‘तारक मेहता’ मधील बबिता उर्फ मूनमून दत्ता 9 वर्षाने लहान ‘या’ कलाकाराला करतेय डेट !

‘तारक मेहता’ मधील बबिता उर्फ मूनमून दत्ता 9 वर्षाने लहान ‘या’ कलाकाराला करतेय डेट !

आपल्या देशातील सर्वात जास्त एपिसोड वाला म्हणजेच लोंगेस्ट रनिंग शो म्हणून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सगळीकडे प्रसिद्ध आहे.

मागील जवळपास दोन दशकांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आजही या मालिकेचे लाखो चाहते आहेत. जेठालाल आणि त्याची गोकुलधाम सोसायटी, तिथे होणाऱ्या घटना-घडामोडी याबद्दल जाणून घेण्यास नेहमीच चाहते उत्सुक असतात. या मालिकेचे सर्व पात्र तेवढेच जास्त लोकप्रिय ठरले.

मागील अनेक वर्षांपासून ही मालिका अजूनही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेचा टीआरपी कायमच चांगला राहतो, त्यामुळे अनेक मुख्य कलाकारांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असला तरीही अजूनही मालिका सुरूच आहे. जेठालालची पत्नी म्हणजेच, दयाबेन उर्फ दिशा वकानी यांनी तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर अनेकांना असे वाटले होते की, आता मालिकेचा टीआरपी कमी होईल. मात्र असे काहीही नाही झाले,आणि अजूनही मालिका तेवढेच प्रसिद्ध आहे.पण दयाबेन च्या वापसी ची वाट सगळेच बघत आहेत. दयाबेन प्रमाणेच मूनमून दत्ताने देखील काही काळ पासून अंतर केले होते. मात्र आता पुन्हा शोमध्ये तिने एन्ट्री केली आहे.

या मालिकेमध्ये जेठालाल, दया बेन, सुंदर मामा, बबीताजी, भिडे गुरुजी, तारक मेहता यांच्यासोबतच टप्पू सेना देखील चांगलीच लोकप्रिय ठरली. ही मालिका जितक लोकप्रिय आहे तेवढेच ही मालिका नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली अनेकवेळा पाहायला मिळाले. या मालिकेचे कलाकार, अनेकदा वेगवेगळ्या वादात सापडतात आणि मग त्या बद्दल चांगलीच चर्चा चालू होते.

बबीताजी हे पात्र जवळपास सर्वांच्याच परिचयाचे आणि आवडीचे देखील आहे. मूनमून दत्ता हिने हे पात्र साकारले आहे. मुनमुन दत्ताचे लाखो चाहते आहेत. तारक मेहता मध्ये काम करण्यापूर्वी, तिने काही मालिकांमध्ये आणि जाहिरातींमध्ये काम केले होते. मात्र तारक मेहता मधील बबिताजी या पात्राने तिला खरी ओळख मिळवून दिली.

तिच्या ग्लॅमरस अंदाजचे केवळ प्रेक्षकच नाही तर जेठालाल देखील तेवढाच जास्तच दिवना आहे. मुनमुन दत्ताचे, अनेक कलाकारांसोबत नाव जोडण्यात आले होते. मात्र ती नक्की कोणाला डेट करत आहे याबद्दल कधीच उघडपणे तिने काहीच वक्तव्य केले नव्हते. आता मात्र तिच्या इंस्टाग्राम वरील कमेंट्स वरून काही खुलासा झाला आहे.

बबीताजी म्हणजेच मुनमुन दत्ता ही तिच्या वयापेक्षा नऊ वर्षाने कमी वय असलेल्या सहकलाकाराला डेट करत असल्याची बातमी समोर येत आहे. राज अनादकत या अभिनेत्याला मुनमुन दत्ता डेट करत आहे, असा दावा एका न्यूज रिपोर्ट करून करण्यात आलेला आहे. हे दोघे सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा दावा त्यांच्या इंस्टाग्राम वरील कमेंट्स वरून करण्यात येत आहे.

राज, तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत टप्पू म्हणजेच जेठालाल च्या मुलाच्या भूमिकेत झळकत आहे. आद्यप राज आणि मुनमुन या दोघांकडून याबद्दल कोणत्याही प्रकारचे वक्तव्य पुढे आले नाही. मात्र यावर ते गप्प का असा प्रश्न देखील सध्या नेटकरी विचारत आहेत. त्यांच्या या नात्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *