ट आणि मॉडर्न अवतार सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत.