‘तो’ Off-Screen हिरोला फायटिंग शिकवायचा पण त्याच हिरोचा ‘मार’ खाणाऱ्या ९०च्या दशकातील ‘या’ विलेनचा असा झाला होता दु’र्देवी शेवट..

चित्रपट कोणताही असो त्यात खालनायकशिवाय मजाच नसते. चित्रपटात नायक कितीही चांगला असला तरी खलनायक देखील नायक इतकाच महत्वाचा असतो.
काही लोक तर खलनायक चांगला असेल तरच चित्रपट बघतात. चांगल्या खलनायकामुळेच चित्रपटांना प्रेक्षकांचा योग्य प्रतिसाद मिळत असतो. आज आपण आपल्या आर्टिकल मध्ये अशाच एका खलनायकबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर मग आर्टिकल ला सुरुवात करू या.
जेव्हा बॉलिवूडमधील परदेशी कलाकारांचा विचार केला जातो, तेव्हा सर्वात आधी लक्षात येते ती गेविन पॅकार्डची प्रतिमा, ज्याचा लूक हॉलिवूड स्टार सिल्वेस्टर स्टॅलोन सारखा होता. 90 च्या दशकातील अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याने खलनायकाची भूमिका साकारून आपले पात्र कायमचे अवीस्मरणीय केले आहे .
गेविन पॅकार्डने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परदेशी लूक असलेल्या या अभिनेत्याला पाहून लोकांना घाम फुटत असायचा . 90 च्या दशकात त्याच्यासारखा फिटनेस फार कमी लोकांकडे होता. एकूण, त्याने 60 चित्रपटांमध्ये काम केले. त्रिदेव, मोहरा, खिलाडीयों का खिलाडी, करण अर्जुन हे त्यांचे सर्वात अविस्मरणीय चित्रपट आहेत.
संजय दत्तचा सुपरहिट चित्रपट सडक तुम्हाला आठवत असेल. हा चित्रपट खलनायक महाराणी उर्फ सदाशिव अमरापूरकर आणि गेविन पॅकार्ड यांच्यामुळे देखील लक्षात ठेवला जातो. विशेषतः त्याचा सीन, ज्यात राणी त्याला गेविन पॅकार्ड आणि संजय दत्तशी फाईटिंग साठी पाठवते. महाराणी फोनवर गेविनला म्हणते, ‘ओ साइड हिरो देख तेरा बाप आया है, इसी दिन के लिए तो मैने तुम्हे पाला है … आजा.
आजचे बॉलिवूड चित्रपट आणि 90 च्या दशकात बनलेले चित्रपट यात खूप फरक आहे. त्यावेळचे बहुतेक चित्रपट हे ड्रामा वर आधारित होते. ज्यामध्ये एक श्रीमंत खलनायक असायचा आणि नायक गरीब असायचा, पण तो एकतर खलनायकाच्या मुलीच्या प्रे’मात प’डायचा किंवा खलनायकाच्या व्यवसायाला त्याच्या टॅलेंट ने नुकसान करायचा. ख’तरनाक खलनायकांकडे ज’बरदस्त बॉडीसह डेंजर बॉडीगार्ड असायचे.
गेविन पॅकार्ड, ज्याला या गुंडांचा सेट रोल करायला मिळत होता, तो त्या काळातील चित्रपट जगतातील काही बॉडीबिल्डर्सपैकी एक होता. त्याच्या खतरणाक स्वभावामुळे तो त्या काळातील प्रत्येक चित्रपटात दिसायचा. आपणही गेविनला कित्येकदा श’र्टलेस अनेक चित्रपटांमध्ये पाहिलेले असेल. पण ग्लॅमरच्या मोहात तो हळूहळू नाहीसा झाला.
तो शेवटच्या वर्षी 2002 मध्ये चित्रपट पडद्यावर दिसला. गेविनने 2012 मध्ये या जगाचा निरोप घेतला. गेविनचे आई वडील आयरिश होते, परंतु त्याचा जन्म महाराष्ट्रातील कल्याण जिल्ह्यात झाला. म्हणूनच अनेक लोक त्याला परदेशी मानतात, पण प्रत्यक्षात तो भारतीय आहे. 90 च्या दशकात वाढलेल्या लोकांना देखील त्यांचे नाव माहित नसेल.
परंतु त्यां काळातील लोक त्याला त्याच्या चेहऱ्यावरून ओळखत असत. गेविन पडद्यावर येताच, प्रत्येकजण आता पुढे काय होणार म्हणून जीव मुठीत धरून चित्रपट बघत असायचा. तो चित्रपटात नायकाला भयंकर धुवायचा, पण शेवटी त्याला नायक ठा’र मा’रत असत, काय करनार स्क्रिप्ट असेच लिहिलेले असायचे.
करण-अर्जुन चित्रपटात त्याला सलमान खानला मा’रहा’ण करताना पाहिले आहे का? किती खतरनाक सीन आहे ना तो. बॉडी बिल्डिंग हा त्याचा छंद होता. गॅविनने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर या क्षेत्रात अनेक पुरस्कारही जिंकले होते. एवढेच नाही तर त्याने सलमान खानचा बॉडीगार्ड शेरासह संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांनाही बॉडी बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते.