दहा सामन्यांमध्ये तब्बल 67 विकेट घेऊनही दहा वर्षात अजूनही ‘या’ क्रिकेटपटुची निवड का झाली नाही?

ऑल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन साठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय टीमची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये अनेकांना संधी देण्यात आली आहे. मात्र, भारतामध्ये असे काही गोलंदाज आहेत की, ज्यांनी रणजी, स्थानिक क्रिकेटमध्ये अतिशय चमकदार अशी कामगिरी केली आहे.
मात्र, तरीदेखील अशा खेळाडूंचे या टीम मध्ये सेलेक्शन का झाले नाही? असा प्रश्न आता अनेक जण विचारत आहेत. जयदेव उनादकट हा खेळाडू अतिशय सध्या मेहनत करत आहे. मात्र, असे असूनही त्याची निवड या संघांमध्ये झाली नाही. त्यामुळे अनेक जण टीकेची झोड उठवत आहेत. काही वर्षांपूर्वी देखील असेच होते.
काही ठराविक खेळाडू यांना क्रिकेट टीम मध्ये संधी मिळायची. मात्र, नवीन खेळाडू अजिबात क्रिकेटमध्ये येत नसे. एक काळ असा होता की, ठरलेले खेळाडू 11 खेळाडू मध्ये असायचे. यामध्ये सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड, सौरव गांगुली, मोहम्मद अजहरुद्दिन, अजय जडेजा यांचा समावेश असायचा.
मात्र, असे असूनही रॉबिन सिंग याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायला फार उशीर झाला होता. त्याच्याकडे खूप प्रतिभा होती. तरी देखील तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट जास्त काळ खेळू शकला नाही. त्याची निवड समितीने लवकर निवड केली नाही, असे सांगण्यात येत असते. सध्याच्या भारतीय टीम मध्ये देखील असेच काहीसे होते.
अनेक खेळाडू असे प्रतिभावंत आहेत. आयपीएल सामन्यांमध्ये त्यांनी दमदार असे परफॉर्मस केले आहे. तरी देखील त्यांचा समावेश आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये का होत नाही, असा सवाल विचारण्यात येत आहे. काही वर्षापूर्वी सचिन तेंडुलकर सोबत विनोद कांबळी हा त्याचा मित्र हा देखील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होता.
मात्र, त्याला वारंवार संधी देऊन देखील तो अपयशी ठरत होता. अतिशय दर्जेदार असा हा खेळाडू होता. मात्र, आपल्या अवगुणांनी तो आपले करिअर ब’रबा’द करून बसला. त्यानंतर देखील त्याने अनेकदा संधी मिळूनही स्वतःला सिद्ध केले नाही. त्यानंतर तो एकदा जाहीरपणे म्हणाला होता की, माझ्यावर अ’न्याय होत आहेत.
मात्र, सर्वांना सर्व काही माहीत होते. विनोद कांबळी हा खेळाडू असा होता. त्यामुळे त्याला क्रिकेट सामन्यात घेण्यात येत होते. जयदेव याने देखील काही सामन्यांमध्ये दमदार अशी कामगिरी केली आहे. मात्र, त्याला आता देखील संधी मिळालेली नाही. आयपीएल मध्ये देखील त्याने चांगले परफॉर्मन्स केले आहे.
2018-19 मध्ये झालेल्या रणजी सामन्यांमध्ये त्याने जवळपास आठ सामन्यात 39 विकेट पटकावल्या होत्या. त्यानंतर त्याच वर्षी झालेल्या दुसऱ्या एका सीझनमध्ये 10 सामन्यात 67 विकेट घेतल्या होत्या. जयदेव हा लेफ्ट आर्म बॉलर आहे. त्याने रणजी सामनामध्ये 19- 20 या वर्षामध्ये 13. 23 च्या सरासरीने एका डावात पाच विकेट घेतल्या होत्या.
तसेच त्याने सौराष्ट्र रणजी सामनामध्ये देखील आपली चमक दाखवली होती. पाच सीझनमध्ये त्याने चार मॅच 179 विकेट घेतल्या होत्या. असे असले तरी त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड झाली नाही. याबाबत माजी क्रिकेटपटू डो डा गणेश हे म्हणाले की, जय देव याच्याकडे चांगली प्रतिमा असून देखील त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये समावेश का झाला नाह? हा मला पडलेला प्रश्न आहे.