तेजश्रीने ‘या’ कारणामुळे सोडली ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका, म्हणाली; मालिकेमध्ये माझी आणि बबड्याची…

तेजश्रीने ‘या’ कारणामुळे सोडली ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका, म्हणाली; मालिकेमध्ये माझी आणि बबड्याची…

तेजश्री प्रधान हे मराठी चित्रपट सृष्टी मधले एक आघाडीचे नाव आहे. तिला अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळवली आहे. आज तिच्याकडे अनेक मालिका आहेत. तसेच तिच्याकडे अनेक मालिका देखील आहेत. मात्र, तिने नुकतीच अगं बाई सासुबाई ही मालिका सोडली आहे. याचे कारण देखील खूप चर्चेत आले आहे.

आता या मालिकेचा पुढचा भाग अगं बाई सूनबाई ही मालिका सुरू झाली आहे. तेजश्री प्रधान हिने मराठी मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे. सगळ्यात आधी काही जाहिरातींमध्ये काम केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर तिने अवधूत गुप्ते यांच्या झेंडा या चित्रपटात काम केले होते. तिची छोटीशी भूमिका देखील सर्वांना खूप आवडली होती.

त्यानंतर तिने ‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेत जान्हवी ही भूमिका केली होती ही भूमिका देखील खूप गाजली होती. या मालिकेत तिच्यासोबत शशांक केतकर हा अभिनेता होता त्याने श्री नावाची भूमिका साकारली होती. या मालिकेतील दोघांची केमिस्ट्री अतिशय जुळली होती. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा देखील त्यावेळेस होती.

त्यानंतर या दोघांनी मालिका सुरू असतानाच अल्पावधीत लग्न केले. मात्र, त्यांचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. अवघ्या काही महिन्यात दोघांना घ’टस्फो’ट घ्यावा लागला. त्यानंतर शशांक केतकर याने लग्न केले आहे. तेजश्री प्रधान ही मात्र एकटीच आहे. काही दिवसांपूर्वी अगं बाई सासुबाई या मालिकेत काम करणारा आशुतोष पत्की आणि तेजश्री प्रधान यांच्या प्रेमप्रक’रणाची चर्चा देखील रंगली होती.

यावर तेजश्री म्हणाली होती की, मी ज्या वेळेस एखाद्या अभिनेत्यासोबत काम करते, त्यावेळेस माझ्या प्रेमप्रक’रणाची चर्चा रंगत असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करते. आता अगं बाई सासुबाई ही मालिका का सोडली, याबाबतची चर्चा देखील खूप रंगत आहे. तेजश्रीने या मालिकेतील शुभ्राचे पात्र साकारले होते. हे पात्र देखील प्रचंड प्रेक्षकांना आवडले होते.

या मालिकेत आशुतोष पत्की याने सोहम हे पात्र साकारले होते. त्याचे टोपणनाव यात बबड्या असे होते. सोहमपेक्षा त्याला बबड्या या नावाने सर्वत्र ओळख मिळाली होती. मात्र, आता ही मालिका संपली आहे. याच वेळेस या मालिकेचा पुढचा भाग देखील सुरू झाला आहे. याचे नाव अगं बाई सुनबाई ठेवण्यात आले आहे.

मात्र, यामध्ये आता तेजश्री आणि आशुतोष दोघेही दिसणार नाहीत. पुढच्या भागांमध्ये शुभ्राचे पात्र उमा पेंढारकर हिने साकारले आहे. तर सोहमचे पात्र अद्वैत दादरकर याने साकारले आहे. तेजश्री हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने ही मालिका आपण का सोडली, याचे कारण देखील सांगितले आहे.

ती म्हणाली की, अगं बाई सासुबाई मधील शुभ्राचे पात्र माझ्या वाट्याला आले, ते अतिशय चांगल होत. मात्र, आता नंतरच्या भागामध्ये जे पात्र आहे, ते अतिशय कमजोर होते. त्यामुळे मी ही भूमिका मी करणार नाही, असे दिग्दर्शक व निर्माते यांना सांगितले होते. त्यामुळे मी ही भूमिका सोडली. को’रो’ना म’हामा’रीमुळे मी आता घरातच आहे.

एखादी मालिका संपल्यानंतर मी दोन ते तीन महिने घरी आराम करत असते. त्यामुळे आता मी सध्या तरी काही काम करणार नाही, असे तिने सांगितले. एका प्रश्नाच्या उत्तरात ती म्हणाली की, या मालिकेतील कलाकारांसोबत गेट-टुगेदर मात्र करता आले नाही. कारण अगं बाई सासुबाई ही मालिका संपल्यानंतर लगेचच दोन दिवसानंतर अगंबाई सुनबाई ही मालिका सुरू झाली होती. मात्र, भविष्यामध्ये या कलाकारांसोबत आपण गेट टुगेदर करू, असे ती म्हणाली.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *