‘दृश्यम’ चित्रपटातील चिमुकली झालीय मोठी, आता दिसते इतकी सुंदर आणि ब्युटीफूल की ओळखणेही झाले कठीण…

मनोरंजन
मनोरंजन विश्वामध्ये कायमच बालकलाकारांना दाद मिळत आली आहे. काही बालकलाकार आपल्या उत्तम अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करतात. त्यातच काही बालकलाकार इतका उत्तम अभिनय करतात की, त्यांचं निरागस चेहरा कायमच चाहत्यांच्या मनात राहतो.
बालकलाकार ते प्रसिद्ध अभिनेता किंवा अभिनेत्री हा प्रवास अनेक कलाकारांनी, बॉलीवुड आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील पूर्ण केला आहे. केवळ बॉलिवुडच नाही तर मराठी चित्रपटसृष्टी मध्ये देखील, अनेक बाल कलाकारांनी आज अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून काम केला आहे. प्रसिद्ध अभिनेते सचिन, यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती.
आणि आज पासष्टी गाठल्यानंतर देखील मराठी चित्रपटसृष्टी मध्ये ते काम करतच आहेत. अलीकडच्या काळात केतकी माटेगावकर हिने शाळा सिनेमांमधून, बाल कलाकार म्हणून मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केले होते. आज बऱ्याच मराठी सिनेमांमध्ये अभिनेत्री म्हणून ती काम करत आहे. अशी अनेक उदाहरणं मराठी चित्रपटसृष्टी मध्ये देखील बघायला मिळतात.
त्यातच काही चिमुकले आपल्या अभिनयाची इतकी उत्तम छाप सोडतात की, त्यांना विसरणे शक्य होत नाही. त्यापैकीच एक आहे ‘दृश्यम’ सिनेमा मधील ती बालकलाकार. 2015 मध्ये दृश्यम सिनेमा मध्ये अजय देवगनच्या छोट्या मुलीची भूमिका साकारणारी मृणाल जाधवचे नुकतेच काही फोटोज इंटरनेटवर वायरल होत आहेत.
बऱ्याच मराठी सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. दृश्यम सिनेमा मध्ये अगदी छोट्याशा वयात तिने केलेला इतका उत्तम अभिनय पाहून सर्वजण थक्क झाले होते. चक्क अजय देवगनने देखील, तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक केले होते. 2013 सालि राधा ही बावरी या मालिकेमधून मृणाल ने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती.
त्यानंतर 2014 साली रितेश देशमुखचा लय भारी या चित्रपटात देखील तिने काम केले होते. तेव्हा तिची चिमुकल्या रखुमाई ची भूमिका सर्वांच्याच मनाला भोवली होती. तु ही रे या स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांच्या सिनेमांमध्ये देखील, त्यांच्या मुलीचे काम मृणालने केले होते. त्याचबरोबर नागरिक, कोर्ट, टाइमपास, अंड्याचा फंडा या चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे.
तिचे व्हायरल होणारे फोटोज पाहून तिला ओळखणे देखील अवघड झाले. आहे अस्सल मराठमोळा साज, जरीची साडी, दागिने, नथ आणि कपाळावर चंद्रकोर यामुळे तिच्या सौंदर्यात अजूनच भर पडली आहे. आता ही मृणाल मोठी झाली आहे. तरीही सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते.
पुढील येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल मृणाल सांगते की, ‘मला हवे तसे उत्तम काम माझ्यापर्यंत येत नाहीये. चांगल्या आणि उत्तम स्क्रिप्टच्या शोधात मी आहे. जर चांगली स्क्रिप्ट मिळाली तर, नक्कीच मला पुन्हा काम करायला आवडेल. अभिनयासोबतच मी माझ्या अभ्यासावर देखील सध्या लक्ष केंद्रित करत आहे.’ मृणाल जाधवचा अस्सल मराठमोळा साज नेटकऱ्यांच्या मनाला चांगलाच भावला आहे. ‘लय भारी’, असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी तिच्या फोटो वर कमेंट केले आहेत. तिच्या या फोटोवर लाईक्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे.