दिग्दर्शक संजय जाधव यांच्या मुलीचा लूक पाहून तोंडात बोटे घालाल, तिचे डान्सचे व्हिडीओ होतात व्हायरल…

दिग्दर्शक संजय जाधव यांच्या मुलीचा लूक पाहून तोंडात बोटे घालाल, तिचे डान्सचे व्हिडीओ होतात व्हायरल…

मनोरंजन

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव यांनी आजवर अनेक चित्रपटात दिग्दर्शकाची भूमिका वठवली आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेले सर्व चित्रपट जवळपास हिट झालेत जमा आहेत. संजय जाधव यांनी आजवर जवळपास मराठीला 50 हून अधिक चित्रपट दिले आहेत.

या चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत. काही चित्रपटांसाठी त्यांनी दिग्दर्शन केले आहे, तर काही चित्रपटासाठी ते सहाय्यक दिग्दर्शन राहिलेले आहेत. संजय जाधव यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती दुनियादारी या चित्रपटानंतर. दुनियादारी हा चित्रपट त्यांचा प्रचंड गाजला होता.

प्रसिद्ध दिवंगत कादंबरीकार सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित दुनियादारी चित्रपट होता. 80 च्या दशकामध्ये ही कादंबरी प्रचंड गाजली होती. या कादंबरीचा चाहता वर्ग आणि वाचक वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणात होता.या कादंबरीवर आधारित संजय जाधव यांनी दुनियादारी हा चित्रपट केला होता.

या चित्रपटांमध्ये स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर उर्मिला कानेटकर यांच्यासह अंकुश चौधरी याची देखील भूमिका होती. 2013 मध्ये आलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत प्रचंड धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. संजय जाधव यांनी सगळ्यात आधी सावरखेड एक गाव या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली होती.

या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे, आदिती सारंगधर, सदाशिव अमरापुरकर, हर्षदा खानविलकर यांच्यासह इतर अभिनेता व अभिनेत्री च्या भूमिका होत्या. हा चित्रपट त्या वेळेस खूपच गाजला होता. गावाभोवती पडणारे दरोडे आणि चोरट्यांचा धुमाकूळ, त्यांची असणारी दहशत असे कथानक या चित्रपटाचे दाखवण्यात आले होते. हा चित्रपट यशस्वी झाला होता.

त्यानंतर संजय जाधव यांनी डोंबिवली फास्ट या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट संदीप कुलकर्णी यांनी आपल्या अफलातून अभिनयाने गाजवून सोडला होता. त्याचप्रमाणे जोगवा, मुंबई मेरी जान, सी कंपनी, रिंगा रिंगा, प्यार वाली लव स्टोरी, तु हिरे, गुरु, येरे येरे पैसा या सारख्या चित्रपटातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

संजय जाधव यांच्याकडे आगामी काही काळात आणखी चित्रपट असल्याचे देखील सांगण्यात येते. संजय जाधव यांनी जवळपास पन्नास चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शन, कोरिओग्राफर, फोटोग्राफर त्याचप्रमाणे दिग्दर्शन या देखील भूमिका वठवलेल्या आहेत. आता संजय जाधव यांची मुलगी देखील चित्रपटामध्ये येण्यासाठी सरसावली आहे.

संजय जाधव यांच्या मुलीचे नाव धित्री जाधव असे आहे. धित्री सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले व्हिडिओ देखील अपलोड करत असते. तिला डान्स करण्याचा खूप नाद आहे. ती डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. तिचा लाखोमध्ये फॅन फॉलॉवर आहे. त्यामुळे ती आता लवकरच मराठी चित्रपट सृष्टी मध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *