‘तारीफ करू..’ शम्मी कपूरच्या गाण्यावर किंग कोहली विराटने अनुष्कासोबत केला भन्नाट डान्स, व्हिडियो होत आहे तुफान VIRAL

सेलेब्रिटी कपलने काहीही केलं तरीही ती बातमी बनतेच. खास करुन जेव्हा ते सगळ्यांची आवडती जोडी असते, तेव्हा त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच सर्वसामान्य लोक उत्साहित असतात.
देशातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडींपैकी एक आहे विराट आणि अनुष्काची जोडी. मनोरंजन जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध जोडी म्हणून कित्येक वर्षांपासून विराट आणि अनुष्काची जोडी पहिल्याच क्रमांकावर आहे. मॅड इन लव कपल म्हणजे काय हे त्या दोघांकडे बघून समजते. सोशल मीडियावर देखील हे दोघे नेहमीच सक्रिय असतात.
अनेकवेळा विराट आणि अनुष्का आपल्या इंस्टाग्राम हॅन्डल वरुन ऑनलाईन येत असतात. यात सर्वात विनोदी हे असते, ज्यावेळी पण विराट ऑनलाईन येतो त्यावेळी सगळे अनुष्काला आजूबाजूला शोधत असतात. आणि जेव्हा अनुष्का ऑनलाईन असते तेव्हा, विराट कुठे आजूबाजूला आहे हे शोधात असतात.
त्यांच्या लाईव्ह सेशनमध्ये एकदाही कोणाची झलक दिसली तरीही, त्याची बातमी बनते. विराट आपल्या देशातीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. तर दुसरीकडे अभिनय आणि निर्मितीक्षेत्रामध्ये देखील आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अनुष्काचा देखील भलामोठा चाहतावर्ग आहे. त्या दोघांच्याही चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते.
प्रेम करावे तर असे, असं अनेकवेळा त्यांच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत असतात. नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदूवर असणाऱ्या या जोडीचा एक व्हिडियो सध्या तूफान वायरल होत आहे. तसे तर आपल्या बाळाच्या म्हणजेच वामिकाच्या जन्मानंतर तूर्तास, अनुष्काने बॉलीवूडपासून स्वतःला दूरच ठेवले आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
सध्या या दोघांचाच एक व्हिडियो चांगलाच वायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये विराटने भन्नाट डान्स केला आहे. शम्मी कपूरच्या गाण्यावर विराटने अत्यंत प्रभावी डान्स केला आहे. ‘तारीफ करु क्या उसकी जिसने तुम्हे बनाया’ असं आपल्या लाडक्या बायकोकडे बघत त्याने भन्नाट डान्स केला. या गाण्याला लाखोने व्युज मिळाले आहेत. तेवढेच जास्त लाईक्स आणि कमेंट्स त्यांच्या या वीडीयोवर आले आहेत.
हा व्हिडियो एका जाहिरातीचा आहे. यामध्ये विराट अनुष्काची वाट बघत असतो. आणि जेव्हा, अनुष्का येते तेव्हा शम्मी कपूर यांच्या तारिफ क्या करु उसकी….या गाण्यावर थिरकू लागतो. या व्हिडियोमध्ये दोघेही नेहमीप्रमाणेच कमालीचे सुंदर दिसत आहेत. वीरूष्का केवळ सर्वांचे मनोरंजनच नाही करत तर, त्यांनी कोरोनाकाळात पुढे येऊन फंड देखील जमा केला होता. गरजूंपर्यंत मदत पोहोचवली होती. अनुष्का आणि विराट खऱ्या अर्थाने, परिपूर्ण कपल आहे.