‘तारक मेहता’ मालिकेत विवाहित आणि रोमँटिक असणारे ‘हे’ कलाकार खऱ्या आयुष्यात आहेत सिंगल, अंजली भाभीचे वय तर…

‘तारक मेहता’ मालिकेत विवाहित आणि रोमँटिक असणारे ‘हे’ कलाकार खऱ्या आयुष्यात आहेत सिंगल, अंजली भाभीचे वय तर…

फक्त आपल्या देशातील च नव्हे तर संपूर्ण जगातील लॉँगेस्ट रनींग शो म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ओळखला जातो. माघील जवळपास एका दशकांहून अधिक काळापासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोचे आजही अनेक चाहते आहेत. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हा शो काही काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांना खळखळून हसवण्याचे काम करत आहे.

म्हणूनच हा शो आजही अनेकांचा अगदी आवडीचा शो आहे. या शो मधील सर्वच पात्र आपल्या सर्वाना माहीत आहे. प्रत्येक पात्राची आपली वेगळी अशी एक शैली आहे आणि म्हणूनच ते आजही इतके जास्त लोकप्रिय आहेत. या शो मध्ये दिसणारा रोशन सिंह सोढी आपल्या दिलखुलास अश्या अंदाजासाठी खूपच प्रसिद्ध आहे.

मात्र आपली पत्नी रोशन हिच्यावर असणाऱ्या त्याच्या प्रेमासाठी आणि त्याच्या प्रेम व्यक्त करण्याच्या कलेसाठी देखील तो खूपच लोकप्रिय आहे. आपल्या पत्नीवर इतकं प्रेम करणारा रोशन खऱ्या आयुष्यात देखील अत्यंत रोमॅंटिक असेल असे जर तुम्हाला वाटतं असेल, तर मात्र तुम्हाला तसे आहे कि नाही हे बघण्यासाठी वाट बघावी लागेल.

कारण त्याच अजून लग्नच झालं नाहीये. गुरुचरण सिंह यांनी रोशन सिंग सोढी च्या पत्रामध्ये एक वेगळाच नवेपणा आणि आपल्या खास अश्या शैली मुळे या पात्राला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. मात्र आपल्या पत्रामध्ये स्वतःच्या पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करणारे रोशन सिंग सोढी अजूनही अविवाहित आहे.

२०१३ मध्ये त्यांनी या मालिकेला रामराम जरी ठोकला असला तरीही त्याने, निभावले हे दिलखुलास आणि प्रेमळ पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. केवळ गुरुचरण सिंहच नव्हे तर सर्वांची आवडती बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ता हि देखील अजून पण अविवाहित आहे. कृष्णन सुब्रमण्यम अय्यरच्या पत्नीचे पात्र म्हणजेच बबिताजी हे पात्र संपूर्ण गोकुलधाम सोसायटीचेच सर्वात स्टायलिश आणि आवडते पात्र आहे.

जेठाजी म्हणजेच जेठालाल आणि बबिता यांची खट्याळपूर्ण मैत्री सर्वांनाच आवडते. सिरीयल मध्ये जरी बबिता ला अय्यर म्हणून उत्तम असा जीवनसाथी भेटला असला तरी खऱ्या आयुष्यात अजूनही तिला तिचा जोडीदार भेटला नाहीये. तिला हवा तसा मुलगा अजूनही तिला भेटला नाही म्हणून ती अविवाहित आहे असे तिने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

तारक मेहतांची बायको म्हणजेच अंजली मेहता आपल्या हेल्थ कॉन्शियन्स मुळे चांगलीच प्रसिद्ध आहे. हाच हेल्थ बद्दल जागरुकपणा अंजली म्हणेजच नेहा मेहता कदाचित आपल्या खऱ्या आयुश्यात देखील फॉलो करत असाव्यात म्हणून तर नेहा आजही इतकी जास्त फिट आहे.

आपल्या वेगवेगळ्या हेल्दी डिशेस ने आपल्या पतीला हेल्दी ठेवणारी नेहा, आजही आपल्या खऱ्या आयुष्यात आपल्या तारकची म्हणेजच आपल्या जोडीदाराची वाट बघत आहे. अजूनही अंजली म्हणजेच नेहा हिला आपल्या आवडीचा जोडीदार मिळाला नाहीये. ती ३४ वर्षाची असून काही दिवसांपूर्वी तिने या शोला रामराम ठोकला असून काही गुजराती सिनेमा ती करत आहे. पण लवकरच ती शो मध्ये परतणार असल्याचे बोलले जात आहे.

कृष्णन अय्यर याचा जेठालाल सोबत ३६ चा आकडा आहे. याचे कारण आहे त्याची पत्नी बबिता. ज्याप्रमाणे खऱ्या आयुष्यात बबिताला अजून आपला अय्यर नाही मिळाला त्याचप्रमाणे अय्यर ला देखील अजून आपली बबिता मिळाली नाहीये. शो मध्ये साऊथ इंडियन बनलेले अय्यर मूळचे मध्य प्रदेश मधले असून ४० वर्षांचे असून अजून देखील अविवाहित आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *