“तुझ्यात जीव रंगला” या मालिकेनंतर सर्वांची लडकी ‘अक्षया देवधर’ आता करतेय ‘हे’ काम….

बॉलिवूड अभिनेत्रींनप्रमाणेच आता मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्र्या देखील आपली चांगलीच कामगिरी दाखवत आहे. पूर्वी बॉलिवूड आणि मराठी यामध्ये खूप मोठी तफावत होती. परंतु आता मराठी मध्ये देखील एकापेक्षा एक अश्या लायक मराठी अभिनेत्री आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर आपली चांगलीच छाप टाकत आहे.
मराठी मालिकांमधील अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने समाजात चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्धल चर्चा करणार आहोत. आज आपण ज्या अभिनेत्रीबद्धल चर्चा करणार आहोत ती म्हणजे अंजली पाठक या भूमिकेनं स्वतःचा चाहतावर्ग निर्माण करणाऱ्या अक्षया देवधर हिचे बद्धल.
अक्षयाच्या तुज्यात जीव रंगला या मालिकेने जवळपास ५ वर्ष प्रेक्षांच मनोरंजन केलं. यात राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी तिच्यासोबत मुख भूमिकेत होता. दोघांची जोडी प्रेक्षकांना अतिशय आवडली होती. पण मालिका संपल्या नंतर आता अक्षया काय करणार यावर तिने सांगितले आहे.
अंजली पाठकचे ग्लॅमरस फोटो सध्या चर्चेत आहेत. आधी मालिकेमुळे व्यग्र असल्यामुळे आता स्वतःला वेळ देतेय, सो’शल मी’डिया वापरून पाहतेय आणि सगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी तयारी करतेय, असं सांगत अक्षयानं विविध वि’षयांवर तिची मतं मांडली.
पक्की खवय्यी असणाऱ्या अक्षयाला ट्रॅव्हल आणि फूड शो करायची इच्छा आहे. ‘निकोप स्पर्धा असावी; मात्र कलाकार एकमेकांना सगळ्याच गोष्टीत स्पर्धक मानतात, व्यवसायिक स्पर्धा समजू शकते; पण त्यापलीकडे माणूस म्हणून एकमेकांना समजून घ्यायला हवं. एकमेकांना फॉलो किंवा अनफॉलो करणं हे सोशल मीडियामुळे निर्माण झालेलं घाणेरडं वर्तुळ आहे, हे मान्य करायला हवं,’ असं ती म्हणते.
मालिका संपल्यावर…
मालिका संपल्यावर काय नवं; असं विचारताच अक्षया म्हणाली, ‘सध्या तरी मी आराम करतेय. मालिका संपून काही काळ झाला. गेली चार वर्षं मालिका सुरू होती. मी आता नियमित व्यायाम करतेय. नवे छंद जोपासतेय. सोशल मीडिया वापरून पाहतेय. काही फोटोशूट केले. नव्या भूमिकांसाठी सज्ज होताना मनानं आणि शरीरानंही आपण कणखर होणं गरजेचं आहे. ती तयारी होत आहे.’
वैयक्तिक आयुष्य जपू द्या
सोशल मीडिया आणि कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य याबाबत अक्षया म्हणाली, ‘चाहत्यांशिवाय, त्यांच्या प्रतिसादाशिवाय कलाकार कुणीच नसतो, हे सत्य आहे. रसिकांच्या प्रतिसादाशिवाय आपलं काम नेमकं कुठं आहे, हे कळतही नाही. चाहत्यांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे कलाकार उभा राहतो. तरीही सोशल मीडिया आणि वैयक्तिक आयुष्य याची सरमिसळ अयोग्य आहे. कलाकाराला त्याचं वैयक्तिक आयुष्य जपू द्यावं. कुणीही लगेच जजमेंटल होऊ नये.’
ताकदीच्या भूमिका हव्यात
मालिकेतली भूमिका गाजली, की तशाच प्रकारच्या भूमिकांसाठी विचारणा होते. अक्षयला मात्र ताकदीच्या भूमिका साकारायच्या आहेत. पुन्हा ग्रामीण बाजाची भूमिका साकारायची तयारी असल्याचं सांगत अक्षया म्हणाली, ‘दर वेळी मला मुख्य नायिकेचीच भूमिका हवी असा आग्रह नाही.
मला कॅरेक्टर रोल करायलाही आवडेल. ग्लॅमरस भूमिकांसाठी मी अजून तयार नाही; पण मला सगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायच्या आहेत. ऐतिहासिक भूमिकेसाठी विचारणा झाली तर निश्चितच साकारायला आवडेल.’