‘तुझ्यात जीव रंगला’नंतर ‘राणा दा’ करतोय छोट्या पडद्यावर पुनरागम; ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत…

आज अनेक मालिका बनतात. रोज आपण वेगवेगळ्या वाहिन्यांवर, कित्येक मालिका बघतो. जवळपास महिन्याला एक तरी नवी मालिका येतच असते आणि एखादी मालिका निरोप देखील घेत असते. मात्र प्रत्येक मालिका, प्रेक्षकांच्या लक्षात राहतातच असे नाही.
तर काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनातून कुठेच जात नाही. अशीच एक मालिका होती, ‘तुझ्यात जीव रंगला.’ छोटे काय, मोठे काय आणि वृद्ध काय या मालिकेने अक्षरशः सर्वांनाच वेड लावलं होत. या मालिकेच्या गाण्यापासून ते, सर्व पात्रांपर्यंत सगळंच काही अगदी सुपरहिट ठरलं होत. राणा दा आणि पाठक मॅडम यांच्या जोडीने अनेकांना वेड लावलं होत.
मालिकेचे कथानक, त्यात कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे या मालिकेने काहीच दिवसांमध्ये चाहत्यांची मनं जिंकली होती. आणि आजही ती जागा कायम आहे, हे विशेष. या मालिकेतील राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीचा तर भाला मोठा चाहतावर्ग बनला. त्याला सुरुवातीला मॉडेलिंग किंवा अभिनय करायचा नव्हता.
त्याला आर्मीमध्ये भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा होती. मात्र काही कारणामुळे ते होऊ शकले नाही. हार्दिक मूळ मुंबईचाच त्याने अनेक ऑडिशन दिले आणि तुझ्यात जीव रंगला मध्ये काम करण्याची संधी त्याला मिळाली. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्याला, मुंबई सोडून कोल्हापूरला जाऊन राहावं लागलं होत.
जवळपास ३-४ वर्ष तो कोल्हापूरमध्ये होता, म्हणून तेथील लोकांसोबत त्याचा खास बॉण्ड तैयार झाला आहे. राणा दा म्हणजेच हार्दिक सांगतो त्याला कॉलेज मध्ये असताना अभिनयाची आवड नव्हती आणि अभिनय करावा असा विचार देखील त्याने केला नव्हता. २०११ साली त्याची आर्मी मध्ये निवड देखील झाली होती, मात्र काही कारणास्तव त्याला फोन आला नाही.
आता मात्र हार्दिकचं अभिनय करियर उत्तम सुरु आहे. त्यानं काही सिनेमामध्ये देखील काम केलं आहे. आणि आता तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? यामालिकेतून पुन्हा आपल्या चाहत्यांना भेटायला येत आहे. या मालिकेच्या प्रोमोला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. अमृता पवार ही अभिनेत्री या मालिकेत प्रमुख अभूमिकेत असणार आहे.
अमृता पवार ने स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेमध्ये राजमाता जिजाऊ यांची तरुण पनाची भूमिका साकारली होती. तेव्हापासून ती कायमच चर्चेत असते. तुझ्या माझ्या संसाराला.. च्या प्रोमो मध्ये अमृताच आपल्या मैत्रिणीसोबत काही चर्चा करत असलेली दिसत आहे.
या मालिकेचं कथानक आजच्या पिढीवर आधारित असणार आहे असं सांगितलं जात आहे. तूर्तास अजून प्रोमो मध्ये राणा दा दिसत नाहीये, म्हणून या मालिकेत राणा दा म्हणजेच हार्दिक नक्की कोणत्या लूक मध्ये असेल याची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे.