दिसण्यावरून ट्रॉल व्हायची रेमो डिसूजाची पत्नी, आता झाला एवढा मोठा बदल की बॉलिवूड अभिनेत्री झाल्या चकित..

मनोरंजन
आपल्यापैकी अनेकांना सेलिब्रिटीजच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असते. आपल्या वैयक्तिक आयुष्य मध्ये सेलिब्रिटीज जसे समोर दिसतात तसेच आहेत का, असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो.
आणि कायम प्रकाशझोतात राहण्यासाठी हे सेलिब्रिटीज देखील आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी आपल्या पर्यंत पोहोचवत असतात. पम अनेक वेळा मोठाले दिग्दर्शक निर्माते यांच्या पत्नी समोर येतच नाहीत. कित्येक वर्षांनी समजते की, अमुक एका दिग्दर्शकाची किंवा निर्मात्याची किंवा अभिनेत्याची पत्नी कोण आहे.
मात्र आता आजच्या डिजिटल युगामध्ये जवळपास सर्वांचे सोशल मीडिया अकाउंट आहे. त्यामुळे सेलिब्रिटीजच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्यापैकी माहिती चाहत्यांना नेहमीच मिळत राहते. सहाजिकच ज्याप्रकारे सेलिब्रिटीजच्या सोशल मीडिया अकाउंट आहे त्या प्रकारे त्यांच्या कुटुंबियांचे देखील आहेत. त्यावरून सेलिब्रिटीजच्या कुटुंबीयांची ओळख आपल्याला होते.
असे अनेक सेलिब्रिटीज आहेत ज्यांचे कुटुंबीय बरेच दिवस सर्वांसाठी अनोळखी होते. त्यापैकीच एक आहेत लिझेल डिसूजा, त्या प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजा यांची पत्नी आहेत. एका रियालिटी शोच्या दरम्यान रेमो यांनी आपल्या पत्नीची ओळख संपूर्ण जगाला करून दिली होती. त्यापूर्वी अनेक वेळा त्यांनी आपल्या पत्नी सोबत मोठाल्या समारंभा मध्ये एन्ट्री घेतली होती.
मात्र या रियालिटी शोमध्ये आपल्या संघर्षामध्ये पत्नीची साथ किती महत्त्वाची होती हे रेमुने सर्वांना सांगितले. आपले काही अस्तित्व नसताना लिझेलने आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याशी लग्न केलं. त्यानंतर कायमच ती रेमोच्या आयुष्यामध्ये त्याचा प्रयत्न स्तोत्र बनली. या दोघांचे लव मॅरेज होते. तसे बघता रेमो डिसूजा अगदी फिट सेलिब्रेटी आहे.
मात्र त्याची बायको लिझेल चांगलीच जाड होती. डान्स प्लस रियालिटी शोमध्ये देखील ती कमालीची सुंदर दिसत होती मात्र, तिचे वजन हा मोठा मुद्दा होता. लग्नाच्या नंतर, मुले झाल्यानंतर लिझेलचे बरेच वजन वाढले होते. आणि इतर सर्वसामान्य बायकांनी प्रमाणे तिने देखील त्याकडे दुर्लक्ष केले होते. पण तिने आपले वाढलेले वजन कमी करायचे चांगलेच मनावर घेतले.
आणि एक मोठा ट्रान्सफॉर्मेशन तिच्यामध्ये बघायला मिळत आहे. तिचा एक फोटो सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहे. हा फोटो खुद्द रेमोने शेअर केला आहे. या पोस्टमध्ये रेमोने लिहिले आहे की, ‘या फिटनेस लेवल पोहोचण्यापूर्वी खूप सारी मेहनत करावी लागते. स्वतः सोबतच मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र एकदा त्या संघर्षावर विजय मिळवल्यावर, कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होताना दिसते.
तू खूप सुंदर दिसत होतीस, आणि दिसत आहेस. माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस.’ त्याच्या या पोस्टवर भरभरून लाईक आणि कमेंट येत आहेत. जय भानुषालीने देखील, ‘शानदार लिझेल’ म्हणत तिचे कौतुक केले आहे. सोबतच वरून धावनने देखील, मनाला स्पर्श करणारा ईमोजी पाठवत ‘वाह’ असे कमेंट केले आहे. आधीच सुंदर असलेली लिझेल, वेटलॉस नंतर तर अधिकच जास्त सुंदर दिसत आहे.