दादा कोंडकेंच्या घराची दयनीय अवस्था; प्रथमेश परबने शेअर केला फोटो, म्हणाला; आता दादा आपलेच घर पाहून हसत असतील…

काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक नाव धुमाकूळ घालत होते. या तरुणाचे नाव होते कृष्णा कोंडके. म्हणजेच कालांतराने हे नाव मराठीसह हिंदीमध्ये ही प्रसिद्ध झाले ते दादा कोंडके म्हणून. दादा कोंडके यांनी आपल्या आयुष्यात अनेक अजरामर चित्रपटाची निर्मिती केली. दादा कोंडके यांचे नाव काही काळ शिवसेनेसोबत देखील जोडले गेले.
दादा कोंडकेची आठवण आता येण्याचे कारण म्हणजे त्यांचे राहते घरी आता मोडकळीस आले आहे आणि याबाबत एका अभिनेत्याने पोस्ट केली आहे. याबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. दादा कोंडके यांनी अनेक हिट अशा चित्रपटांची निर्मिती केली. त्याचबरोबर त्यांचे आयुष्य देखील वा’दग्र’स्त असे राहिलेली आहे.
दादा कोंडके यांचे उषा यांच्यावर प्रेम होते, असेही या वेळी सांगण्यात येत होते. मुंबईमध्ये ज्यावेळेस मराठी चित्रपटांना सिनेमागृह भेटत नव्हती, त्यावेळेस त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी दादा कोंडके यांच्या चित्रपटासाठी चित्रपटगृह उपलब्ध करून दिले.
त्यानंतर दादा कोंडके आयुष्यभर शिवसेनेशी जोडून राहिले. दादा कोंडके यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. दादा कोंडके यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले 9 चित्रपट सिल्वर जुबली झाले होते. या चित्रपटाचे वर्ल्ड रेकॉर्ड देखील झाले होते. गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली होती. दादा कोंडके यांचा जन्म गोकुळाष्टमीला झाला होता.
त्यामुळे त्यांचे नाव कृष्णा असे ठेवण्यात आले होते. विच्छा माझी पुरी करा, एकटा जीव सदाशिव, सोंगाड्या आणि इतर चित्रपटामुळे ते अजरामर झाले. त्यांच्या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे द्विअर्थी संवाद. द्विअर्थी संवा दाने ते अनेकांना आपलेसे करायचे. दादा कोंडके हे विवाहित होते. मात्र सामान्य लोकांमध्ये त्यांची अशी प्रतिमा होती की ते अविवाहित आहेत.
त्यांना अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या सोबत लग्न करायचे होते. मात्र, उषा यांनी लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे ते चांगलेच संतापले होते. यावर त्यांनी आपल्या आत्मचरित्रात उषा यांच्यावर टीका केली होती. अभिनेता प्रथमेश परब याने दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्रथमेश याने दादा कोंडके यांच्या जुन्या घराचा फोटो शेअर केला आहे.
ते घर मोडकळीस आले आहे. निळ्या आसमंतात महाराष्ट्राच्या सुपरस्टारचे हे घर मोडकळीस आले आहे, असे त्याने पोस्ट करून सांगितले आहे. या सुपरस्टारला नमन असे देखील तो म्हणाला. त्याच्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी लाईक शेअर केले आहे. तसेच दादा कोंडके यांना अभिवादन देखील केले आहे.