दिलीप कुमार यांच्यानंतर बॉलिवूडला आणखी एक धक्का ! ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्मात्याचे निधन…

दिलीप कुमार यांच्यानंतर बॉलिवूडला आणखी एक धक्का !  ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्मात्याचे निधन…

मुघले-ए-आझम, अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, गंगा जमूना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर हे असे सिनेमा आहेत, ज्यांचे रिप्लेसमेंट बॉलीवूडमध्ये होऊच शकत नाही. या सिनेमांचे प्रमख आकर्षण होते दिलीप कुमार. आजही या सिनेमांचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत.

केवळ, जुने लोक किंवा सत्तरच्या दशकातील लोकच नाही तर, आजच्या दशकातील प्रेक्षक देखील या सिनेमाचा आनंद घेतात. आपल्या दमदार अभिनयाने या सिनेमाचा दर्जाचं दिलीप कुमार यांनी उंचावला होता. दिलीप कुमार यांनी १९४०-७० अशी जवळपास तब्बल तीन दशकं, आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली होती.

त्यामुळेच,आजही भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार, स्ट्रगलर्स त्यांना आपला आदर्श मानतात. बऱ्याच कलाकारांनी, त्यांची नक्कल करत बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. बॉलीवूड मधील ट्रॅजिडी किंग म्हणजेच दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचं बुधवारी सकाळी नि’धन झालं आहे.

दिलीप कुमार याना माघील काही दिवसांपासून, श्वा’स घेण्यास त्रा’स होत होता. त्यामुळे त्यांना मुंबई येथील हिंदुजा रु’ग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान, ९८ वर्षांच्या दिलीप कुमार यांनी आज पहाटे अखेरचा श्वा’स घेतला.

दिलीप कुमार यांच्या दु:खातून बाहेर पडण्याआधीच भारतीय प्रेक्षकांना आणखी धक्का बसला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते कुमार रामसे याचं नि’धन झालं आहे. ते 85 वर्षांचे होते. 8 जुलै रोजी सकाळी 5.30च्या सुमारास त्यांना का’र्डिअ‍ॅक अ’रेस्टच्या झ’टक्यामुळे त्यांची प्रा’णज्योत मालवली. कुमार रामसे हे भयपटांसाठी प्रसिद्ध होते.

ते आणि त्यांचे भाऊ रामसे ब्रदर्स या बॅनरखाली हॉरर चित्रपटांची निर्मिती करायचे. त्यांच्या नि’धनामुळे भारतीय सिनेसृष्टीतीला आणखी एक ध’क्का बसला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर रोमँटिक चित्रपट तयार केले जातात. परंतु कुमार रामसे हे पहिले निर्माते होते ज्यांनी भयपटांच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. त्यांनी पुराना मंदिर, साया, खोज, दरवाजा, और कौन, दहशत यांसारख्या अनेक सुपरहिट भयपटांची निर्मिती केली. त्यांनी हॉरर चित्रपट पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता.

70-80च्या दशकात त्यांच्या चित्रपटांची तुलना अनेकदा जगप्रसिद्ध हॉररपट निर्माते अल्फ्रेड हिचकॉक यांच्याशी केली जायची. मात्र गेल्या काही काळात ते वाढत्या वयामुळे फिल्मी दुनियेपासून दूर होते. कुमार रामसे यांच्या नि’धनामुळे भारतीय सिनेसृष्टीचं कधीही भरून काढता येणार नाही असं नुकसानं झालं आहे. अशा प्रतिक्रिया देत चाहत्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *