तुमचा दादूस ‘आगरी किंग’ विनायक माळीने आयटीची नौकरी सोडून सुरु केले युट्युब चॅनेल..! आता महिन्याला कमवतो…

सगळं काही डिजिटल झाल्यामुळे आता, आपल्याला बरेच असे नवीन सेलिब्रिटीज मिळाले आहे ज्यांचा विचार देखील आपण कधी केला नव्हता. युट्युब हा एक सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठीच खुला आहे. त्यावर व्हिडियो बनून किंवा आपल्याजवळ असणारी माहिती आपण यूट्यूबच्या द्वारे टाकू शकतो.
ज्यांना ते आवडतात किंवा पटतात ते, त्या व्हिडियो ला लाईक्स करतात आणि हळू हळू त्या कलाकाराला प्रसिद्धी मिळते. मात्र, युट्युब वर व्हिडियो बनवणऱ्याला कलाकार पेक्षाही ‘युट्युबर’ असेच म्हणवून घ्यायला आवडते. याच युट्युबर्स चे, इंस्टाग्राम, फेसबुक इ डिजिटल प्लॅटफॉर्म देखील अनेक फॉलोवर्स असतात.
कोणता सिनेमा असेल किंवा एखादी मालिका असेल, युट्युब वर त्याचे प्रमोशन केले जाते. त्याचे कारण देखील तसेच आहे, आज असे खूप युट्युबर आहेत ज्यांचे चाहते एखाद्या बॉलीवूडच्या अभिनेत्या इतकी किंवा त्यांच्यापेक्षाही जास्त आहे.
कॅरी मिनाती, आशिष चांचलनी, रजत पवार, ट्रीगर्ड इन्सास अश्या वेगवेगळ्या नव्याने खूप युट्युबर्स आहेत. यांनी खूप प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली आहे.मात्र तुम्हाला वाटत असेल की यामध्ये मराठी नाव आहेत का तर हो, मराठी युट्युबर्स ने देखील चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.
मुंबईचा मराठमोळा बी यु निक, प्राजक्ता माळी, सुशांत घाडगे, सोबतच विनायक माळी. मात्र या सर्वात जास्त लोकप्रियता आणि घराघरात पोहचण्यात जर कोणाला यश मिळाले असेल तर तो आहे विनायक माळी. विनायक माळी हा पनवेल चा असून २२ सप्टेंबर १९९५ रोजी त्याचा जन्म झाला. त्याचे वडील सरकारी विभागात कार्यरत होते आणि तो वकिलीचे शिक्षण घेत होता.
सोबतच त्याने युट्युब वर आपले नशीब आजमावायचा प्रयत्न केला होता. सर्वात प्रथम त्याने, हिंदी युट्युब मध्ये काही व्हिडियो बनवल्या होत्या मात्र त्यात त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. मग त्याने आपल्या अस्सल आगरी अश्या साध्या भाषेत व्हिडियो बनवायला सुरु केले आणि त्यात त्यांनी विचार देखील केला नसेल इतके भरगोस यश मिळवले.
वकिलीचं शिक्षण घेत असतानाच त्याला Wipro कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र आपल्या काही वैयक्तिक कारणांमुळे त्याने ती नोकरी सोडली, असे तो सांगतो. युट्युबवर आता त्याच्या एका व्हिडियोला लाखो व्हिव्यू येतात. यामध्ये बनवलेल्या त्याच्या व्हिडियोज ला सर्वानी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्याचे व्हिडियो आले की, ते ट्रेंडिंग वर येतातच. यामधून आता तो महिन्याला दीड ते दोन लाख रुपये कमवतो.
विनायक ला अभिनयासोबतच डान्सची देखील आवड आहे म्हणून अधून मधून तो आपले डान्स व्हिडियो देखील शेअर करतच असतो. भरगोस प्रसिद्ध मिळवणारा विनायक मात्र खूपच साधा आहे. त्याच्या वाढलेल्या प्रसिद्धी मुले त्याला ‘आगरी किंग’ म्हणतात. मात्र तो अगदी नम्रपणे सगळ्यांना म्हणतो मी काहीच नाहीये, त्यामुळे मला किंग वगैरे म्हणू नका. आणि हीच त्यांनी खासियत त्याच्या चाहत्यांना खूप आवडते.